ad

११ जुलै, २०१४

"तुला माझ्याबद्दल काय वाटतं ?"




लग्नाला बारा वर्ष झाल्यावर अचानक एक दिवस तिनं त्याला विचारलं ...
"तुला माझ्याबद्दल काय वाटतं ?"

तो बावचळला ... गोंधळला ... आता अशा प्रश्नांची सवय उरली नव्हती नं ... !
प्रेम नवं नवं होतं तेव्हा ठीक होतं हो ... तिच्याकडून दिवसातनं एकदा तरी हा प्रश्न यायचा आणि त्याच्याकडे ही एकदम भारी भारी उत्तरं तयार असायची ...

पण मग लग्न झालं ...
संसार नावाची प्रश्नपत्रिका सोडवता सोडवता ही असली तोंडी परीक्षा पार विस्मरणात गेली ...
आणि काल परवा अचानक हा गुगली पडला ...

त्यातून तिनं प्रश्न विचारला तेव्हा ती पोळ्या करत होती ..
हातात लाटणं ...
समोर तापलेला तवा ...
त्यानं संभाव्य धोका ओळखला ..
आणि 'सांगण्यासारखं प्रचंड आहे ..
संध्याकाळी सावकाशीनं सांगतो ...'
असं म्हणून तो कामावर सटकला ... !

तो घरातून बाहेर पडला खरा ...
पण घर काही डोक्यातून बाहेर पडलं नव्हतं .. !
अख्खा दिवस शब्दांची जुळवाजुळव करण्यात गेला ...
कठीण असतं हो ...
नात्याचं गणित एकदा भावनेत अडकलं की ते शब्दांतून सोडवणं कठीण असतं ..

तो विचार करत होता ..
काय सांगावं .. ?

मी राजा .. तू माझी राणी वगैरे काही म्हणावं का ...
नको .. फार फिल्मी वाटतं ..

तू खूप छान आहेस ...
असं म्हणावं ... नको ...
तिला ते फारच रुक्ष वाटण्याची शक्यता आहे ..
समजूतदार सहनशील वगैरे म्हणावं ...
तर ती नक्की म्हणेल ...
राजकारण्यांसारखी उत्तरं देऊ नकोस ...
त्याला काहीच सुचेना ...

बायकोला आवडेल असं वागणं आणि तिला पटेल असं बोलणं ... हे दोन्ही शिकवणारे क्लासेस असायला हवे ...
लाईन लागेल नवऱ्यांची ...
त्याच्या मनात असले भलभलते विचार येत होते ..

सूर्य मावळला ...
घरी जायची वेळ झाली ..
आपल्याला पाहिल्या पाहिल्या तिच्या उजव्या डोळ्याची भुवई वर जाणार ...
याची त्याला खात्री होती ...

घरचा अभ्यास न करता शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यासारखा त्याचा चेहरा झाला होता ...
त्यानं बेल वाजवली ..
अपेक्षेप्रमाणे तिनं दार उघडलंच नाही ..
त्याच्या मुलानं दार उघडलं ... आणि पुढच्याच क्षणी कांद्याच्या भजीचा घमघमाट नाकात शिरला ...

मुलगा जवळ जवळ उडी मारत म्हणाला ... "भजी केलीत आईनं ... पटकन हातपाय धुवून या ..."

तो मान डोलावून आत गेला ... आणि पुढच्याच क्षणी टेबलवर हजर झाला ...

बायकोनं भज्यांची प्लेट समोर मांडली ...
त्यानं विलक्षण अपराधी चेहऱ्यानं तिच्याकडे पाहिलं ...

तिनं तोंडभर हसून विचारलं .. "काही सुचलं ... ? "

त्यानं नकारार्थी मान हलवली ...

तशी ती पटकन टाळी वाजवून आनंदानं म्हणाली ... "मलाही नाही सुचलं ... ! "

तो पुन्हा गोंधळला ...
इतकी अनपेक्षित प्रतिक्रिया ... ?

आणि ती बोलतच होती ...
"काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीनं मला विचारलं ...
तुला तुझ्या नवऱ्याबद्दल काय वाटतं ... ? "

सात दिवस विचार केला ..
पण मला काही सांगताच येईना ...
मग भीति वाटली ...
माझं तुझ्यावरचं प्रेम आटलं की काय .. ?
अपराधी वाटायला लागलं - काय करावं कळेना ...
मला स्वतःविषयी शंका होती पण बारा वर्षानंतर ही तुझं प्रेम कणभर ही आटलेलं नाही याची खात्री होती.
म्हणून मग हा प्रश्न तुला विचारला ...
वाटलं .. तुला उत्तर देता आलं तर आपण 'Fault' मध्ये आहोत ..
पण नाही ... तुलाही उत्तर देता आलं नाही ...
म्हणजे आपण आता अशा वळणावर आहोत ...
जिथे फक्त 'वाटणं' संपून 'वाटून घेणं' सुरु झालंय ...
आता शब्द सापडत नाहीत ... आणि त्याची गरजही वाटत नाही ...
कारण आता एकमेकांसमोर स्वतःला सिध्द करण्याची धडपड संपलीय ... "

असं म्हणून तिनं एक कांदा भजी त्याला भरवली ...
शपथ सांगतो ...
त्याच्या बारा वर्षाच्या संसारामधला सगळा खमंगपणा त्या भजीत उतरला होता !!!

जवळ

जवळ नसताना आभास घडवते ती..
तिच्या शब्दांचा भास घडवते ती..
माझ्या स्वप्नात का येते ती..?

समोर नसताना जाणवतो तो स्पर्श तिचा
हवासा वाटतो मंद सहवास तिचा
का कळेना माझ्या स्वप्नात का येते ती..

का कधी कधी अस होत..???

का कधी कधी अस होत..???
आपण कोणावर इतके प्रेम करतो.
.
पण त्याला त्याची अजिबात जाणीव
हि नसते.
.
का कधी कधी अस होत.?
आपले मन कोणासाठी इतके झुरते
.
पण त्याला त्याची अजिबात कदर नसते.
.
का कधी कधी अस होत.?
कि त्या व्यक्ती शिवाय आपण
अजिबात राहू शकत नाही
.
पण ती व्यक्ती आपल्या शिवाय
हि खूप खुश असते...

माझी अंत्ययात्रा


माझी एक इच्छा आहे...
माझी अंत्ययात्रा मला पहायची आहे...
पहायचंय मला, कोण रडतंय माझ्या मरणावर,
अन् पहायचंय कोण हसतंय माझ्या सरणावर...
पहायचंय मला कोण म्हणतय "अरेरे गेला...!",
......अन् पहायचंय मला कोण म्हणतय "बरं झालं मेला...!"
आणि हो... अजुन एक इच्छा ऐका माझी,
मला जाळन्यापुर्वी वाट पहा 'तिची'...
येईल 'ती' जरुर हे मात्र नक्की आहे,
नाहीच आली तर, स्वर्गात भेट आमची पक्की आहे...
माझ्या तिरडीवर लावू नका फुल-तुरे,
तिच्या डोळ्यातून निघालेले दोन अश्रुच पुरे....!
माझ्या मृत्युवर नका करू कळवळT,
तिची सारी प्रेमपत्रे फ़क्त अग्निमद्धे जाळT...
मला अग्नि देता क्षणी ती सुद्धा रडणार आहे,
कारण माझ्यासोबत तिचे ह्रदय सुद्धा जळणार आहे...
मी मेल्यावरच आमचे प्रेम जगाला कळणार आहे...
.
मला बघायचा आहे कोण माझ्या कपड्यान वरून प्रेमळ हात फिरवणार आहे ...
कोण माझ्या फोटो ला कवटाळून ढसा ढसा रडत आहे...
कोण माझी खेळणी न्याहाळत आहे...
कोण माझ्या कविता वाचत आहे....
मला पाहायचा आहे कोण माझ्यासाठी मला आवडणारी खीर घेवून येत आहे...
मला पाहायचा आहे कोण मला अग्नी देता आहे..
मला पाहायचा आहे मला कोणते चार खांदे मिळत आहे आधाराला...
किती जन रडत आहे ...
आणि महत्वाचा राहिलाच किती मित्र आणि खास म्हणजे किती मैत्रिणी मला miss करणार आहे...
मला खरच 
माझ्या साठी किती मुली रडत आहे हे हि मला पाहायचे आहेच... माझी अंत्ययात्रा

१० जुलै, २०१४

असाव कोणीतरी

असाव कोणीतरी वाद घारणार...
खोचा रुसवा आणून पुन्हा आपल्यावरच रागवणार...

असाव कोणीतरी मन मोकळ बोलणार काहि न सांगता अगदी मनातलं ओळखणारं


९ जुलै, २०१४

मला तुला माझ्यासाठी रडताना पहायचंय.

मी तर रोजचं वाट पाहतो तुझी,
एकदा मला ही तुला माझी वाट
पाहताना पहायचंय..
मी रडताना माझ्यावर हसतेस तु,
एकदा तसं मला ही तुझ्यावर
हसायचंय..
रोज एकटा रडतो मी,
एकदा मला ही तुझ्या सोबत मन
भरुन रडायचंय..
तु माझी होणार नाही हे माहीत
आहे मला,
तरीही या डोळ्यांनी तुला
दुस-याची होताना पहायचंय..
येणा-या प्रत्येक जन्मी,
मला तुझ्याचं आठवणीत जगायचंय..
आणि पुढच्या प्रत्येक जन्मी तु
माझी होशील,
या खोट्या आशेवरचं मरायचंय..
एकदा खरचं
मला तुला माझ्यासाठी रडताना पहायचंय.


मी मेल्यावर


मी मेल्यावर अर्थीजवळ उभी रहा
मी मेल्यावर अर्थीजवळ उभी रहा,
अणि स्तब्ध नयनांनी सगळ पहा..
आसवांना मात्र स्पष्टपणे सांग घोळ
घालायचा नाही,
तो मेला आहे..त्याचा हट्ट धरायचा नाही,
आग विझल्यावर मग थोडी जवळ जा..
कुठे वाचलो का मी एकदा निरखून पहा,
स्वःताला सांग व्हायचं ते होऊन गेलं..
वेड्याचं आयुष्य वेड्यातचं गेलं..
उसासा टाकुन मग कामाला लाग शेवटचं
एकदा माझ्याशी वै-यासारखी वाग,
थोडीशी राख माझी बांधून घे..
जड झाली तर वहायला नदीवर ने,
राख नादित वाहून दे..
सगळं काही सपलं असेल,
जे झालं माझ्यासंगे तुझ्या..
ध्यानातही उरलं नसेल,
संपलेल्या खेळाचा मग तू संपून टाक डाव,
फक्त वहायच्या आधी राख..
एकदा हृदयाला लाव..
बघ,
राखेचा एक कण तुझ्या..
हातावर राहिल,
शेवटचं का होईना तुझ्याकडे आशेने पाहिल..
त्यालाही तुझा अश्रुची चव,
तू कळवणार का ?????
विझवून अश्रुत एकदा पुन्हा त्यास..
जळवणार का ??

आजार पणात

आजार पणात होते जाणीव कि आपलं कोणी असावं तापात फणफणताना जवळ कोणी तरी बसावं डोके दुखत रडत असताना पाठीवर प्रेमाचा हात असावा सर्दी मुळे त्रस्त असताना दिलासा कोणी तरी द्यावा औषध घेता येत असलं तरी कोणी आठवण करून द्यावी आपल्या हाताने प्रेमाने औषधाची गोळी भरवावी वेदना बघून माझ्या डोळ्यात कोणी टपोरा अश्रू ढाळावा नि मी पटकन हळुवार हाताने तो अलगद प्रेमाने झेलावा मी ठीक होईन हा गं म्हणून तिला मी समजवावं नि अलगद तिच्या मिठीत माझं आजारपण विसरावं आजारपणात होते जाणीव कि असतं ते आयुष्यच आजारी जेथे नाही नशिबी प्रेम नि आपलं हक्काचं कोणी नि आपलं हक्काचं कोणी

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...