ad

आयुष्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आयुष्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१६ जून, २०१४

विसरला जात नाही

भूतकाळ कितीही जूना असला तरी तो कधी विसरला जात नाही

डोळ्यासमोर तो येऊन उभा राहिल्यावर डोळ्यातले पाणी संपत नाही

पृथ्वी गोल आहे हे तेव्हा एकदा जरूर लक्षात येत.. जेव्हा भूतकाळातल प्रेम आपल्यासमोर येऊन उभ असत

सगळ्यात जास्त दुःख तर तेव्हा होत जेव्हा त्याच्या हातात हात घालून कोणी दुसर उभ असत




भातुकलीचा खेळ कधी खरा होतच नाही मनात रंगवलेली स्वप्न कधी खरी होतच नाहीत

राग कितीही असला तरी आज प्रेमही मनात येत कधीतरी चुकून वाटत की आपलच काहीतरी चुकल

हा भूतकाळ नेहमी नको तेव्हा समोर येतो मोठ्या मेहनतीने बनवलेलं मनातल 
हे काचेच घर क्षणात तोडून मोकळा होतो .......!!!

कुठं तरी थांबवायला हवं..

स्वप्न प्रत्यक्षात उतरायला बऱ्याच गोष्टींची गरज असते. त्या सर्व गोष्टी आपल्याला हव्या तशा आणि हव्या त्या वेळी हाताशी याव्या लागतात.त्या येतातही; पण बराच वेळा निसटूनही जातात आणि आपलं स्वप्न
रंगवायला काही रंग कमी पडतात की काय, याची जाणीव आपल्याला व्हायला लागते. मग आपल्याला वाटायला लागतं- ठरवलं तसं घडलं नाही आणि जे घडलं ते आपलं मन मनायला तयार होत नाही. आपण मनात साठवलेलं स्वप्न जसंच्या तसं आपल्याला हवं असतं.




थोडेसे रंग नसले म्हणून प्रत्यक्षात आपल्या समोर आकाराला आलेलं स्वप्नही मग आपल्याला भावत नाही. यात स्वप्नांचा दोष नसतो. दोष असतो तो आपल्या मनाचा.रंगांच्या रांगोळीपुढं रंग नसलेली साधी रांगोळीसुद्धा तिचं अस्तित्व दाखवत असते, हे आपण विसरतो.आपल्या आयुष्यात हे असंच व्हायला पाहिजे होतं, असं म्हणत, ते तसं का झालं नाही म्हणून स्वतःला आणि सभोवतालच्या माणसांना किंवा परिस्थितीला दोष देत आयुष्यभर कुढत राहतो. रडत राहतो.
उदास होतो. माणसाच्या आयुष्याचं एकूण मोल लक्षात घेऊन माणसानं आपलं असं वागणं
कुठं तरी थांबवायला हवं..

१४ जून, २०१४

आयुष्य

आयुष्याचं ध्येय ठरवताना "६-५-४-३-२-१" या क्रमाने विचार करावा: 
६ आकडी पगार,
५ खोल्यांचा फ्लॅट,
४ चाकी गाडी,
३ दिवसांची मस्त सुट्टी,
२ झकास मैत्रिणी आणि
१ साधी-सरळमार्गी बायको!

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...