ad

चारोळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चारोळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१७ डिसेंबर, २०१४

मरण

मरण जरी आलं तरी 
ते ऐटीत असावं फक्त 
इच्छा एकच मी 
तुझ्या मिठीत असावं

१ सप्टेंबर, २०१४

‪हृदय‬

"तुम्हाला माहिती आहे
देवाने असे का केले की
आपल्याला दोन हात,
दोनपाय, दोन डोळे दिले
पण ‪‎हृदय‬ मात्र एकच दिले ??
....कारण ह्या पृथ्वीवर येऊन
आपण आपल्या आवडीचे
दुसरे हृदय शोधावे म्हणून.

७ ऑगस्ट, २०१४

आपुलकी


मागचे सगळे वीसरुन आता शीकावे
स्वताहाचे आयुश्य जगायला... 
इथे कोणालाही नसतो वेळ 
कोणाबरोबर आपुलकीने वागायला... 


२९ जून, २०१४

सांज वेळ

सांज वेळची लाली तुझ्या गाली उतरली
गुलाबांनी ओठावरची गुलाबी चोरली
तुझ्या रुसण्या मध्ये सुद्धा एक
अदा आहे
ह्याच सर्व गोष्ठीवर मी फिदा आहे..


१५ जून, २०१४

१४ जून, २०१४

तुझ्या - माझ्या प्रेमाच्या चारोळ्या !


तु माझी न झाल्याने
तुझ्यावर मी चिडलो होतो,

म्हणुन आहेर न देताच
मी तुझ्या लग्नात जेवलो होतो!

प्रत्येकाच्या मनात कुठंतरी
एक बिल क्लिंटन असतो,
आपल्या हिलरी बरोबर संसार करताना
तो मोनिकेच्या शोधात असतो!

तुझ्याशिवाय माझ्या मनात
कोणा मुलीचा विचार असणार नाही
तुझ्याशिवाय तसे मला
फुकटचे कोणी पोसणार नाही!

माझे आणि माझ्या बायकोचे
भांडण नेहमीच नविन असते
आम्ही कितीही भांडलो तरी,
कुठलीही शिवी रिपिट नसते!

बायकोच्या माहेरी सहसा
मी कधी जात नाही
माकडाच्या हाती रेशिम
टोमणा मला आवडत नाही!

खरं प्रेम दुरदर्शनसारखं असतं,
कधीही न बदलणारं,
लोकांनी कितीही शिव्या घातल्यातरी
आपल्याच विश्वात रमणारं!

२९ एप्रिल, २०१४

प्रेम म्हणजे गुलाब नव्हे

प्रेम म्हणजे गुलाब नव्हे,
गुलाबाचं जणू रानच असतं.
सुवास धुंद करीत असतो
काट्यांचा मात्र भान नसतं !


१९ एप्रिल, २०१४

पाऊस


कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो.....

२४ जानेवारी, २०१४

तुझ्या नुसत्या ओठांच्या स्पर्शाने

तुझ्या नुसत्या ओठांच्या स्पर्शाने 
कडू चहात गोडवा येतो... 
साखर घातलेला चहाही मग 
तुझ्या ओठांशिवाय कडवा होतो... 

२३ जानेवारी, २०१४

प्राण


प्राण माझा असला तरी, 
श्वास मात्र तुझाचं आहे. 
प्रेम माझे असले तरी, 
सुगंध मात्र तुझाचं आहे.. 
मी वेडा असलो तरी, 
वेड मात्र तुझेचं आहे.

१४ जानेवारी, २०१४

बहाने लाख मिळाले तुला विसरायचे



बहाने लाख मिळाले तुला विसरायचे
पण त्याचा उपयोग काही झालाच नाही..
विसरून जायचं म्हंटलं तरी ही मन तयार होतच नाही.

जेव्हा आपण छोटे होतो तर न झोपण्यासाठी,

जेव्हा आपण छोटे होतो तर न झोपण्यासाठी, 
रडायच नाटक करत होतो... ]
पण आज आपण जेव्हा मोठे झालो तर रडण्यासाठी, 
झोपायच नाटक करतो....

८ जानेवारी, २०१४

मन

कधीतरी मन उदास होते 
हळु~ हळु डोळ्यांना त्याची जाणीव होते 
आपोआप पडतात डोळ्यांतुन अश्रू जेव्हा … 
आपली माणस दुर असल्याची जाणीव होते

काय जादू आहे तुझ्यात,

काय जादू आहे तुझ्यात, 
काही समजायला पर्यायच नाही……. 
नुसती चाहूल लागली तुझी तरी, 
मन माझं उमलल्याशिवाय राहात नाही..

प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी

प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी 
मी जसा आहे तसेच, 
माझ्यावर प्रेम करणारी असावी 
खुबसुरत नसली तरी, 
चारचौघीत उठून दिसणारी असावी 
शेर -ए-गझल नसली तरी, 
माझी एक छानशी चारोळी असावी

७ जानेवारी, २०१४

आयुष्यात खूप सारे जण येतात जातात

आयुष्यात खूप सारे जण येतात जातात्…… 
प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं……. 
पण जे आपल्या सुख दुःखात सामील होतात…….., 
त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यत विसरायचं नसतं……

तू

तू म्हणतेस तूझ एक फुलं 
माझ्याकडे ऊधार आहे 
अग वेडे कस सांगू .. 
तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे

वाट पाहशील तर आठवण बनून येईन ,

वाट पाहशील तर आठवण बनून येईन , 
तुझ्या ओठावर गाणे बनून येईन , 
एकदा मनापासून मला आठवून तर बघ , 
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन ,

तीच्या सोबत बोलताना शबदच संपतात..

तीच्या सोबत बोलताना शबदच संपतात.. 
ती गेल्यावर नको-नको ते आठवतात… 
तीला वाटत माझ्या जवळ शब्दच नसतात, 
पण तीला कोण सांगणार, 
तीच्या स्तुती मधे शब्दच शुन्य असतात….

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...