ad

majhprem लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
majhprem लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२७ सप्टेंबर, २०२१

September 27, 2021 at 11:58PM

एकट्या क्षंणी..

एकट्या क्षंणी रडावस वाटतं.
एकट्या क्षंणी पावसात भिजावस वाटतं.
एकट्या क्षंणी तुला पाहावस वाटतं.
एकट्या क्षंणी तुला भेटावस वाटतं.


एकट्या क्षंणी क्षितिजाच्या पलीकडे जावस वाटतं.
आपली भेट व्हावी न व्हावी तुझ्या प्रेमात पडावस वाटतं.

काय सांगु दुरवरची काहानी, एकट्या क्षंणी लिहावस वाटतं.
काय सांगु आपल्या प्रेमाची भेट
दुर जातांना सुध्दा तुला पाहवस वाटत.

तुझ्या सोबती समुद्र किनारी हातात हात घेऊन फिरावस वाटतं.
तु नसतांना तुझ्या आठवणीत रमावस वाटतं.

एकट्या क्षंणी तुझ्या सोबत सुर्यास्त पाहावसा वाटतं.

एकट्या क्षंणी तुझ्या आनंदात स्वतः ला विसरून
जावस वाटतं.

आनंतात विलीन होतानां,तुझ्या आनंतात विलीन वाहावस वाटत.
विश्वाच्या या तारकां समुहात रमुण जावस वाटतं.
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

September 27, 2021 at 08:00PM

तुझी आठवण..

धरलो तुझा हात सोडावेसे वाटत नव्हते..
काय सांगू जीवनाची पहाट,
सूर्यास्ताच्या वेळी सूर्य कधी दिसतं नव्हते.

जीवनाच्या अंतरंगामध्ये सापडले नव्हते कधी
माणिक मोती.

एकट्यानेच रस्त्याने चालावेसे वाटत होते.

अमंगळ तुझी छाया मंगळ दिशेने जात होती.

अबोल क्षंण तुझ्या सोबतीचे सोडावेसे वाटतं नव्हते.

काय सांगू तुझा स्पर्श आत्ममिलनाचे क्षंण सांगत होते.

कुटवर नेऊ तुझी आठवण,एकट्यावेळी सुध्दा तुझेच चित्र दिसत होते..
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

September 27, 2021 at 01:24PM

व्यथा जीवनाची...

शोधावा कुठे सहारा कुणाचा
भेटला न जीवनी दिलदार मनाचा
करावा विश्वास या जगी कोणावर
घात करून गेला तुकडा काळजाचा

बघून हसते दुनिया तांडव जिवनाचा
ढळू दिला न तोल कधि मनाचा
साऱ्यानिच तुडविले पायदळी त्याच्या
डाग लागू न दिला मी कधी चारित्र्याचा

कसा डोंगर आडवा यावा मलाच गरिबिचा
उरला न वाली कोणी या परिस्थितीचा
आपल्यानिच खेळ मांडला जिवनाचा
बदलायला बघतो पुन्हा काळ कोळोखाचा

किती उपसले कष्ट जन्मोजन्मी
थांबला न कधी घाम माथ्याचा माथ्यावरी
बघतो सूर्याकडे दररोज सांजवेळी
मावळून उगवेल कधी माझ्या गरिबिवरि.
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

२६ सप्टेंबर, २०२१

September 27, 2021 at 10:59AM

प्रवास

तुला न सांगताच चाललो मी माघारी
प्रवास माझा आता थेट मृत्यूच्याच घरि
करू नकोस तपास माझ्या जाण्याचा
कंटाळाच आला होता मला जगण्याचा

समजु नकोस हरलो होतो मी आयुष्याला
ञासलो होतो फक्त अशांत माझ्या मनाला
डोळे मिटून कायमचे शांत बसायचे होते
स्मशाना सारखे ठिकाण दुसरे कुठेच नव्हते

जाहलि नाहि कधि भेट तुझी डोळ्यास मझ्या
एक तरि हार घालसिल का तु फोटोस माझ्या
भांडलो होतो मी सदैव या जिवनाशि
उत्तर भेटले शेवटी माझ्याच समाधिशी
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

September 27, 2021 at 10:58AM

प्रिये

डोंगराला कवटाळुन रडावे से वाटते
अशांत मन हलके जरा करावे से वाटते
सांगणार होतो माझी व्यथा तुला प्रिये
तुला का शब्द आता माझे नकोसे वाटते

घायाळ ऐकटाच मी आयुष्याच्या वाटेवर
झाडाला पाठ ठेवुन जरासे बसावे वाटते
किती प्रवासी येवुन गेले सोबतिला माझ्या
तुलाच शेवटि हाक प्रिये मला मारावी वाटते

सावल्यांनिच छळले विसावा देवुन मजला
उन्हांत जावुन पुन्हा एकदा जळावे वाटते
फुलांनिच केला आहे घात माझा असा
काट्यालाच काळजाशि धरावे आता वाटते

वेडाच म्हणणार तु शेवटी पुंन्हा मजला
हुशार असुन मी थोडे नाटक करावे वाटते
कसे पचणार कोणाला सत्य माझे इथे
स्मशानाशी आता मला मैञि करावी वाटते
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

September 26, 2021 at 10:32PM

चमत्कार एखादा नकळत घडेल सुद्धा
गेलेला क्षण फिरून मागे वळेल सुद्धा

दोन पावले आपण सुद्धा टाकुन पाहू
रुंदावत गेलेले अंतर मिटेल सुद्धा

आयुष्याची रद्दी तर होणारच आहे
रंगवलेले पान कदाचित टिकेल सुद्धा

कापुन पाहू का वठलेल्या काही फांद्या
मनास त्याने नवा धुमारा फुटेल सुद्धा

पाठीवरती हात असावा सुरकुतलेला
भळभळणारा व्रण एखादा भरेल सुद्धा

झोप लागते आहे रात्री...ठीकच आहे
स्वप्नांनाही परतुन येणे जमेलसुद्धा

थर एखादा पांघरता येतो का पाहू
कमळाच्या पानागत जगणे जमेलसुद्धा
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

२५ सप्टेंबर, २०२१

September 26, 2021 at 08:55AM

जिवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या
चांगल वागणं कधी सोडायचं नाहि

थोडा उशीर नक्कीच लागेल
पण विजय नेहमी सत्याचाच होतो
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

September 25, 2021 at 11:34PM

जीवनाच्या प्रवाही ..

न येणे न जाणे न हातात काही
कुणी देत नाही कशाचीच ग्वाही
तुझा ठेवला फक्त देवा भरोसा
दिवा सोडला जीवनाच्या प्रवाही

दिव्यासोबतीने दिवा चालताना
सुखाचा दिव्याने दिवा लागताना
प्रवासात आनंदल्या या दिशाही
दिवा सोडला जीवनाच्या प्रवाही

प्रवाहात पाणी, प्रवाहात धोंडे
प्रवाहात तारु कधी भेलकांडे
किनारा दिसेना मना धीर नाही
दिवा सोडला जीवनाच्या प्रवाही

किती मृत्तिकेचे दिवे सोडलेले
शरीरात आत्मे पुन्हा कोंडलेले
अनंता तुला भेटण्या सर्वकाही
दिवा सोडला जीवनाच्या प्रवाही
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

September 25, 2021 at 11:20PM

मी जसा आहे तशी आहेस तू
होय, माझी शायरी आहेस तू

मी तुझ्यापाशी जगाला विसरतो
मंदिराची पायरी आहेस तू

पौर्णिमा नाहीच, नाही चंद्र मी
मात्र माझी चांदणी आहेस तू

मी जिच्याकाठी भटकतो जन्मभर
रम्य ती गोदावरी आहेस तू

संजयाला बोलता येते कुठे?
संजयाची वैखरी आहेस तू
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

September 25, 2021 at 10:48PM

नजरेच्या या खेळात कायम मीच हरतो,
तिच्या एका कटाक्षाने घायाळ होतो.
तिच्या डोळ्यातल्या मोहीनीने मोहुन जातो,
आणि मग स्वतःच डोळे मिटून त्या सागरात बुडून जातो.
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

September 25, 2021 at 04:10PM



स्वतः कडून चूक झाल्यानंतर
नम्रतेने माफी मागणे ,
आणि दुसऱ्याचे चुकल्यानंतर
त्याला निर्मळ मनाने माफ करणे.,
हे ज्ञानी , बलाढ्य , शौर्यशील
माणसाचे गुण असतात...
एखाद्या रानफुलांच्या बागेतून
वावरत असतांना आपोआप
पायदळी असंख्य प्रमाणात
रानफुलं चवंदले जातात .
पण तरी मात्र आपल्याला क्षमा
करून सुगंध देण्याचा अट्टहास
ते सोडत नाही..,
बस म्हणून माणसानं जगावं
असंच , कारण यातूनच
मनोरंजन आणि समृध्दीचे
मार्ग मोकळे होतात..!
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

२४ सप्टेंबर, २०२१

September 25, 2021 at 11:24AM

एखाद्याच्या उपयोगी पडतांना, त्यांना गरज असतांना त्यांना मदत करतांना तेही आपल्या उपयोगी पडतील या उद्देशाने, अपेक्षेने कधीही कोणाला मदत करू नये.. बहुतेक वेळा या बाबतीत आपल्याला निराशाच होते.. आणि उगाच रिलेशनही खराब होत चालतात..
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...