ad

प्रेम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

३० डिसेंबर, २०१४

सुरवात आपली

सुरवात आपली मैत्री पासून झाली, 
कधी कुठे मैत्रीशिवाय मनात नाही आले, 
गेले २ च वर्षाची आपली मैत्री,
पण का जाने कुणास ठाऊक, 
आता तुझ्याशिवाय मैत्री पूर्ण होत नाही, 
कळत नाही हि मैत्रीच कि दुसरा काही... 
तुझा दुरावा नाही सहन होत, 
सतत तू समोर असावी असाच वाटतं, 
तू असलीस की सुख काय नि दुख काय सगळं सारखच वाटतं, 
तू असलीस की मनातला सगळं सांगता यायचं.. 
मन मोकळं झाल्यासारखा वाटायचं, 
पण आता मनाला काय झालं आहे कुणास ठाऊक, 
मनातला जे सांगायचा आहे ते ओठावर येताच नाही.. 
का जाने कुणास ठाऊक... 
प्रेमात पडलोय तुझ्या... 
एकाच विचारणं आहे तुझ्याकडे.. 
माझ्याकडून प्रेम करवून घेशील का? 
 माझ्याकडून प्रेम करवून घेशील का?..........

२९ डिसेंबर, २०१४

तुझ्या केसात

तुझ्या केसात सजली
रेष माझी कुंकवाची
तुझ्या डोळ्यात जगली
स्वप्ने माझी आयुष्याची

तुझे हसणे साजणी
तुझे खट्याळ बघणे
तुझे दुरून ईषारे
माझे दुरून जळणे
ऐक अशी बरी नाही
थट्टा माझी पामराची
तुझ्या डोळ्यात जगली
स्वप्ने माझी आयुष्याची

तुझ्या सावळ्या रंगाचा
दंश झाला पानोपानी
त्यात कहर मांडला
तुझ्या कुरळ्या केसांनी
मेघ तुझे रूपघन
हौस माझी पावसाची
तुझ्या डोळ्यात जगली
स्वप्ने माझी आयुष्याची

२८ डिसेंबर, २०१४

चहा


चहाच्या पेल्यात 
हसणे तुझे विरघळले 
वा-यावर शुन्यात
बघणे तुझे विरघळले

चहा पितांना देखील 
मादक किती दिसावे
अंगांगात माझे
असणे तुझे विरघळले

चहा सारखी साधी
आठवण राहीली नाही
चहाच्या आठवणीत
दिसणे तुझे विरघळले


२६ डिसेंबर, २०१४

मी म्हणायचो

मी म्हणायचो
तुझ्या डोळ्यात मला एक टप्पोरं स्वप्न दिसतं.
तू म्हणायचीस छे
तुला तर कशातही काव्यच सुचतं.

मी म्हणायचो
बघ मनापासून केलेली इच्छा ही प्रार्थना असते
तू म्हणायचीस कशी रे
चिमुरडीतही तुला झाशीची राणीच दिसते

मी म्हणायचो
ती हसायची आणि गुणगुणायची आपल्याच नादात गाणी
आज यशाचे 
मेडल घेऊन आली आणि डोळ्यात माझ्या आनंदाचे पाणी


तुला पाहिले



कधी कधी अशी भीती वाटते की आपण सौंदर्याला 
शब्दात बांधून आपल्याच शब्दांच्या मर्यादेत त्याला 
बांधू तर पहात नाही? सौंदर्य सागरासमान आणि 
आपले शब्द फक्त थेंब रूप आहेत. 
यावेळेस सौंदर्याला बांधून घालायची ईच्छाच होत नाहीये, 
तर एका खुळ्या वेंधळ्याची कल्पना शक्ती प्रक्षेपित करूनच हौस भागवतोय.


तुला पाहिले साडीत 
आणि जागी ठार झालो
तुझ्यासाठी खुळा होतो 
आता वेडा पार झालो



थोडे मराठी दागिने
तुला आवडतील का?
साध्या मराठी मुलाची
सोबतीण होशील का?



तुझ्या नाकावर नथ
कानी मोत्यांच्या कुड्या
गळ्यामध्ये ठुशी येता
होणे अप्सराही वेड्या



तुझ्या नाजुक गळ्यात
चपलाकंठी शोभेल
तुझी होऊनिया धन्य
मोहनमाळ ठरेल



वाकी पाटल्या मेखला
पायी पैंजणे जोडवी
किती मोहक हवीशी
माझी कल्पना असावी



साजेसा केसात खोपा
भाळी कुंकवाचा टिळा
ईतकेच मागतो हा
तुझा साजण वेंधळा



मराठी त्या दागिण्यांची
शोभा वाढवशिल का
एका मराठी मुलाची
सोबतीण होशील का?

२५ डिसेंबर, २०१४

तुझे डोळे



अबोल तुझे डोळे नकळत
बरेच काही बोलुन जातात
काळ्या कुट्ट अंधारातही
तुझ्या अस्तित्वाची जाणीव देतात

तुझा एक कटाक्षही
माझे मन शहारुन टाकतो
अन तुझ्या एका स्पर्शाने
मोरपिस जणु भासतो

तु दिसतेस मला
अगदी एखाद्या परीसारखीच
कल्पनेच्या मोहक
विश्वात जगणारी

कळी उमलते तशीच
रोज पहाटे उमलणारी
आहेस जशी पण
तशीच मला आवडतेस

कदाचीत म्हणुनच काय
तु माझ्या मनात राहातेस
स्वतः काहीच बोलत नाहीस
हळुच इशारा मात्र करतेस
बोलत नाहीस काहीही तरीही
मनातले गुपीत सांगतेस

२१ डिसेंबर, २०१४

साधारण शी सजणारी..

♥… साधारण शी सजणारी..
आणि हळुवार लाजणारी..
गोजिरी दिसणारी..
आणि खूप गोड हसणारी...
अशीच एक मुलगी..
काल स्वप्ना मधी दिसली..
आणि मला बघून हसली..
कोण जाने कशी
माझ्या स्वप्नात घुसली..
आणि माझ्या हृदयात
घर करून बसली..
गुलाब सारखे लाल ओठ..
सागरा सारखे डोळे..
तिचे केस वेली सारखे लांब..
आणि नभा सारखे काळे
तिला मी बघितलं
श्वेत फुलांच्या वनात..
अन पूर्ण साठवल
माझ्या मनात..
तिच्या पैन्जानीचा
आवाज तसाच
कानात गुंजतो..
आणि सांगतो.आहे .
मी तुझीच आहे.!!
मी तुझीच आहे..
पण.....?
कुणीतरी माझी चादर ओढली..
आणि माझी साखर झोप मोडली..
परत कधी येशील ग प्रिये.स्वप्नात..
आता फक्त तूच आहेस या वेड्या मनात..
आता फक्त तूच आहेस या वेड्या मनात...

२० डिसेंबर, २०१४

कळेल का रे कधी

देवा तिला माझं प्रेम, 
कळेल का रे कधी ??? 
देवा तिला माझे मन, 
समजेल का रे कधी ??? 
देवा तिला माझी तडफड, 
जाणवेल का रे कधी ??
देवा ती ही माझ्यावर प्रेम, 
करेल का रे कधी ??? 
देवा तिला माझे वाहणारे अश्रूं, 
दिसतील का रे कधी ??? 
देवा तिला माझ्या भावना, 
उमजेल का रे कधी ???
देवा तिला माझी वेदना, 
होईल का रे कधी ??? 
देवा ती ही माझे दुःख, 
सोसेल का रे कधी ??? 
देवा ती ही माझं प्रेम,
स्विकारेल का रे कधी ??? 
जर.....!!! असे काहीच नाही झाले, 
जर तु तिला माझे नाही केले..... तर.....!!!
माझं स्वतःच अस्थित्व मिटवून,
तुझ्याकडे मागेल मी मरण ती दुरावण्या आधी.....
तुझ्याकडे मागेल मी मरण ती दुरावण्या आधी.....

१९ डिसेंबर, २०१४

♥♥तुझ्यावर प्रेम करण्यासाठी♥♥

तुझ्याकड़े पहाण्याचा तो पहिला क्षण
आज मला खुप आठवतो..
तुझ्यासाठी वेडा होणारा तो माझा मन
मला खुप हसवतो..
तुझ ते माझ्या कड़े पाहण
हळूच काहीतरी इशारे करण
माझ्याकड़े बघून हसण..
अचानक नजर फिरवून लाजन
अस वाटत क्षणभर थांबाव तुझ्यासाठी..
तुझ्या त्या प्रेमळ सोबतीसाठी.
तुझ्या सोबत जीवन जगण्यासाठी..
♥♥तुझ्यावर प्रेम करण्यासाठी♥♥

१७ डिसेंबर, २०१४

माझी चुक

माझी चुकी नाही कि मी तुझ्याकडे सारखा बघत राहतो ..♥
माझी चुकी नाही कि मी तुला सारखा कॉल आणि मेसेज करतो..♥
माझी चुकी नाही कि मी तुला इतका लाईक करतो...♥
माझी एवढीच चुकी आहे कि मी तुझ्यावर 
माझ्यापेक्षा हि खूप खूप खूप जास्त प्रेम करतो...♥♥

१४ डिसेंबर, २०१४

तुझ्या प्रत्येक सुखात

तुझ्या प्रत्येक सुखात
भागीदार व्हायचं ...
तुझ्या प्रत्येक दुखात तुझा
आधार व्हायचं .....
तुझ्या प्रत्येक श्वासातला
श्वास व्हायचं .....
तुझ्या प्रत्येक ठोक्यातील
भाग व्हायचं... ...
तुझ्या मनातील वेदनांचे
मलम व्हायचेआहे.....
देवा जवळच्या प्रार्थनेतील
मागणं व्हायचं... .
तुझ्या अंधारलेल्या जीवनातील
दिवा व्हायचं... ..
तुझ्या डोळ्यातील स्वप्न व्हायचं
तुझ्या हसण्याचे कारण
व्हायचे आहे....
श्वासाच्या शेवटल्या क्षण
पर्यंत तुझ व्हायचं...

१३ डिसेंबर, २०१४

खरे प्रेम

खरे प्रेम असावे…..
कमळासारखे,
जे पाण्याची साथ कधीच सोडत नाही, त्याच्याशि वाय ते कधीच उगवत नाही….
खरे प्रेम असावे…..
गुलाबासारखे,
जे कोमल आणि सुगंधी जरी असले,
तरी काटयाची साथ कधीच सोडत नाही….
खरे प्रेम असावे…..
आकाशासारखे विशाल व विस्तीर्ण. .
कुठेही गेले तरी न संपणारे,
सदैव आपल्या बरोबर असणार कारण…..
प्रेम हा काही खेळ नाही,
टाइम-पास करण्याचा तो वेळ नाही

११ डिसेंबर, २०१४

प्रेमाच्या वेलीवर

प्रेमाच्या वेलीवर सर्वच फ़ुले फ़ुलतात असे नाही जीव जेवढा आपण लावावा तेवढा सर्व लावतात असे नाही प्रेमा सारखे बंधन ज्याला सिमा नसतात हे आपण जाणतो पण प्रेमाच्या बंधनाला सर्वच जाणतातच असे नाहीकुणी तरी म्हटलय प्रेमा मध्ये हातावरील रेषांना ही.. आपल्या वाटा बदलाव्या लागतात पण त्या वाटा बदले पर्यंत सर्वच थांबतात असे नाही..

१ सप्टेंबर, २०१४

तिच नाव लिहून लिहून पुसायला विसरून जातो

तिच नाव लिहून लिहून पुसायला विसरून जातो
तिची जेव्हा आठवण काढतो विसरायला विसरून
जातो...
फार काही सांगायचं असत तिला जे हृदयात आहे
पण जेव्हा पण भेटतो ऐकवायला विसरून जातो...
भेटल्यावर अजून थोडा वेळ तिनं थांबावं असं वाटतं
पण ती भेटली कि तिला थांबवायचं विसरून जातो.....
आता तिच्या शिवाय दिवस सरता सरत नाही
पण नेहमी स्वप्नात तिला हे सांगायच विसरून
जातो...
माझी प्रत्येक संध्याकाळ सांगते विसर तिला आता
पण सकाळ झाली कि तिला विसरायचं हेच विसरून
जातो ....
तिला विसरायचं हेच विसरून जातो .........

हसता हसता डोळे अलगद

हसता हसता डोळे अलगद
येतीलही भरून,
बोलता बोलता शब्द
ओठी जतीलही विरुन,
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल
काही नाही,
कुणीतरी आठवण काढतयं,
बाकी काही नाही!!
मोबईल वाजण्याआधीच
तो वाजल्यासारखा वाटेल,
जुनाच काढुन एसएमएस
वाचवासा वाटेल,
दिवस सरता वाटत जाईल उगाचच
उदास,
पावलोपावली जड होत जाईल
बहुधा श्वास,
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं
बिलकुल काही नाही,
कुणीतरी आठवण काढतंय,
बाकी काही नाही!!!
जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका,
घरचे म्हणतील
सारखा कसा लागतो उठता बसता.
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे
थोडे.
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे
थोडे.
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल
काही नाही,
"कुणीतरी आठवण काढतंय,
बाकी काही नाही!!!

हसतेस एवढी छान की,

हसतेस एवढी छान की,
हसत रहायला शिकवलेस तू..
बोलतेस एवढी छान की,
बोलत रहायला शिकवलेस तू..
लाजतेस एवढी छान की,
मला आवडायला लागलीस तू..
जीव एवढा लावलास की,
प्रेम करायला लावलेस तू,
किती प्रेम करतेस तू..
एवढ प्रेम नको ना करूस,
मग काय झाल अचानक..
सोडून मला का गेलीस तू,
गेलीस तर गेलीस..
पण तुला विसरु कसा,
हे शिकवायला विसरलीस बघ तू..
ए,
ते शिकवायला तरी परत येशील ना गं तू..???

८ ऑगस्ट, २०१४

जिवन



मोर नाचताना सुद्धा रडतो…
आणि..
राजहंस मरताना सुद्धा गातो….

दुःखाच्या रात्री झोप कुणालच लागत नाही…
आणि.. सुखाच्या आनंदात कुणीहीझोपत नाही

यालाच जिवन म्हणतात…..

तू आणि मी..!!



पाऊस आणि जमीन यांच किती सुंदर प्रेम.

जमीन झेलायला आतुर पावसाचा प्रत्येक थेंब,

माझ्या जीवनात तू पावसासारखं बरसावं,

त्यासाठी मी रात्रंदिवस तरसावं,

तू बरसण्यासाठी आणि मी तरसण्यासाठी,

एकच गोष्ट आवश्यक आहे,

ती म्हणजे, तू आणि मी..!!

१० जुलै, २०१४

असाव कोणीतरी

असाव कोणीतरी वाद घारणार...
खोचा रुसवा आणून पुन्हा आपल्यावरच रागवणार...

असाव कोणीतरी मन मोकळ बोलणार काहि न सांगता अगदी मनातलं ओळखणारं


२० जून, २०१४

तिच्या सुंदर डोळ्यात



तिच्या सुंदर डोळ्यात दिसतं काहीतरी मला

तिच्या नाजूक ओठांवर दिसतं काहीतरी मला

तिच्या त्या घायाळ नजरेत दिसतं काहीतरी मला

तिच्या निर्मळ मनात दिसतं कहीतरी मला

साधी आहे खूप ती म्हणून मनातल बोलायला जमत नाही 

जवळ आली की काय बोलावं हेच कळत नाही मला

वाटतं कधी कधी वाटतं मला की सांगावं तिला किती प्रेम करतो तिच्यावर मी

पण दूर होईल ती माझ्यापासून आणि गमवून बसेन तिला कायमचा एक मैत्रीण म्हणून

कदचित म्हणूनच सुप्त भावना मनातली दडवून ठेवतो मी


Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...