ad

सुंदर प्रेम कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सुंदर प्रेम कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

३० डिसेंबर, २०१४

heart touching love story

तुझ्या रुपात मन कैद माझे झाले. तो कविता वाचत होता. 
"गप रे" ति वैतगली होति. 
जरा सिरीयस बन. 
२ वर्षे झालीत.. बाबा मागे लागलेत लग्नासाठी.. 
 माझा हो कळव.. तो हसत म्हणाला.. 
अन काय कळवणार? 
तुला ना नोकरी, ना काहि व्यवसाय. 
अरे लग्न म्हणजे गंमत नाहि. 
अग गंमतच आहे. लग्न म्हणजे सहजिवन, 
प्रेम, एक मेकात आडकण.
लग्न म्हणजे संलग्न. वेडा आहेस. 
अरे लग्न म्हणजे संसार, म्हणजे घर, दुध, किराणा, मुल, म्हणजे पैसा..
ति म्हणाली हातात हात तुझा, 
अन तुझी साथ. 
पैसा येइल. येतो. तो म्हणाला पैसा म्हणजे परसातल प्राजक्ताच झाड नाहि. 
हालवल कि फुलांनी आंगण भरुन जात..
तिन फटकारल.. 
 अग पण, तो बोलायच्या आतच ति म्हणाली.. 
पैसा कि प्रेम हा वाद विवाद कालबाह्य आहे.. 
प्रेमाच्या जागी प्रेम आहे, 
अन पैसा त्याच्या जागि. तु मल खुप आवडतोस.. 
पण तु मला विचार करुन निर्णय दे. 
तिन अल्टिमेटम दिला.. 
 १५ ऑगस्ट चा दिवस होता आज खिशात पैसे होते. 
दिवस तिच्या बरोबर मजेत घालवायचा होता. 
त्यान तिला फोन केला.बर झाल, फोन केलास, 
मला पण तुझ्याशी बोलायच आहे.
ति म्हणाली. नो प्रोब्लेम.. ताज मधे भेटु. काय?.. 
ति उडालीच. ताज च्या थंडगार वातावरणात, 
ति सुखावलि होति. मग काय ठरल?.
तिन विषयाला हात घातला.
तो बोलतच नव्हता. मी थांबु शकत नाहि. 
हि आपली शेवटची भेट.. तिच्या बोलण्याला धार होति.. 
 तो आतुन तुटत चालला होता..प्लिज.. 
अरे प्लिज काय? सारच कठीण आहे.ति म्हणाली. मी निघते? ..
प्लीज थांब, मला एक संधी दे..तो म्हणाला. 
तु फक्त एक वर्ष दे मला, तुल पाहिजे तेवढा पैसा देतो...
तो म्हणाला. ति खळखळुन हसली."
 वेडा रे"अरे पैसा म्हणजे?... 
आय नो. त्यान वाक्य तोडल."किति पैसे लागतात संसाराला? 
लाखो रुपये ति म्हणाली..ठीक आहे. एक डिल.तो म्हणाला. 
आपण पुढच्या १५ ऑगस्ट ला आपण इथच, 
ताज मधे,संध्याकाळी. ७ ला भेटु. 
अन काय करु..तिन विचारल.. 
मी त्या दिवशी तुझ्या पायावर ७५ लाख रुपये ओतिल...
तुला संसारा साठी. त्या
 चित्रपटांत हिरो हिरॉइन ला नोटांनी अंघोळ घालतो तशी.अंघोळ घालीन... 
तो हसत म्हणाला."मॅड आहेस." 
पण म्हणुनच तु मला आवडतो.ति.. पण वचन दे, 
वाट पहाशील म्हणुन.. तो म्हणाला. ठिक आहे, 
पण ७५ रुपये तरी आणशील अस वाटत नाहि. ति हासली.
 ..... continue..... ठिक आहे, पण ७५ रुपये तरी आणशील अस वाटत नाहि. 
ति हासली. १५ ऑगस्ट.. 
तो तिचि ६ वाज ल्या पासुनच वाट पहात होता. 
तेच टेबल होत, मागच्या वर्षीच, ति ये‌इल? 
तो अस्वस्थ होता ७ वाजायला आले होते, 
अन तेवढ्यात ति आत येताना दिसली. 
तिच्याशी नजरानजर होतच त्यान हात हलवला. 
हाश हूश करत ति समोरच्या खुर्चीवर बसली. 
 कशी आहेस? फार गरम होत आहे. 
पहिल पाणी पिते. 
म्हणत उठुन ति त्याच्या समोरच्या ग्लास घ्यायल वाकली. 
ति वाकली असताना, 
त्याला ब्ला‌उज मधे लपवलेल्या मंगळसुत्रचा पदर दिसला. 
अग मी मागवतो म्हणेपर्यंत तिन ग्लास तोंन्डाला लावला होता. 
 अरे फार पाणी पाणी झाल होत.. 
हं आता बोल. काय बोलु? तुच सांग. 
तिच्याकड बघत तो म्हणाला. 
मग काय? कुठे आहे ७५ लाख? ति हसत म्हणाली.. 
त्याचा चेहेरा पड्ला होता., नाहि जमल, 
तु म्हणालीच तेच खर. ७५ लाख काय ७५ रु जमले नाहि. 
पैसा मिळवण कठिण आहे.. 
 जा‌उ देत, मला माहित होत, 
ति समजावणीच्या स्वरांत म्हणाली. 
मल पण तसच वाटत होते. 
पण म्ह्टल तुला शब्द दिला होता... 
तो बघत होता..अजुन काय? 
पडलेल्या चेहे~यानि तो म्हणाला. 
सांगु ति म्हणालि.. अरे माझ लग्न झाल, 
घरचे मागे लगलेच होते. 
तो बॅन्केत आहे, १ बेडरुम च घर आहे... 
तुझ अस.. ति म्हणाली. सॉरी.. 
 तुझ खर आहे., तु ठीकच केल, माझ्याबरोबर.... 
वायाच गेल असत. तो म्हणाला.. ठीक आहे. 
मी निघते, तुला आता अस भेटण बर नाहि...ति. बरोबर आहे. 
निघते.. ति म्हणाली.. तो तिच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता.. 
 तो बराच वेळ तो बसुन होता. सार संपल होत. 
रुम च्या नोकरानि टॅक्सीत सामान भरल.. 
सर कुठे? टॅक्सी ड्रायव्हर ने विचारले. 
सहारा एयर पोर्ट. ईंटर नॅशनल टर्मीनल. 
 टॅक्सी वेगात चालली होति, गार हवेच्या सपक्यान डोक शांत होत होत. 
विमान तळावर टॅक्सी थांबली, त्यान ट्रॉलीत लगेज भरल.
व भाड देवुन तो निघाला, सर,टॅक्सी ड्रायव्हर ने हाक मारली, सर, 
तुमची बॅग राहिली आहे, त्यान टॅक्सी ड्रायव्हर कड बघितल, 
अन म्हणाला बॅग तुला राहु देत, त्यात ७५ लाख रुपये आहेत. 
नाहितरी, मला आता त्याचा काहिच उपयोग नाहि, 
 ड्रायव्हर बराच वेळ त्याच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता






२० डिसेंबर, २०१४

हवाई सुंदरी

एक हवाई सुंदरी होती,
ती दिसायला तर सुंदर होतीच
पण त्यापेक्षाही सुंदर
तिची आपल्या नवर्यावर प्रेम
करण्याची पद्धत
होती .............. जेव्हा जेव्हा ती बाहेरच्या देशात
असे तेव्हा तेव्हा ती रोज एक
गुलाबाचे फुल
आपल्या नवर्याला पाठवत असे,
आणि जाणवून देत असे
कि मी कुठेही असले तरी मनाने मी फक्त तुझ्या जवळच
आहे ....................
ती दुसरीकडे
असताना तिच्या रोज
येणार्या गुलाबाच्या फुलाची तिच्या नवर्याला आता सुखद
सवय झाली होती ........... पण, कदाचित त्या हवाई सुंदरीचे हे
सुंदर प्रेम देवालाही आवडले
असावे म्हणून कि काय पण देवाने
तिला आपल्याकडे बोलावून
घेतले, तिच्या विमानास
अपघात झाला आणि बिचारी आपले
प्राण गमावून
बसली .....................
हि बातमी ऐकून
तिचा नवरा एवढा रडला कि उभ्या आयुष्यात
तो कधी एवढा रडला नसेल किंवा त्याच्या इतके
कोणी एवढे रडले नसेल ..................
पण इथे तिचे प्रेम संपले नव्हते, ते
तर आता सुरु झाले होते,
तिच्या दुर्दैवी मृत्युनंतर देखील
रोज त्याला गुलाबाचे फुल मिळत होते...............
हे बघून तिचा नवरा आश्चर्य
चकित झाला व ह्या मागाचे
कारण शोधण्यासाठी त्याने
रोज फुल घेऊन येणार्या मुलास
विचारले तिचा नवरा :- तुला हे फुल कोण
देत नक्की, माझी बायको मरून
१५ दिवस झाले तरी तू रोज फुल
आणून देत आहेस, नक्की प्रकार
काय आहे ?
मुलगा :- साहेब, तुमची बायको तुमच्यावर खूप
प्रेम करते,
तिची विचारशक्ती खूप
पुढची होती, म्हणून तिने आधीच
विचार करून ठेवला होता कि,
"जर कधी विमानास अपघात झाला तर माझे जीवन संपेल पण
प्रेमाला कधी संपवायचे नाही"
आणि ह्या विचाराने तिने
मला आधीच भरपूर पैसे देऊन ठेवले
आहेत जेणे करून आयुष्यभर
ती आता तुम्हाला रोज एक गुलाबाचे फुल देऊ शकेल ....
आणि तिचे नसणे
सुद्धा तुम्हाला असण्याची जाणीव
करून देईल.

१ सप्टेंबर, २०१४

कॉलेज

कॉलेज केव्हाचं सुरु झालंय.सर्वक्लास पुर्णपणे भरलेत.तिसर्या पिरेडची बेल वाजली.लाट मॅडमचा पिरेड संपला होता.मॅडम अजुन जायच्या होता.पौर्णिमा गडबडीने क्लासमध्ये आली,पावसाने चिँब भिजली होती ती.मॅडमांना काही सांगायची गरज नव्हती,पावसामुळेउशीर झाला असेल म्हणुन त्यांनी तिला बसायला सांगितलं आणि त्या निघुन गेल्या.प्रदीप पौर्णिमाला सारखं विचारत होता.एवढं भिजत यायचीकाय गरज होती?एक दिवस आली नसतीस तर चाललंअसतं ना....ती म्हणाली,हो पण तुला एक दिवस न बघणं चाललं मला चाललं नसतं.प्रदीप अलगद खाली बघुन हसला.किती प्रेम आहे तुझं माझ्यावरअसं म्हणुन तिच्या हातावर हात ठेवला.तिचं अंग खुपच तापलं होतं.त्याला एकदम चटका बसला.अगं तुला तर खुप ताप आलाय आणि तरीही तु इथवर आलीस.तुला तर ना मी आता..,.पुढे काही बोलण्याच्या आतच कांबळे सर तिथेआले,प्रदीप लगेच आपल्या जागेवर गेला.आणि सर्वजण gd moning sirम्हणत उभे झाले...sit downपौर्णिमा सोडुन.... पौर्णिमाला उभं राहायला सांगितल्याबद्दलसर्वच आश्चर्यचकित झाले.प्रदीप जरा जास्तच आश्चर्यचकित झाला.....कांबळेसरःबाळ तुला इतका उशीर का झाला?(सर थोडे कडक शिस्तीचे होते,त्यांनी तिला उशीरा येताना पाहीलं होतं)...पौर्णिमाःसर पाऊस आला होता?..पाऊस आला होता तर यायचं नव्हतं कॉलेजला,हात पुढे कर....तिने हात पुढे केला सर तिला छडी मारणार तेवढ्यात प्रदीप ओरडला सर थांबा....ती वेळेवर आलीय हवंतर विचारा सर्वांना...हो का?मी प्रत्यक्ष पाहीलं नसतं यावर विश्वासही ठेवला असता कदाचित,..असं म्हणुन ते पुन्हा छडी मारणार तेवढ्यात तो पुन्हा मधी बोलला.आता ते चिडले आणि पहीला त्यालाच छडीने सरांनी हाणलं.प्रदीप ने पौर्णिमाला पुरपुर वाचवण्याचा प्रयत्न केला.पण तिसर्यावळी सर तिला मारताना तिने डोळे मिटले आणि धाड करुन खिडकीचे दार वार्याने धडकले गेले.तिने डोळे उघडले तेव्हातिथे कोणीही नव्हतं.सर्व बँचेस मोकळे होते.बाहेर धो धो पाऊस पडत होता.तिच्या आईने लगबगीने छत्री घेऊन वर्गात प्रवेश केला.....मित्रांनो या कथेला इथे थोडा pause देऊया. आत्ता तुम्ही म्हणाल तिथे कोणीचनाहीये,सर्व कोठे गेले...सांगतो...पणहे सांगण्यासाठी मला तुम्हाला थोडं PASTमध्ये न्यावंलागेल.चला तर मग...एका वर्षापुर्वी...आजपासुन बारावीचे एक्झाम्स चालु झालेत.प्रदीप आणि पौर्णिमा हे वेगवेगळ्या कॉलेजचे पण त्यांचा exam no एकाच कॉलेजमध्ये एकाच क्लासमध्ये पडला आहे.त्यामुळे ओळख वाढवण्यासाठी प्रदीप सुरुवात करतो...हाय माझं नाव प्रदीप...तीःआणिमाझं पौर्णिमा.,.तोःरागावणार नसशील तर एक सांगु का?तीःहो सांग ना.तोःतु खुप सुंदर आहेस.तुझ्या कपाळावर एक चंद्रकोर असती ना तर त्या चंद्रकोरीलाही तुझ्यामुळे शोभा आली असती.ती लाजुन थँक्स म्हणाली.त्याचा हा कॉन्फीडंस आणि स्पष्ट वक्तेपणा तिला खुप आवडला.अशी त्यांची मैत्री झाली.दोनतीन पेपर व्यवस्थित गेले पण एका पेपरच्यावेळी तिच्या पायात कोणीतरी कॉपीटाकली जे तिला कळलं नाही.त्यावेळेसचनिरीक्षकांच्या नजरेत ही कॉपी पडल्यावर त्यांनी पौर्णिमाला जबाबदार धरलं.ती खुपच विनंती करुन त्यांना सांगत होती किही माझी कॉपी नाही।पण त्यांनी ऐकलंनाही शेवटी प्रदीपने तो आळ आपल्या डोक्यावर घेतला आणि तो म्हणाला,सर ही कॉपी माझी आहे आणिती मीच हिच्यापायात टाकली होती.त्यामुळे त्या सरांनी पौर्णिमाला सोडुन प्रदीपच्या पेपरवर लाल शेरा मारला.पौर्णिमेला माहीत होतं की हा खोटं बोलतोय कारण इतका स्मार्ट मुलगा कॉपी कसा काय करेल?पेपर संपल्यावर ते भेटले तेव्हा तिने स्पष्टच विचारलं.तुकॉपी केली नसताना ती तुझि कॉपी आहे असं का म्हणालास?...तुला वाचवण्यासाठी....पण का?तु कोण आणि मी कोण आपलं नातच काय?दोन दिवसाच्या मैत्रीखातर कोणी असं करतं का?बरोबर आहे कदाचित.पण दोनदिवसाच्या प्रेमाखातर असं कोणीही करु शकतं,नाहि?...म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम....हो तुला बघताक्षणीच झालं होतं ते पण प्रपोज असं करावं लागेल याची जरादेखील कल्पना नव्हती मला.बोलकरशील माझ्याशी लग्न?तिला त्याची एक वेगळी पद्धत,स्पष्टपणेबोलणं आवडलं आणि तिने पटकन हो म्हटलं।काहि दिवसांनी एकाच कॉलेजमध्ये त्यांचं अॅडमिशन झालं.त्यांचं प्रेम फुलत गेलं.पण एक दिवस कॉलेज भरलेलं असताना धो धो पडणार्या पावसाने कॉलेजच्या बिल्डींगचा एक भाग कोसळला.त्यामध्ये चाळीस विद्यार्थी,विद्यार्थींनीचा मृत्यु झाला आणि 100 च्या वर जखमी झाले...प्रदीपचंनाव मृतांमध्ये होतं तर पौर्णिमाचं जखमींमध्ये होतं....होत्याचं नव्हतं झालं.उकळत्या दुधामध्ये विरझण पडावं तसं त्यांच्या प्रेमामध्ये दुर्दैवाने उडी घेतली होती.पौर्णिमाचाजीव तर वाचला पण तिच्या मनावर या घटनेचा जबर मानसिकआघात झाला तिच्या पालकांनी यावर उपचारासाठी प्रयत्न केले पण तिने योग्य प्रतिसाद दिला नाही.....तेव्हापासुन आजपर्यँत जवळजवळ रोज ती कॉलेजमध्ये येत असते.आजतर तिने कहरच केला 100 डिग्रीचा ताप आला असतानादेखील ती कॉलेजमध्ये पावसात भिजत आली होती.त्या खिडकीचीदारे सुटलेल्या वार्याने धडकत होती,तिचे केस उडत होते.तीची आई छत्री घेऊन तिथे आली.आणि पौर्णिमाला भिजलेल्या डोळ्यांनी म्हणाली,कितीवेळा तुला इथे आणायलायायचं बाळ.रोज तु न सांगता इथे येतेस.काय झालंयते तरी सांग.आजपर्यंत तुला कितीवेळा समजावलं पण आज फणफणत्या अंगाने सुद्धा तु इथे आलीस.असं म्हणत त्या पौर्णिमालाघेऊन गेल्या.त्यांना माहीत होतंकी हीला मानसिक आजार झालाय.पौर्णिमाला याची कल्पना दिला गेली असतानादेखील तिने उपचारास नकार दिला.हा माझा मानसिक आजाराच का असेना पण तो मला रोज भेटतो हेच माझ्यासाठी खुप आहे.उपचारानंतर तो मला कधीही दिसणार नाही म्हणुन आजपर्यँत ती उपचार न घेता तशीच राहीली...फक्त त्याच्यासाठी.,....मित्रांनोपौर्णिमाने प्रदीपवर केलेल्या नितांत प्रेमासाठी,त्याच्या एका भेटीसाठी तिला झालेल्या मानसिक आजारालाच तिनं आयुष्य बनवलं.म्हणुनच पौर्णिमेच्या आयुष्यात कायमची आमावस्या आली.

💕एकदा वेड आणि प्रेम ह्या दोघांनी

💕एकदा वेड आणि प्रेम ह्या दोघांनी
लपा-छपी खेळायचे ठरवले,
💕वेड्यावर राज्य होत, तो १,२,३
....असे आकडे म्हणू लागला,
💕इकडे प्रेम लपण्यासाठी जागा
बघत होत, पण प्रेमाला प्रेमाची
जागाच मिळत नव्हती,
💕वेड्याचे
आकडे जेव्हा संपत आले तेव्हा
प्रेमाने पटकन समोरच्या झुडपात
उडी टाकली,
💕 ते झुडूप गुलाबांच्या
फुलांच होत आणि तेथे प्रेम लपून बसलं .............
💕वेड्याने प्रेमाला भरपूर शोधलं,
पण प्रेम काही मिळाले नाही,
💕शेवटी स्वताहाची हार
सहन न झाल्या मुळे
वेड्याने चिडून समोरच्या झुड्प्यात
जोराने काठी खुपसली व
बाहेर काढली ........
💕बाहेर काढल्या नंतर काठीला
लागलेलं रक्त बघून
वेड दचकला त्याने झुडूपा मध्ये
वाकून बघितलं,
💕तेव्हा तिथे त्याला हसत
असलेल प्रेम दिसलं,
💕पण तो पर्यंत ते प्रेम आंधळ झाल
होत कारण ती काठी त्या प्रेमाच्या
डोळ्यात खुपसली गेली होती ..........
💕ते पाहून वेड खूप रडला आणि
त्याने प्रेमाला वचन
दिले कि इथून पुढे तू माझ्या
डोळ्यांनी बघशील
💕म्हणजेच मी नेहमी तुझ्या आधारासाठी
तुझ्या बरोबर राहीन .............
तेव्हा पासून प्रेम हे आंधळ आहे
आणि प्रत्येक जण प्रेमात वेडा आहे.
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नका
सोय म्हणून सहज असं तोडू नका
रक्ताचं नाही म्हणून,
कवडीमोल ठरवू नका..
भावनांचं मोल जाणा ,
मोठेपणात हरवू नका.
आयुष्याच्या प्रत्येक वळणात
नवं नातं जुळत असतं,
जन्मभर पुरेल इतकं भरून
प्रेम मिळत असतं,
तुम्ही फक्त ओंजळ पुढे
करुन पहा,
कमीपणा मानू नका,
व्यवहारातलं देणं घेणं
फक्तं मध्ये आणू नका..
मिळेल तितकं घेत रहा,
जमेल तितकं देत रहा,
समाधानात तडजोड असते
फक्त जरा समजून घ्या
'नातं ' म्हणजे ओझं नाही,
मनापासून उमजून घ्या..
विश्वासाचे चार शब्दं ..
दुसरं काही देऊ नका
जाणीवपूर्वक 'नातं' जपा..
मध्येच माघार घेऊ नका...
.
शब्दांना भावरूप देते,
. . . तेच खरे पत्र ॥
नात्यांना जोडून ठेवते,
तेच खरे गोत्र ॥
नजरे पल्याड पाहू शकतात तेच,
खरे नेत्र ॥
दूर असूनही दुरावत नाही,
तेच खरे मित्र. ॥॥

८ ऑगस्ट, २०१४

एक हृदयस्पर्शी कथा.... तो अजुनहि झोपलाच होता,





एक हृदयस्पर्शी कथा.... तो अजुनहि झोपलाच होता,
वर टांगलेल सलाईन
वाऱ्या निशी हालत होत.
त्यातून टपकनारे थेँब
त्याच्या रक्तात भिनत
होते.झोप कसली येत होती त्याला...??
उघड्या डोळ्याने तो एकाच
ठिकानी बघत होता.
त्याची आई औषधे व गोळ्या घेवून
आली, त्याला थोडे फार
खाण्याची विनंती केली. पण
त्याने गप्प राहून नकार दिला,
आई गेल्यानंतर त्याने
एका हाताने औषधे व
गोळ्या घेतल्या........ . घड्याळाच्या टोलानीँ त्याचे
लक्ष वेधले. सहा वाजले होते,
त्याने चटकन चादर
बाजूला केली ' अरे बापरे ! क्लास
तर संपून गेला असेल ' अंगात
एवढेही बळ नसताना त्याने हातातली सुई खेचून
काढली. भळ-
भळनाऱ्या रक्तावर
कापसाचा बोळा पकडून
तो सायकल जवळ गेला.
त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नव्हत. भर पावसात
तो सायकल घेवून क्लासकडे गेला.
क्लास तर केव्हाच संपून
गेला होता. बहूतेक सर्वजण
घरी निघून गेले होते
थोडी पावसाची भूर-भूर चालूच होती.... ती आजून
हि क्लासच्या बाहेरत्याची वाट
पाहत
उभीच
होती. त्याला बघितल्यावर
तिचे डोले चमकले. तिला त्याचा राग आला होता,
झपझप चालत
त्याच्याजवळ पोहचली.
त्याच्या डोक्यावर छञी पकडून
त्याचा कान धरला, "तू
आजारी असताना इथं का आलास ?
आणि पून्हा छञी विसरलास,
बापरे ! किती पाणी"
त्याच्या डोक्यावरून
पाणी झटकत ती म्हणाली,
"पूर्ण ओला झालाय आणि मग
सर्दी झाली म्हणजे मलाच
म्हणशिल......" अरे ! किती बडबड
करते मी ? जाऊ दे बरं, डाँक्टर
काय म्हाणालें तब्येत कशी आहे?
दोघेही क्लासच्या बाहेर पायरीवर जाऊन
बसले. तो अजूनही काकडत होता.
तिच्या डोळ्यामध्ये त्यांचे
बावरलेलं मन स्वत:ची खोलवर
रूजलेली प्रतिमा शोधत
होत. तिचे निरागस डोळे माञ
सदैव त्याच्याच चिँतेत बूडालेलेदिसत
होते.
त्याच्या अतिभोळेपनाची तिला काळजी वाटायची,
त्याच्या प्रेमाच्या वेडेपणाची सीमा अजून
तिलाही ठरवता आली नव्हती.
त्याच्या कपाळावर तिने हात ठेवला आणि ती दचकलीच,
" बाप रे ! किती भयंकर ताप
आलाय तूला ! अन, तरी तू
एवढ्या पावसात
मला भेटायला आला?
तूला काही झालं म्हणजे? नाही मीच
वेडी आहेँ. मीच थांबते ना !
आता मी थांबणारच नाही, तू
बघच मी, थांबतच नाही ! असं
द्रृष्ट लागण्याजोगे प्रेम
बघून त्याच्या डोळ्यांमध्ये पाणी जमा झालं,बोलण्याचा प्रयत्न
करताच त्याला खोकला आला. तिने त्याला न
बोलण्याची विनंती केली.
त्याचा हात आपल्या हातात
घेताच, तिने हातावरुन
ओघळणारे लाल रक्त बघीतले.
ती यावेळी माञ चिडलीच, "तू हे काय केलंस? तू सलाईन
काढले ना? का स्वता:ला ञास
करून घेतोस?
तुला होणाऱ्या वेदना काळजात
सूई प्रमाणे घुसतात,जा !
मी बोलणारच नाही. अरे तुला काही झाले म्हणजे
मी आणि माझे जीवन........... ..."
त्याने तिच्या ओठांवर
हात ठेवला. पुढचे शब्द
काळजाला चिरणारे
होते.त्याच्या डोळ्यातून थेँब
ओघळला. तिच्या निस्सिम
प्रेमासाठी-
आणि तिच्यासाठी,तरीह ी त्याच्या डोळ्यातल्या अश्रुनी तिला अस्वस्थ
करुन टाकले.
तिच्याहि डोळ्यांतून
पाणी टपकत होते,"खरच,
इतक प्रेम करतोस का रे
माझ्यावर... मग का असा ञास
देतोय? तुझ्या या वेडेपणानेच
मला वेड
लावंल-तुझ-तुझ्य
ा प्रेमाचंमी सुध्दा इतकी वेडी आहे
ना- मी थांबते म्हणून तर तू येतोस.
दोघेपण अगदी वेडे आहोत.
तिने त्याच्या खांद्यावर मान
टेकवली. तिचे डोके थापटत, तो माञ
कुठल्यातरी वेगळ्याच विश्वात
हरवून
गेला होता, तिथे फक्त
तिच्या बांगड्यांची किण-किण
आणि तिचा आवाज कानी येत होता. तेवढ्यात
त्याच्या सरांची थाप
त्याच्या पाठीवर पडली, "
काय रे ? केव्हाचा आवाज देतोय-
काय करतोय इथं एकटा ?
एवढ्या पावसात का बसलाय ? घरचे म्हणत होते तू आजारी आहेस
म्हणुन "
सरांच्या आवाजाने तो भानावर
आला.... त्याने मान
डोलवली. सर आत निघून गेले. भरलेल्या डोळ्यानी किँचित
मागे वळूनपाहिले.
क्लासमध्ये
टांगलेल्या तिच्या फोटोची माळ
वाऱ्यानिशी हालत होती.
ती क्लास मधली एक हूशार विद्यार्थीनी होती...!!! सर्व
काही द्रृष्ट
लागल्या प्रमाने घडून गेलं होत.
स्वप्नाहूनही सुंदर
अशा त्यांच्या दुनियेवर काळाने
अशी झडप घातली कि त्या दुनियेतील
सर्व सुख काळ
आपल्या बरोबर घेऊन
गेला होता. फुलांआडून
डोकवणाऱ्या तिच्या डोळ्यामध्ये
घोर चिँता दिसून येत होती.
कोण समजून घेणार
माझ्या या वेड्याला ? कोण
शिकवणार याला माझ्याशिवाय जगणं?
कोणी जपेल
का याला माझ्याप्रमाणे? असे
अनेक प्रश्न तिला पडले
असावे. त्याचे मन माञ
एखाद्या वेड्या हरणाप्रमाणे तिच्या सावलीमागेच पळत
होतं, ते हेमानायला तयारच
नव्हत की तिच अस्तित्व
आता संपलय म्हणून. असे सावल्यांचे खेळ-आभास
त्याच्या जिवनाचा एक भागच
बनून गेले होते. ह्रूदयात जपून
ठेवलेल्या तिच्या आठवणी अश्रु
बनुन क्षणा-
क्षणाला बाहेर पडत होत्या. तिची प्रतिमा डोळ्यामध्ये
भरून जड अंत:करनाने तो सायकल
जवळ गेला. काकडंत- काकडत
त्याने सायकल घेतली वघराकडे
चालू
लागला आणि चालता- चालता बेशुध्द होऊन पडला...... हे सर्व प्रेम होत कि वेड !
मी त्यावेळी हे सारे फार जवळून
बघितले होते.
का कुणीतरी इतकही प्रेम करू
शकत ? हे
असं कसं प्रेम होत जे म्रूत्युनंतर सुद्धा जिंवतहोत?
खरचं त्याच्या वेडे
पणाला म्रूत्युच्याही मर्यादा कमी पडल्या होत्या....
या अगोदर तो खुप
चांगला असायचा,
क्षणोक्षणी त्याच्या चेहऱ्यावर आनंद असायचा, पन
त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर
हास्य मी पहीलेच नाही. आता त्याने आपल्या मनावर
ताबा मिळवलाय.
सर्वाशी तो चांगला वागतो अगदी पूर्वीप्रमाणे.
पण फरकएवढाच आहे
की तो पूर्वी सर्वाशी बोलु
शकत होता. त्यावेळी आजारात त्याने
आपली वाचा गमावली होती.
त्या दोघांच्या सुखासमोर
स्वर्गसूद्धा फिका पडत
असावा म्हणुन
देवालाही हेवा वाटला आणि............ .... जे खरोखर चांगल घडत असतं तेथेच
नशिब तोकडे पडते
हा प्रश्न तर फार पूर्वीपासून
अनुत्तरीतच आहे. ...... असचं
नेहमी का घडतं? का ?

११ जुलै, २०१४

"तुला माझ्याबद्दल काय वाटतं ?"




लग्नाला बारा वर्ष झाल्यावर अचानक एक दिवस तिनं त्याला विचारलं ...
"तुला माझ्याबद्दल काय वाटतं ?"

तो बावचळला ... गोंधळला ... आता अशा प्रश्नांची सवय उरली नव्हती नं ... !
प्रेम नवं नवं होतं तेव्हा ठीक होतं हो ... तिच्याकडून दिवसातनं एकदा तरी हा प्रश्न यायचा आणि त्याच्याकडे ही एकदम भारी भारी उत्तरं तयार असायची ...

पण मग लग्न झालं ...
संसार नावाची प्रश्नपत्रिका सोडवता सोडवता ही असली तोंडी परीक्षा पार विस्मरणात गेली ...
आणि काल परवा अचानक हा गुगली पडला ...

त्यातून तिनं प्रश्न विचारला तेव्हा ती पोळ्या करत होती ..
हातात लाटणं ...
समोर तापलेला तवा ...
त्यानं संभाव्य धोका ओळखला ..
आणि 'सांगण्यासारखं प्रचंड आहे ..
संध्याकाळी सावकाशीनं सांगतो ...'
असं म्हणून तो कामावर सटकला ... !

तो घरातून बाहेर पडला खरा ...
पण घर काही डोक्यातून बाहेर पडलं नव्हतं .. !
अख्खा दिवस शब्दांची जुळवाजुळव करण्यात गेला ...
कठीण असतं हो ...
नात्याचं गणित एकदा भावनेत अडकलं की ते शब्दांतून सोडवणं कठीण असतं ..

तो विचार करत होता ..
काय सांगावं .. ?

मी राजा .. तू माझी राणी वगैरे काही म्हणावं का ...
नको .. फार फिल्मी वाटतं ..

तू खूप छान आहेस ...
असं म्हणावं ... नको ...
तिला ते फारच रुक्ष वाटण्याची शक्यता आहे ..
समजूतदार सहनशील वगैरे म्हणावं ...
तर ती नक्की म्हणेल ...
राजकारण्यांसारखी उत्तरं देऊ नकोस ...
त्याला काहीच सुचेना ...

बायकोला आवडेल असं वागणं आणि तिला पटेल असं बोलणं ... हे दोन्ही शिकवणारे क्लासेस असायला हवे ...
लाईन लागेल नवऱ्यांची ...
त्याच्या मनात असले भलभलते विचार येत होते ..

सूर्य मावळला ...
घरी जायची वेळ झाली ..
आपल्याला पाहिल्या पाहिल्या तिच्या उजव्या डोळ्याची भुवई वर जाणार ...
याची त्याला खात्री होती ...

घरचा अभ्यास न करता शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यासारखा त्याचा चेहरा झाला होता ...
त्यानं बेल वाजवली ..
अपेक्षेप्रमाणे तिनं दार उघडलंच नाही ..
त्याच्या मुलानं दार उघडलं ... आणि पुढच्याच क्षणी कांद्याच्या भजीचा घमघमाट नाकात शिरला ...

मुलगा जवळ जवळ उडी मारत म्हणाला ... "भजी केलीत आईनं ... पटकन हातपाय धुवून या ..."

तो मान डोलावून आत गेला ... आणि पुढच्याच क्षणी टेबलवर हजर झाला ...

बायकोनं भज्यांची प्लेट समोर मांडली ...
त्यानं विलक्षण अपराधी चेहऱ्यानं तिच्याकडे पाहिलं ...

तिनं तोंडभर हसून विचारलं .. "काही सुचलं ... ? "

त्यानं नकारार्थी मान हलवली ...

तशी ती पटकन टाळी वाजवून आनंदानं म्हणाली ... "मलाही नाही सुचलं ... ! "

तो पुन्हा गोंधळला ...
इतकी अनपेक्षित प्रतिक्रिया ... ?

आणि ती बोलतच होती ...
"काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीनं मला विचारलं ...
तुला तुझ्या नवऱ्याबद्दल काय वाटतं ... ? "

सात दिवस विचार केला ..
पण मला काही सांगताच येईना ...
मग भीति वाटली ...
माझं तुझ्यावरचं प्रेम आटलं की काय .. ?
अपराधी वाटायला लागलं - काय करावं कळेना ...
मला स्वतःविषयी शंका होती पण बारा वर्षानंतर ही तुझं प्रेम कणभर ही आटलेलं नाही याची खात्री होती.
म्हणून मग हा प्रश्न तुला विचारला ...
वाटलं .. तुला उत्तर देता आलं तर आपण 'Fault' मध्ये आहोत ..
पण नाही ... तुलाही उत्तर देता आलं नाही ...
म्हणजे आपण आता अशा वळणावर आहोत ...
जिथे फक्त 'वाटणं' संपून 'वाटून घेणं' सुरु झालंय ...
आता शब्द सापडत नाहीत ... आणि त्याची गरजही वाटत नाही ...
कारण आता एकमेकांसमोर स्वतःला सिध्द करण्याची धडपड संपलीय ... "

असं म्हणून तिनं एक कांदा भजी त्याला भरवली ...
शपथ सांगतो ...
त्याच्या बारा वर्षाच्या संसारामधला सगळा खमंगपणा त्या भजीत उतरला होता !!!

१६ जून, २०१४

वाट पाहत होतो !!

ती असायेची माझी अन, मी हि फक्त तिझाच असायेचो.. तिझ्या आनंदसाठी,मी काहीही करायेचो... ती असायेची माझी जेव्हा आम्ही बागेत फिरायेचो.....हात घेऊन हात, आम्ही झाडा खाली बसयेचो...अन नेहमी गप असणाऱ्या तिझ्या बरोबर, मी खूप खूप बोलायेचो...ती असायेची माझी जेव्हा,आम्ही lecture
मध्ये असायेचो, एका मेकांच्या बाजूला असून हि,
मी फळ्या कडे कमी, आणि तिझ्या कडे जास्त
पहायेचो... ती असायेची माझी जेव्हा, आम्ही कॉलेज संपल्यावर हि, रोज रोज घरी खोट बोलून भेटायेचो,
आणि नेहमीच्याच बागेत फिरायेचो.... अन फिरता फिरता, आमच्या भविष्याची स्वप्ने रंगवयेचो... पण...अचानक एक दिवस, ती मला सोडून गेली...
काळाचा नाही मला, मी काय घोर चूक केली...


बोलली नाही काही, फोन हि नाही केला...
मी केलेला फोने, तिने तो हि cut
केला...
मग,एक दिवस भेटली मला, अन सांगू लागली, "शेवटच झालेल भांडण मला खूप खटकलं...तुझा वागणं हि मला या वेळी नाही पटलं... राहू नाही शकत मी आता तुझ्या बरोबर... I'M sry, मी तुझं आयुष बरबाद केला... मला एकट राहायेच्या आता, प्रेम
नाही करायेचा कोणावर..नोको त्या खडकाळ वाटा,विसरून जा मला तू आता...bye n please tk cr of urself" हे बोलून ती निघून गेली... त्या दिवशी पासून ती माझी नव्हती, पण मी आजून हि तिझाच होतो, नेहमीच्या बागेत नेहमीच्याच जागी बसून, मी तिझी परत येण्याची वाट पाहत होतो....
मी तिझी परत येण्याची वाट पाहत होतो...

एक ७ वर्षाच्या मुलाची आई मरते..

एक ७ वर्षाच्या मुलाची आई मरते..! वडील दूसर लग्न करतात...

एक दिवस वडिल आपल्या मुलाला विचारतात कि 

बेटा,  तुला तुझ्या जुन्या आईत आणि नविन आईत काय फरक जाणवला..?

मुलगा बोलला : माझी नवी आई खरी आहे आणि जुनी आई खोटी होती..!!
हे ऐकुन वडिलांना आश्चर्य वाटलं, त्यांनी परत विचारलं : का तुला असं का वाटलं बेटा..?
जिने तुला जन्म दिला ती खोटी आणि काल परवा आलेली नवी आई खरी कशी..?

मुलगा बोलला : जेव्हा मी मस्ती करायचो तेव्हा माझी जुनी आई बोलायची कि
 "जर तु अशीच मस्ती करत राहिलास तर तुला जेवण मिळणार नाही"तरी मी
खुप मस्ती करत रहायचो आणि ती मला पुर्ण गावातुन शोधुन घरी आणायची आणि
अपल्या जवळ बसवुन जेऊ घालायची..!!
आणि 
ही नवी आई बोलते कि "जर तु मस्ती करत राहिलास तर तुला जेवण नाही देणार.... 
आणि खरच तिने मला आज तीन दिवस झाले जेवण नाही दिले...

१५ जून, २०१४

♥ एका तलावाच्या काठावर ... ♥


एका तलावाच्या काठावर ... ♥


प्रियकर :- चल तिथे बसू, किती छान कमळ आहे बघ ...!
प्रेयसी :- ई !! ... नको, खाली किती चिखल आहे
बघ ...त्यापेक्षा तलावाच्या त्या बाजूला बसू,
किती छान बदके आहेत बघ,
प्रियकर :- वरवरच्या सौंदर्या कडे आपण
बघतो म्हणूनच आत मधले प्रेम लवकर कळून येत
नाही ...वास्तविक मी तुझ्यावर, "
त्या पांढर्या शुभ्र सुंदर बदकांसारखे
नव्हे तर चिखलात उमललेल्या कमळासारखे प्रेम करतो"
प्रेयसी :- ते कसे ? प्रियकर:- "जे
पक्षी तलावाच्या पाण्यात राहतात ते
तलाव सुकून गेल्यावर दुसरीकडे उडून जातात,...
तेच जे कमळ त्या तलावात वाढते ते मात्र त्या तलावा बरोबरच मरते..."



१४ जून, २०१४

काही गोष्टी ज्या मुलीना हव्या असतात [What A Girl Want]

काही गोष्टी ज्या मुलीना हव्या असतात पण मुली त्याविषयी कधीच तुम्हाला बोलणार नाहीत!

१) तुम्ही तिला नकळत मिठीत घ्याव

२) तिच्या डोळ्यात – डोळे घालून तिला I LOVE YOU म्हणावे

३) “ आज तू खूपच सुंदर दिसतेस “ अस तुम्ही तिला म्हणाव

४) तिला वाटत कि कधी तरी संध्याकाळी मस्त कुठेतरी एकांतात फिरायला जावे

५) तुम्ही दोघेही जेव्हा एकांतात असाल , तिला नक्की वाटेल कि याने मला घट्ट मिठी मारावी आणि हळूच कपाळावर चुंबन घ्याव.

६) कोणी जर तिला चिडवत असेल तर नेहमी तुम्ही तिची बाजू घ्यावी

७) तिने जर नवीन ड्रेस घातला असेल तर तिला नक्की वाटत कि याने माझी तारीफ करावी

८) तिला नेहमीच अस जाणवून देत जा कि तुम्ही तिच्यावर किती प्रेम करतात

९) ती जर एकटी असेल किव्वा घाबरत असेल तुम्ही तिला दिलासा द्यावा

१०) नेहमी तिला हसवाव... नेहमी प्रेमाच्या गोष्टी कराव्या .

११) अचानक तिला गुलाबच फुल द्याव

१२) तिला कल्पनाही नसतांना अचानक तिला छोटस गिफ्ट द्याव

१३) आणि सगळ्यात महत्वाच ... तिला सर्वात जास्त हेच वाटत कि याने माझ्यावर जीवापाड प्रेम कराव आणि नाजूक परीसारख जपाव..


२३ डिसेंबर, २०१३

एक प्रेम कहाणी .....



मुलगा आणि मुलगी बागेत बसलेले असतात, . मुलगा :- मला वाटते आता आपण दोघेचं ह्या जगामध्ये राहिलो आहोत ..... कारण माझे सारे मित्र प्रेमात आहेत ...!! . मुलगी :- मलाही हेचं वाटते कारण माझ्याही सा-या मैत्रिणी प्रेमात आहेत ..... . मुलगा :- आता काय करायचे ? . मुलगी :- आपण एक खेळ खेळूया ..... . मुलगा :- खेळ ... कोणता खेळ ? . मुलगी :- ३० दिवसांसाठी आपण एकमेकांचे गर्लफ्रेंन्ड, बॉयफ्रेंन्ड बनुयात ..... . पहिले १ ते ५ दिवस :- ते सिनेमा पाहतात, भरपूर फिरतात ..... . ६ ते १५ दिवस :- सर्कस मध्ये असलेल्या भूत हवेली मध्ये ते जातात, ती खूप घाबरते आणि त्याचा हात पकडते पण नंतर लक्षात येते कि तिने चुकून दुस-याचाचं हात पकडला आहे ..... . दोघेही हसतात, बाहेरचं एक ज्योतिषी बसलेला असतो ते आपले भविष्य त्याला विचारतात, तो म्हणतो तुम्ही लवकरात लवकर लग्न करून घ्या, आणि आनंदात रहा ..... आणि तो ज्योतिषी रडायला लागतो ..... . १६ ते २८ दिवस :- ते दोघे एका टेकडीवर बसले असता चांदणी पडताना त्याना दिसते ..... ती मुलगी काहीतरी पुटपुटते ..... . २९ वा दिवस :- पुन्हा ते दोघे त्याचं बागेत त्याचं जागेवर येऊन बसतात ..... . मुलगा :- मी तुझा अँपल ज्यूस घेऊन येतो असे म्हणून तो तेथून जातो, २० मिनिट नंतर एक अनोळखी माणूस तेथे येतो :- तो मुलगा तुम्हाचा बॉयफ्रेंन्ड आहे का ? . मुलगी :- हो, का ? काय झाले ? . अनोळखी माणूस :- त्याला एका गाडीने उडविले आहे व तो खूप गंभीर अवस्थेत आहे ..... . हरणीच्या गतीने ती अतिशय दुःखी होऊन त्याला भेटण्यासाठी तेथून पळ काढते ..... . २९ वा दिवस रात्री ११ वाजून ५७ मिनिटांनी :- डॉक्टर बाहेर येतात व त्या मुलीच्या हातात अँपल ज्यूस व पत्र देतात ..... . ती ते पत्र वाचते :- हे २९ दिवस जे मी तुझ्या बरोबर घालविले ते माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होते ..... मी तुझ्या प्रेमात पडलो आहे, आणि हा खेळ आपण आयुष्यभर खेळावा हि माझी ईच्छा होती ..... . मुलगी आक्रोश करून रडू लागते :- नाही, मी तुला मरून देणार नाही ..... चांदणी पडल्यावर मी तुलाचं मागितले होते, मी पण तुझ्यावर खूप प्रेम करते ..... आता मला कळाले कि तो ज्योतिषी का रडला होता, पण मी तुला मरून देणार नाही ..... प्लीज मला सोडून नको जाऊस प्लीज ..... .. Love You, I Love You, I Love you very very much !! . तेवढ्यात रात्रीचे १२ वाजतात ..... मुलाचे हृदय पुन्हा श्वास घ्यायला लागते ..... . तो ३० वा दिवस होता ..... . कोणीतरी खरचं म्हंटल आहे कि" अगर किसी चीज को तुम सच्चे दिल से चाहो, तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने में जूट जाती हैं ....

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...