ad

२९ ऑक्टोबर, २०२२

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तू

तुझे हसणे जणू, शिंपल्यांची रांग।
शुभ्र शुभ्र मोती कसे, खुलून दिसते रांग।।

हळूहळू पाऊल, तुझी नागमोडी चाल।
पाहुन तुझा नखरा, होई सगळ्यांचे हाल।।

कधी एकटक कधी, नजर फिरते भिरभिर।
डोळ्यातून सोडी तू, मदनाचे तिर।।

प्रेमात पडली आणि, झाली तुही वेडी।
तुझ्या संगतीची, मला जडली गोडी।।

तुझ्या सोबत जुळला, प्रेमाचा धागा।
काळजात ठेव तू, मला थोडी जागा।।

अंतरातील हसू तुझ्या, गालावर खुलू दे।
प्रेमाच्या पाळण्यात, आयुष्य झुलू दे।।

तुझ्याविना माझा, क्षण क्षण व्यर्थ।
तुझ्या सोबत म्हणजे, प्रेमाला अर्थ।।

तु जवळ असली की, नको काही वेगळे।
तुझ्या बंद डोळ्यात, स्वप्न आहे सगळे।।

By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

९ ऑक्टोबर, २०२२

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

कसे घर बांधता येते तुला ह्रदयात हातांनी ?
तुला नक्कीच आहे घडवले निष्णात हातांनी !

कशाला आंधळा हा चाचपडतो रोज तार्यांना ?
कदाचित वाचता येते तयाला रात हातांनी

कुठे वाळूतले किल्ले, कुठे स्वप्नातले इमले
किती उधळून आलो मी, तुझ्या पश्चात हातांनी

ऋणी आहेत काही पापण्या, कायम अशासाठी-
कधीही एकटे ना सोडले दु:खात हातांनी !

मला कळते; तरीही वाटते की तूच सांगावे,
(जसे लाडावलेले मूल नाही खात हातांनी )

नसू दे स्पर्श सोन्याचा, तरीही गर्व आहे की-
बनवल्या ओंजळी नाही उभ्या जन्मात हातांनी !

किती हे पारदर्शी हासणे निद्रिस्त बाळाचे..
कुणी गोंजारते आहे जणू स्वप्नात हातांनी !

जिथे संवादण्याचे संपते सामर्थ्य शब्दांचे,
अशा वेळी धरावे फक्त आपण हात हातांनी..

बनू लागेल आता शस्त्र या प्रत्येक दगडाचे,
सुटू लागेल आता प्रश्न हा रस्त्यात, हातांनी

तसे नास्तिक्य माझे ठाम आहे, मात्र जाणवते..
मला सांभाळले आहे कुण्या अज्ञात हातांनी !!
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...