ad

२८ फेब्रुवारी, २०२३

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी
व्यक्त कसे व्हावे
तुझ्यावरती लिहीताना
शब्दही अपुरे पडावे
तु समोर येताच वाटे
मनातील सारे बोलावे
तुला गमावण्याच्या  भीतीने
शब्दही मागे सरावे
तुझ्यासोबत असताना भीती
न वाटावी इतके जवळ यावे
काही झाले तरी
तू कधीही दुर न व्हावे
प्रेमा आधी मैत्रीचे
अतुट नाते असावे
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

७ जानेवारी, २०२३

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

आयुष्याच्या वाटेवर अनेक प्रश्न पडतात त्याची उत्तर मात्र आपल्यालाचं शोधावी लागतात पण उत्तरे सापडायला थोडा वेळ लागू शकतो मात्र प्रत्येक प्रश्ननाला उत्तर हे असचं फक्त आपल्यामध्ये प्रत्येक प्रश्ननाचें उत्तर शोधण्याचा जिज्ञासूपणा असावा लागतो!,,,
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

१२ डिसेंबर, २०२२

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

प्रेम

     खरं प्रेम, खोटं प्रेम, स्वार्थी प्रेम, निस्वार्थी प्रेम, लोचट प्रेम आशे आनेक विविध प्रेमाचे प्रकार.पण माझ्या मते प्रेम म्हणजे दोन जीवांनी एकमेकांमध्ये सामावण्यासाठी , एकमेकांचे होण्यासाठी केलेला आट्टाहास. आणि हो प्रेम हे मनावर, ह्रदयावर असावं लागतं शरीरावर नाही. नाहीतर आजकाल शरीरावर प्रेम करणारे भुंगे तर तुम्हाला पावलोपावली भेटतील ,पण खऱ्या अर्थाने तुमचा विचार करणारी , तुम्हाला जीवापाड जपणारी ,तुमच्या सुखदुःखात सामील होणारी शंभरात एखादी व्यक्ती भेटेल. प्रेम हे नजरेनी नजरेशी करायचं असतं, हृदयाने हृदयाशी करायचं असतं ,मनाने मनाशी करायचं असतं.केवळ शरीरसुखासाठी चार दिवस जवळ येणे म्हणजे प्रेम नव्हे.
        प्रेम ही खरतर आत्यंत ओजस्वी ,सकारात्मक ऊर्जा देणारी ,एखाद्या व्यक्तीच्या येण्याने आसमंत उजळून टाकणारी भावना आहे.
        प्रेम हे दुःखात आश्रु पुसणार डोकं ठेवायला खांदा पुढे करणार,सुखात मात्र खांद्यावर घेऊन नाचणार असावं. प्रेम हे कोलमडलेल्या उध्वस्त झालेल्या आयुष्याला पुन्हा रुळावर आणणारं  असावं ,प्रेम हे साथीदाराच्या डोळ्यातील हावभाव टीपणारच नव्हे तर नजरेने मनातलं ओळखणार असावं ,प्रेम हे वेळप्रसंगी तू नाहीतर मी आस म्हणून पुढे चालायला लावणार असावं.
       दोन माणसांनी एकमेकांचे स्वभाव ,मने ,विचार समजावून घेऊन आकर्षण नव्हे मनावर आणि सौंदर्यावर नव्हे विचारांवर मोहित होऊन केलेला आट्टाहास म्हणजे प्रेम.प्रेमात कधी तू त्याची आई होऊन त्याला समजावून घ्याव,कधी त्याने तुझे वडील होऊन तुला समजावून सांगावं,कधी तू त्याला बहीण होऊन माया करावी,कधी त्याने तुला भाऊ म्हणून साथ द्यावी .
       माझ्या मते प्रेम म्हटलं एकमेकांची प्रत्येक गोष्ट आपली .त्याच सुखही तुझंच आणि त्याच दुःखही तुझंच .त्याला झालेला आनंदही तुझाच आणि त्याच नैराश्यही तुझंच.खऱ्या प्रेमाला खरंतर वयाची अट नसते .ना समाजाचं बंधन .दोन व्यक्तींना एकमेकांना जीव लावण्यापासून आडवणारा हा कवडीमोल समाज नेमका आहे तरी काय?आजकाल तरुणाई प्रेमात घात झाला,घरच्यांनी नकार दिला ,समाजाने ठोकरल आत्महत्या करते.पण खरंच आत्महत्या हा तुमच्या नात्याचा शेवट किंवा हे इतकं सोपं त्या समस्येचं उत्तर आसत का हो! उलट अशावेळेस एकमेकांवर खर प्रेम असेलतर एकमेकांना खंबीर साथ देऊन परिस्थितीशी दोन हात करायला ,परिस्थिती नम्रपणे आपण हाताळायला शिकायला हवं!
        आणि हो,प्रेम हे फक्त एकमेकांनी शरीराने सोबत राहण्यात नव्हे तर दूर/लांब असूनही एकमेकांचे आसण्यात आहे.आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याला प्रेमाचा श्वास म्हणता येईल असा' विश्वास'मात्र दोघांनाही एकमेकांवर असायला हवा.आणि दूर राहूनही जर तो असेल तर मात्र तुमचं प्रेम हे लांब आसूनही तुमचं आख्ख आयुष्य व्यापू शकत.तुम्हाला जगण्याची प्रेरणा देऊ शकत,तुमची सुखदुःख वाटून घेऊ शकत,प्रत्येक गोष्टीत शरीराने नाही पण मनाने तुम्हाला खंबीर साथ देऊन पुढे नेऊ शकत.
        शेवटी एवढच सांगेन प्रेम हे एकमेकांवर नितांत विश्वास आसलेल ,एकमेकांना कायम साथ देणार,मर्यादा पाळणार,दोघांपैकी एकावर जरी वेळ आलीतरी आंगावरच नाही तर शिंगावर घेणार,आयुष्यभर मनाच्या हळव्या कोपऱ्यात एकमेकांना जपणारं,एकमेकांना समजून घेणारं आणि समजून सांगणार असावं.
           
                            
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

५ डिसेंबर, २०२२

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

खूप काही वाटुनही शब्दांत न बोलता
येणारी भावना नेहमीच मनावर ओझं बनते. इच्छा असूनही न व्यक्त होण्याचा अभिनय जास्त अवघड असतो.
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

सगळ्यांनी साथ सोडली,
तेव्हा माणसं कळली,
थंडीत गरमा गरम चहा प्यायलो,
तेव्हा आयुष्याची मज्जा कळली.
पैसे असताना वेगळी किंमत,
पैसा नसताना वेगळी किंमत,
तेव्हा माणूस म्हणून जगण्याची
खरी गंमत कळली.

By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

१ नोव्हेंबर, २०२२

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

प्रेम असो अथवा मैत्री ही नाती फक्त मनातील रूप बघून जपायची असतात कारण माणसांचे बाह्यरूप कधी पण धोका देऊ शकतं मात्र मनाचे सौदर्य कायम नात्यामधील आपुलकीचा ओलावा ठिकवून ठेवतो!
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

२९ ऑक्टोबर, २०२२

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तू

तुझे हसणे जणू, शिंपल्यांची रांग।
शुभ्र शुभ्र मोती कसे, खुलून दिसते रांग।।

हळूहळू पाऊल, तुझी नागमोडी चाल।
पाहुन तुझा नखरा, होई सगळ्यांचे हाल।।

कधी एकटक कधी, नजर फिरते भिरभिर।
डोळ्यातून सोडी तू, मदनाचे तिर।।

प्रेमात पडली आणि, झाली तुही वेडी।
तुझ्या संगतीची, मला जडली गोडी।।

तुझ्या सोबत जुळला, प्रेमाचा धागा।
काळजात ठेव तू, मला थोडी जागा।।

अंतरातील हसू तुझ्या, गालावर खुलू दे।
प्रेमाच्या पाळण्यात, आयुष्य झुलू दे।।

तुझ्याविना माझा, क्षण क्षण व्यर्थ।
तुझ्या सोबत म्हणजे, प्रेमाला अर्थ।।

तु जवळ असली की, नको काही वेगळे।
तुझ्या बंद डोळ्यात, स्वप्न आहे सगळे।।

By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

९ ऑक्टोबर, २०२२

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

कसे घर बांधता येते तुला ह्रदयात हातांनी ?
तुला नक्कीच आहे घडवले निष्णात हातांनी !

कशाला आंधळा हा चाचपडतो रोज तार्यांना ?
कदाचित वाचता येते तयाला रात हातांनी

कुठे वाळूतले किल्ले, कुठे स्वप्नातले इमले
किती उधळून आलो मी, तुझ्या पश्चात हातांनी

ऋणी आहेत काही पापण्या, कायम अशासाठी-
कधीही एकटे ना सोडले दु:खात हातांनी !

मला कळते; तरीही वाटते की तूच सांगावे,
(जसे लाडावलेले मूल नाही खात हातांनी )

नसू दे स्पर्श सोन्याचा, तरीही गर्व आहे की-
बनवल्या ओंजळी नाही उभ्या जन्मात हातांनी !

किती हे पारदर्शी हासणे निद्रिस्त बाळाचे..
कुणी गोंजारते आहे जणू स्वप्नात हातांनी !

जिथे संवादण्याचे संपते सामर्थ्य शब्दांचे,
अशा वेळी धरावे फक्त आपण हात हातांनी..

बनू लागेल आता शस्त्र या प्रत्येक दगडाचे,
सुटू लागेल आता प्रश्न हा रस्त्यात, हातांनी

तसे नास्तिक्य माझे ठाम आहे, मात्र जाणवते..
मला सांभाळले आहे कुण्या अज्ञात हातांनी !!
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

८ मे, २०२२

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

चेहऱ्यावर हळुवार उमलणार स्मित
स्मितामुळे गालावर खुलाणारी खळी
केसांच्या बटांच गालावर झोका खेळणं
तुझ त्यांना हळुवार मागें सारण
हें मन मोहणार दृष्य मी पाहत बसायचो
तासनतास
आणि अनुभवायचो त्या सुरेख क्षणांना
मी तो हर एक क्षण रेखाटलां आहे
माझ्या काळजाच्या canvas वर
तुझे ते अदृश्य मन
तुझ न उमजणार अल्लड स्वभावचित्र मी चांगलं जाणून आहे
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...