ad

२० डिसेंबर, २०१३

असावं वाटतं कुणीतरी आपलं… आपलं म्हणणारं
नजरेला नजर भिडताच मनातलं जाणणारं
 
सल हृदयातली कधी येई डोळ्यात आसवं बनून
 
विदीर्ण हृदयाची व्यथा दिसे भिजल्या पापण्यातून 
 
टीपटिपणाऱ्या आसवास अलगद झेलणारं
 
असावं वाटतं कुणीतरी आपलं… आपलं म्हणणारं
 
होतं मन एकाकी, जत्रा जेव्हा सारी पांगते 
 
वाटा होतात धुसर अन् चाल पायांची थांबते
 
हेच एकाकीपण अलगद दूर करणारं
 
असावं वाटतं कुणीतरी आपलं… आपलं म्हणणारं
 
चुकतात वाटा कधीकधी गर्दीत चालणारी पावलं
 
मग नसतं सांगाती कुणीच, भासतं एकट्याच जग इवलं
 
चुकलेल्या वाटेवर दीप बनून साथ देणारं
 
असावं वाटतं कुणीतरी आपलं… आपलं म्हणणारं

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...