ad

२५ एप्रिल, २०१४

ती प्रतिभा कुठे गेली ?


अंतरंगात खोलवर कुठेतरी दडलेली

आणि वेळोवेळी मला छळणारी...ती प्रतिभा कुठे गेली ?

अंधारात चाचपडताना आशेचा किरण बनून
माझ्या रोमरोमी जळणारी...ती प्रतिभा कुठे गेली ?

कधी वसंत कधी शिशिर बनणारी
कधी आपुलेच रंग उधळणारी

आपल्याच धुंदीत जगणारी
सावलीहून अधिक साथ देणारी

कधी जगण्याचे साधन होणारी
कधी श्वासांची जागा घेणारी 

दु:खात अधिकच उफाळून येणारी
आणि सुखात भरभरून देणारी

...एका अपघाताने का प्रतिभा नाहीशी होते ?
मी जिवंत आहे म्हणजे ती ही आहेच...!
प्रतिभा अशी मरणार थोडीच...
कदाचित मी गेल्यावरही असेल ती इथेच
माझ्या आठवणींची शिदोरी बनून...


Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...