कॉलेज
केव्हाचं सुरु झालंय.सर्वक्लास पुर्णपणे भरलेत.तिसर्या पिरेडची बेल
वाजली.लाट मॅडमचा पिरेड संपला होता.मॅडम अजुन जायच्या होता.पौर्णिमा
गडबडीने क्लासमध्ये आली,पावसाने चिँब भिजली होती ती.मॅडमांना काही सांगायची
गरज नव्हती,पावसामुळेउशीर झाला असेल म्हणुन त्यांनी तिला बसायला सांगितलं
आणि त्या निघुन गेल्या.प्रदीप पौर्णिमाला सारखं विचारत होता.एवढं भिजत
यायचीकाय गरज होती?एक दिवस आली नसतीस तर चाललंअसतं ना....ती
म्हणाली,हो पण तुला एक दिवस न बघणं चाललं मला चाललं नसतं.प्रदीप अलगद खाली
बघुन हसला.किती प्रेम आहे तुझं माझ्यावरअसं म्हणुन तिच्या हातावर हात
ठेवला.तिचं अंग खुपच तापलं होतं.त्याला एकदम चटका बसला.अगं तुला तर खुप ताप
आलाय आणि तरीही तु इथवर आलीस.तुला तर ना मी आता..,.पुढे काही बोलण्याच्या
आतच कांबळे सर तिथेआले,प्रदीप लगेच आपल्या जागेवर गेला.आणि सर्वजण gd
moning sirम्हणत उभे झाले...sit downपौर्णिमा सोडुन.... पौर्णिमाला उभं
राहायला सांगितल्याबद्दलसर्वच आश्चर्यचकित झाले.प्रदीप जरा जास्तच
आश्चर्यचकित झाला.....कांबळेसरःबाळ तुला इतका उशीर का झाला?(सर थोडे कडक
शिस्तीचे होते,त्यांनी तिला उशीरा येताना पाहीलं होतं)...पौर्णिमाःसर पाऊस
आला होता?..पाऊस आला होता तर यायचं नव्हतं कॉलेजला,हात पुढे कर....तिने हात
पुढे केला सर तिला छडी मारणार तेवढ्यात प्रदीप ओरडला सर थांबा....ती
वेळेवर आलीय हवंतर विचारा सर्वांना...हो का?मी प्रत्यक्ष पाहीलं नसतं यावर
विश्वासही ठेवला असता कदाचित,..असं म्हणुन ते पुन्हा छडी मारणार तेवढ्यात
तो पुन्हा मधी बोलला.आता ते चिडले आणि पहीला त्यालाच छडीने सरांनी
हाणलं.प्रदीप ने पौर्णिमाला पुरपुर वाचवण्याचा प्रयत्न केला.पण तिसर्यावळी
सर तिला मारताना तिने डोळे मिटले आणि धाड करुन खिडकीचे दार वार्याने धडकले
गेले.तिने डोळे उघडले तेव्हातिथे कोणीही नव्हतं.सर्व बँचेस मोकळे
होते.बाहेर धो धो पाऊस पडत होता.तिच्या आईने लगबगीने छत्री घेऊन वर्गात
प्रवेश केला.....मित्रांनो या कथेला इथे थोडा pause देऊया. आत्ता तुम्ही
म्हणाल तिथे कोणीचनाहीये,सर्व कोठे गेले...सांगतो...पणहे सांगण्यासाठी मला
तुम्हाला थोडं PASTमध्ये न्यावंलागेल.चला तर मग...एका
वर्षापुर्वी...आजपासुन बारावीचे एक्झाम्स चालु झालेत.प्रदीप आणि पौर्णिमा
हे वेगवेगळ्या कॉलेजचे पण त्यांचा exam no एकाच कॉलेजमध्ये एकाच क्लासमध्ये
पडला आहे.त्यामुळे ओळख वाढवण्यासाठी प्रदीप सुरुवात करतो...हाय माझं नाव
प्रदीप...तीःआणिमाझं पौर्णिमा.,.तोःरागावणार नसशील तर एक सांगु का?तीःहो
सांग ना.तोःतु खुप सुंदर आहेस.तुझ्या कपाळावर एक चंद्रकोर असती ना तर त्या
चंद्रकोरीलाही तुझ्यामुळे शोभा आली असती.ती लाजुन थँक्स म्हणाली.त्याचा हा
कॉन्फीडंस आणि स्पष्ट वक्तेपणा तिला खुप आवडला.अशी त्यांची मैत्री
झाली.दोनतीन पेपर व्यवस्थित गेले पण एका पेपरच्यावेळी तिच्या पायात कोणीतरी
कॉपीटाकली जे तिला कळलं नाही.त्यावेळेसचनिरीक्षकांच्या
नजरेत ही कॉपी पडल्यावर त्यांनी पौर्णिमाला जबाबदार धरलं.ती खुपच विनंती
करुन त्यांना सांगत होती किही माझी कॉपी नाही।पण त्यांनी ऐकलंनाही शेवटी
प्रदीपने तो आळ आपल्या डोक्यावर घेतला आणि तो म्हणाला,सर ही कॉपी माझी आहे
आणिती मीच हिच्यापायात टाकली होती.त्यामुळे त्या सरांनी पौर्णिमाला सोडुन
प्रदीपच्या पेपरवर लाल शेरा मारला.पौर्णिमेला माहीत होतं की हा खोटं बोलतोय
कारण इतका स्मार्ट मुलगा कॉपी कसा काय करेल?पेपर संपल्यावर ते भेटले
तेव्हा तिने स्पष्टच विचारलं.तुकॉपी केली नसताना ती तुझि कॉपी आहे असं का
म्हणालास?...तुला वाचवण्यासाठी....पण का?तु कोण आणि मी कोण आपलं नातच
काय?दोन दिवसाच्या मैत्रीखातर कोणी असं करतं का?बरोबर आहे कदाचित.पण
दोनदिवसाच्या प्रेमाखातर असं कोणीही करु शकतं,नाहि?...म्हणजे तुझं माझ्यावर
प्रेम....हो तुला बघताक्षणीच झालं होतं ते पण प्रपोज असं करावं लागेल याची
जरादेखील कल्पना नव्हती मला.बोलकरशील माझ्याशी लग्न?तिला त्याची एक वेगळी
पद्धत,स्पष्टपणेबोलणं आवडलं आणि तिने पटकन हो म्हटलं।काहि दिवसांनी एकाच
कॉलेजमध्ये त्यांचं अॅडमिशन झालं.त्यांचं प्रेम फुलत गेलं.पण एक दिवस कॉलेज
भरलेलं असताना धो धो पडणार्या पावसाने कॉलेजच्या बिल्डींगचा एक भाग
कोसळला.त्यामध्ये चाळीस विद्यार्थी,विद्यार्थींनीचा
मृत्यु झाला आणि 100 च्या वर जखमी झाले...प्रदीपचंनाव मृतांमध्ये होतं तर
पौर्णिमाचं जखमींमध्ये होतं....होत्याचं नव्हतं झालं.उकळत्या दुधामध्ये
विरझण पडावं तसं त्यांच्या प्रेमामध्ये दुर्दैवाने उडी घेतली
होती.पौर्णिमाचाजीव तर वाचला पण तिच्या मनावर या घटनेचा जबर मानसिकआघात
झाला तिच्या पालकांनी यावर उपचारासाठी प्रयत्न केले पण तिने योग्य प्रतिसाद
दिला नाही.....तेव्हापासुन आजपर्यँत जवळजवळ रोज ती कॉलेजमध्ये येत
असते.आजतर तिने कहरच केला 100 डिग्रीचा ताप आला असतानादेखील ती कॉलेजमध्ये
पावसात भिजत आली होती.त्या खिडकीचीदारे सुटलेल्या वार्याने धडकत होती,तिचे
केस उडत होते.तीची आई छत्री घेऊन तिथे आली.आणि पौर्णिमाला भिजलेल्या
डोळ्यांनी म्हणाली,कितीवेळा तुला इथे आणायलायायचं बाळ.रोज तु न सांगता इथे
येतेस.काय झालंयते तरी सांग.आजपर्यंत तुला कितीवेळा समजावलं पण आज फणफणत्या
अंगाने सुद्धा तु इथे आलीस.असं म्हणत त्या पौर्णिमालाघेऊन गेल्या.त्यांना
माहीत होतंकी हीला मानसिक आजार झालाय.पौर्णिमाला याची कल्पना दिला गेली
असतानादेखील तिने उपचारास नकार दिला.हा माझा मानसिक आजाराच का असेना पण तो
मला रोज भेटतो हेच माझ्यासाठी खुप आहे.उपचारानंतर तो मला कधीही दिसणार नाही
म्हणुन आजपर्यँत ती उपचार न घेता तशीच राहीली...फक्त
त्याच्यासाठी.,....मित्रांनोपौर्णिमाने
प्रदीपवर केलेल्या नितांत प्रेमासाठी,त्याच्या एका भेटीसाठी तिला झालेल्या
मानसिक आजारालाच तिनं आयुष्य बनवलं.म्हणुनच पौर्णिमेच्या आयुष्यात कायमची
आमावस्या आली.