ad

१ सप्टेंबर, २०१४

तिच नाव लिहून लिहून पुसायला विसरून जातो

तिच नाव लिहून लिहून पुसायला विसरून जातो
तिची जेव्हा आठवण काढतो विसरायला विसरून
जातो...
फार काही सांगायचं असत तिला जे हृदयात आहे
पण जेव्हा पण भेटतो ऐकवायला विसरून जातो...
भेटल्यावर अजून थोडा वेळ तिनं थांबावं असं वाटतं
पण ती भेटली कि तिला थांबवायचं विसरून जातो.....
आता तिच्या शिवाय दिवस सरता सरत नाही
पण नेहमी स्वप्नात तिला हे सांगायच विसरून
जातो...
माझी प्रत्येक संध्याकाळ सांगते विसर तिला आता
पण सकाळ झाली कि तिला विसरायचं हेच विसरून
जातो ....
तिला विसरायचं हेच विसरून जातो .........

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...