तू जेव्हा म्हणतेस ,
“तू नेहमीच असा वागतोस
मुद्दाममला छळतोस ”,
तेव्हा तू मला आवडतेस..
तू जेव्हा म्हणतेस,
“मला तुझ्याशी बोलायचे नाही आता ..”
आणि लगेच विचारतेस ,
“बोलतोस का आता ?”,
तेव्हा तू मला आवडतेस..
तू जेव्हा म्हणतेस,
“ परत जर असावागलास तर..
मी तुला कायमची सोडून जाईन...
लक्षात ठेव ” ,
तेव्हा तू मला आवडतेस..
तू जेव्हा म्हणतेस ,
”मी जगू शकत नाही तुझ्याशिवाय ..
आणि मला माहितीये की तुही माझ्याशिवाय..
”आणि पटकन मला मिठी मारतेस,
तेव्हा तू मला आवडतेस.