अन् आज खरंच ना तुझी कमी जाणवली'
जीवनात टाकलेल्या प्रत्येक पावलांवरी,नकळतपणे माझी पापणी सये पाणावली...
काळजातली एक आर्त जखम चिघळली,
अन् आज खरंच ना तुझी कमी जाणवली...
आजवर तुझ्या आठवणीची होती सावली,सुख दुःखाच्या प्रवासात माझिया मनावरी...
तुझ्या ही सावली कुणी अनामिक गं केली,अन् आज खरंच ना तुझी कमी जाणवली...
तु होतीस प्रतिक्षेतल्या क्षणाला सावरणारी,वेळोवेळी मला योग्य ते मार्गदर्शन करणारी...कुणीतरी माझ्या मनाचीच दिशा बदलवली,अन् आज खरंच ना तुझी कमी जाणवली...
कुणीतरी आज उडवली भावनेची खपली,अन् आसवे डोळ्यातून गं सये ओघळली...
परकेपणा अनुभवला भावनांच्या बाजारी,अन् आज खरंच ना तुझी कमी जाणवली...