ad

२८ सप्टेंबर, २०२१

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

दीर्घ अंधार पिऊन
गच्च मिटलेले डोळे
आणि हातात उरले
रंग कुणाचे सावळे..

मऊ मेणाहुन व्यथा,
अशी वितळे उरात
माया कुणाची गाठते
माझ्या पापणीचा काठ ?

मन आक्रंदत राही
कुणी ऐकली ना हाक
गेली विझून प्रार्थना
अंधारात आपोआप...

गेले निसटून काय
काय उरले उरात ?
माझे काळीज हरले
सांग कोणत्या भरात ?

एका हाकेच्या ओढीने
सारा थांबला प्रवास
जागोजागी मृगजळ
क्षणोक्षणी फक्त भास...

रित्या हातांत उजेड
घेऊनिया भटकते
अशी आंधळी पौर्णिमा
माझ्यातुन उगवते...
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...