ad

२४ सप्टेंबर, २०२१

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुम्हीचं सांगा......


स्वत:चे स्वप्न साकारत
मनसोक्त उडायचं,
की मनातल्या भावना लपवून
लोकांच्या अपेक्षात लोळायचं,
काळनुरूप वाढत्या
अपेक्षांच्या रांगा,
काय करावं ,जरा तुम्हीचं सांगा?

बाळा, तुझी इच्छा काय,
कोणी उच्चारलं का?
मला काय करायचं,
कोणी विचारलं का ?
माझं काय, ते असूद्या ,
आपलं मांगा,
काय करावं, जरा तुम्हीचं सांगा?

विचारांना नाही पटली
त्या गोष्टीची
माझ्यावर सावलीचं नाही,
गुलामी मनाला
कधी भावलीचं नाही,
म्हणून.....
आयुष्यात झाला पंगा,
काय करावं, जरा तुम्हीचं सांगा?

विचार,मन जिकडे वळवतं
तिकडे वळावं,
की भावना , अपेक्षांच्या
जाळ्यात फळ-फळावं,
ओढाव्या का ?
अळथळा करणा-या टांगा,
काय करावं,जरा तुम्हीचं सांगा?

लोकांच्या नकारात्मक
विचारांनी मांगे पडावं,
की आयुष्याचा संघर्ष आता,
स्वत:च्या जोरावर,लढताचं लढावं,
चित्र भविष्याचे आता,
तुम्हीचं रंगा,
काय करावं, जरा तुम्हीचं सांगा?
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...