ad

२६ सप्टेंबर, २०२१

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

चमत्कार एखादा नकळत घडेल सुद्धा
गेलेला क्षण फिरून मागे वळेल सुद्धा

दोन पावले आपण सुद्धा टाकुन पाहू
रुंदावत गेलेले अंतर मिटेल सुद्धा

आयुष्याची रद्दी तर होणारच आहे
रंगवलेले पान कदाचित टिकेल सुद्धा

कापुन पाहू का वठलेल्या काही फांद्या
मनास त्याने नवा धुमारा फुटेल सुद्धा

पाठीवरती हात असावा सुरकुतलेला
भळभळणारा व्रण एखादा भरेल सुद्धा

झोप लागते आहे रात्री...ठीकच आहे
स्वप्नांनाही परतुन येणे जमेलसुद्धा

थर एखादा पांघरता येतो का पाहू
कमळाच्या पानागत जगणे जमेलसुद्धा
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...