ad

३० सप्टेंबर, २०२१

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

भुक

भरगच्च जमलेल्या जमावामध्ये एक हलगीचा आवाज आला...
अक्षरश अंगातली सर्व ताकदीने डफड वाजवत जमावाला जमवल जात होत.हलगी वाजवणारी डांगोरी पिटाळत आपल्या कणखर आवाजाने आरोळी ठोकली...
माय बाप,भाऊ दादा...चला चला लवकर या,काई येळामध्ये खेळाला सुरु हुणार हाय...
अशी ती आरोळी कानावर पडली.अन मी ही निघालो..त्याकडे काही तरी दिसतय...
एका मोठ्या चौकात भली मोठी गर्दी जमली.त्याने आपल्या शैलीने बरीच गर्दी जमवली.आणि खेळाला सुरुवात झाली...
एक चिमुकल बाळ.वय जेमतेम 5-6 वर्ष.त्या बाळाच्या आईने गळ्यात हलगी टांगली.आणि बापाने वेगवेगळ्या कसरती चालु केल्या..बघता बघता भरपुर गर्दी जमली.तेवढ्यात त्या बाळाच्या बापाने जवळपास 10-15 फुट लांब काठी घेतली.एका टोकावर त्या चिमुकल्याल्या लटकवल आणि हळुवार पणे ती काठी हवेत उललली.बाळ असलेल्या टोक आकाशात..दुसरे टोक बापाच्या हातात...हगगीच्या जोरदार ठोक्याने वरचेवर काठी उचलत होती.हवेतल्या त्या टोकावर चिमुकल पोटावर टोक घेऊन निजल होत.त्या चिमुकल्याच्या जीव त्या बापाच्या मनगटात होता.त्या माईची जीव त्या बाळांच्या पोटात होता.अक्षरश डोळे अश्रुने दाटले होते.टाळ्यांनी जमावाकडुन प्रतिसाद मिळत होता.काहींनी पैसे देत होते.ती माय माऊली मोठ्या धिराने पैसेजमवत होती.बापाची एकटक नजर त्या बाळांकडे...मनगटात त्या बाळाच अख्ख आयुष्य...
उडे आकाशी,चित्त तीचे पिल्लापंशी...अशीच काहीशी गत होत.पैसे,भाकरी लोकांकडुन मिळत होती.तेवढ्याच बापाने हळुवार काठी खाली घेत होता.जरा खाली आल्यावर काठीला झटका देऊन काठी बाजु केली.मोठ्या शिताफीने बाळाला अलगद झेलुन घेतल.तोपर्यत उपस्थीतांचे डोळे पाणावले.केवढा मोठी संघर्ष ..मला प्रश्न पडला...किती वेदनादायी कहाणी...नेमका हा खेळ कोणता....
तेव्हा मला वाटल...
हा टिचभर पोटाची खळगी भरण्याचा खेळ....
एवढी मोठी वेदनादायी आणि संघर्षाचा म्हणजेच भुक....
भुक ह्या शब्दासाठी किती वेदना सहन कराव्या लागल्या.त्या चिमुकल्या आणि मायमाउली अन बापाला...मन हेलावणार दृश्य...
अशीच काहीशी बाब काही दिवसांपुर्वी घडली.दवाखाण्यामध्ये एक महिला दाखल झाली.डाॅक्टरांनी उपचार केले आणि विचारले...
अशक्तपणामुळे तब्येत खालावली.आणि तुम्ही जेवण कधी केल?
त्या बाईने उत्तर दिल..15 दिवसांपुर्वी..
डाॅक्टर म्हणाले...एवढ दिवस का खाल नाही...कशावर आहात?
बाई म्हणाली...खायला काहीच नाही...15 दिवसांपासुन मी फक्त पाण्यावर जीवन जगत आहे....
टिचभर पोटीची खळगी भरण्यासाठी खुप वेदनादायी जीवन जगावे लागत आहे.खळगी भरण्यासाठी तारेवरची कसरत कराव्या लागणा-या जमाती पहायला मिळतात.कसरती करताना टाळ्याची दाद अन कौतुक मिळत.पण तेवढच त्याच भवितव्याच काय...असा प्रश्न निर्माण होतो.
कधी तारावर चालत जायच तर कधी डोक्यावर थर रचुन तोल सांभाळत जायच...असे चितथरारक कसरत करायच....
एवढ करुन सुद्धा कधी उपाशीपोटी निजायचं....




साहेब..पोट कमी करण्यासाठी योगा नाही...पोट भरण्यासाठी योगा आहे...

"""""""""""
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...