ad

२४ सप्टेंबर, २०२१

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

अशी सकाळ

सुंदर सकाळची सुरुवात
तुझ्या स्पर्शाने व्हावी,
मऊ तुझ्या तळहातांने
झोप माझी उडावी,

तमा न करता कशाची
मी मागून मिठी मारावी,
मारलेल्या मिठीत मी
तुझी बट मागे सारावी,

तुझ्या बांधीव कमरेभोवती
हात माझा फिरावा,
नाजूक उडणाऱ्या हृदयाने
दीर्घ श्वास घ्यावा,

श्रवणपाकळ्यांवरती तुझ्या
अधरांचा माझ्या स्पर्श व्हावा,
नकळत माझ्या अधराना
तुझ्या आधरांचा आसरा मिळावा,

मिटूनी ते रेखीव नयन
तू साद मला द्यावी,
अशी सकाळ माझ्या जीवनात
नित्यपने यावी...!
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...