ad

२१ जानेवारी, २०२२

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

मंतरलेल्या ओल्या रात्री
तुझे चांदणे झरझर झरते
माझे 'मी' पण वितळत जाते
तुझे न काही बाकी उरते

तलम रेशमी स्पर्श तुझा तो
गात्रांमध्ये साठवताना
अजूनही का फुलतो काटा
मनात सारे आठवताना

हलके हलके दरवळते मग
मंतरल्या रात्रीचे अत्तर
चंद्र जरासा घुटमळतो अन
श्वास सुगंधी म्हणतो सावर

कुणी अनामिक ओढीने त्या
मोहरल्या रानातुन फिरते ?
मखमालीवर चालत जाता
वाट अनावर धुक्यात विरते

डाळींबासम ओठांनी त्या
दव ओलेते टिपून घेते
विस्कटलेल्या धुंद क्षणावर
खूण तेवढी मागे उरते ...
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...