ad

२७ एप्रिल, २०१४

रागवू नकोस मला

रागवू नकोस मला




मनवता येणार नाही,


लपवू नकोस
मला ओळखता येणार नाही,

डोळ्यात पाणी नको आणूस
मला बघवणार नाही,

दूर जाऊ नकोस
मला जगता येणार नाही,

उदास होऊ नकोस
मला हसता येणार नाही,

हृदय तोडु नकोस
मला जोडता येणार नाही,

आठणीँन मध्ये छलु नकोस
मला सावरता येणार नाही,

साथ कधी सोडु नकोस मला
तुला कधी सोडता येणार नाही,

रूसवा धरु नकोस
मला शब्द सापडणार नाही,

एकटं मला सोडु नकोस
आपल असं मला कोणी नाही,

गुंतलेल हृदय मोडू नकोस
मला परत गुंतता येणार नाही,

तुझ्याशिवाय जीवनात अर्थ नाही......
असं मी म्हणतं नाही

कारण....

तुझ्याशिवाय जीवनात जीवच राहणार नाही।



Photo: आपले प्रेम होणे हे तर,
आधीच ठरलेले होते ....

उगाचच नाही त्या विधात्याने,
तुला मला भेटवले होते...♥

कसं समजवू.

कसं समजवू या वेड्या मनाला कसा बांध घालू अंतरीच्या भावनांना
सांगेल का हे कुणी मल कसा आवरू मी या माझ्या वेड्या मनाला
कधी हे तिच्या आठवणीत रमते कधी सागराचा पैलतीर, हे गाठून येते
कधी व्याकुळलेल्या चातकापरी तिच्या प्रेमासाठी हे झुरते
कधी डोळ्यांतून अश्रू होऊन गळते तर कधी आनंदात न्हावून जाते
कधी हळूच रुसते, कधी गुदमरून हे जाते भाभडे हे मन माझे स्वप्नांच्या मागून धावते
समजावलं जरी याला किती, हे वेड्यासारखे वागते कधी तिच्या सहवासासाठी, मन हे व्याकूळ होते.
आवरू कसा या मनाला, मन मनालाच हे छळते आणि हे वेड मन माझं, तिच्याच मागून धावते.

पाण्याचा एक थेंब


मला कोणालाच दोष दयायचा नाही..


नियतीचा हा खेळ निराळा खेळात लागलो चिरडू ग

कळत नाही माझे मलाच हे काय लागल घडू ग ?



पेचात पडायचो मी सगळ्यांना लागले प्रश्न मज पडू ग
कळत नाही माझे मलाच हे काय लागल घडू ग ?



तूच होतीस आवड माझी लागल कोण आवडू ग
कळत नाही माझे मलाच हे काय लागल घडू ग ?



तूच होतीस राणी स्वप्नांची तुझ्या विनाच स्वप्ने सारी
मला लागली पडू ग कळत नाही माझे मलाच हे काय लागल घडू ग ?



बोललो नाही कधी तुझ्याशी तर जेवण जात नव्हत ग
  कळत नाही माझे मलाच हे काय लागल घडू ग ?



पाहिलं नाही कधी तुला तर चैन मला न पडे ग,  

दूर निघालीस तू माझ्या पासून तरी येईना रडू ग, 

 कळत नाही माझे मलाच हे काय लागल घडू ग ?


करत असशील खरे प्रेम तर माफ कर तू मला कळत नाही 

माझे मलाच हे काय लागल घडू ग ?



माझ्यासाठी जीव देणारीच जर माझ्यासोबत खोटे बोलते 

तर मला कोणालाच दोष दयायचा नाही..

२५ एप्रिल, २०१४

सहज सापडलेले सत्य



दुसर्याला सुख


माणसाचे आयुष्य


मन...


मन... 

देवा चुकतय काय मनाचे तेच कळत नाही रे,
जुनी पाऊलवाट सोडुन
नव्या वाटेवर ते
वळतच नाही रे...
जुन्या वाटेवर ,
जुन्या  क्षणात
शोधतेय कुणाला तरी,
नाहीच काही गावणार
शोधतंय भाभडे
हरवलेले असे काहीतरी...
शोधतांना हरवलेले
स्वतः नाही ना
हरवून बसणार स्वताला ?
भीती  याचीच  रे ,
नाही कुणी वेड्या
मनाला या शोधायला...
एकदा घे रे कुशीत
या माझ्या मनाला,
घेई जशी माऊली
रडक्या तिच्या लेकराला...
सांग कानात त्याला
हरवलंय नाही,
गेलय सोडून तुला ते
पुन्हा न परतण्यासाठी...
कितीही केले प्रेम कुणावर
तरी बांधल्या असतात तुच,
जन्मोजन्मीच्या या रेशीमगाठी
साताजन्माच्या न तुटण्यासाठी,..



ती प्रतिभा कुठे गेली ?


अंतरंगात खोलवर कुठेतरी दडलेली

आणि वेळोवेळी मला छळणारी...ती प्रतिभा कुठे गेली ?

अंधारात चाचपडताना आशेचा किरण बनून
माझ्या रोमरोमी जळणारी...ती प्रतिभा कुठे गेली ?

कधी वसंत कधी शिशिर बनणारी
कधी आपुलेच रंग उधळणारी

आपल्याच धुंदीत जगणारी
सावलीहून अधिक साथ देणारी

कधी जगण्याचे साधन होणारी
कधी श्वासांची जागा घेणारी 

दु:खात अधिकच उफाळून येणारी
आणि सुखात भरभरून देणारी

...एका अपघाताने का प्रतिभा नाहीशी होते ?
मी जिवंत आहे म्हणजे ती ही आहेच...!
प्रतिभा अशी मरणार थोडीच...
कदाचित मी गेल्यावरही असेल ती इथेच
माझ्या आठवणींची शिदोरी बनून...


सुविचार


Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...