जे जे घडते ते सारे अनपेक्षितच असते
अपेक्षा न ठेवणे कधी, हे ही बरेच असते
तुला बोलावण्याचा,अट्टहास नको आता
ज्यास यायचे तो येतो हे ही खरेच असते
का सुर्या तुझ्याभोवती,फिरते उगा पृथ्वी
विनाकारण असे फिरणे,तिचे हसेच असते
केलेस कितीही तरी,शेवटी कमी भासणार
जगाच्या गरजेपुढे तुझे,कर्म उणेच असते
तुझ्या असण्याला , किंमत आजवर नाही
तुझ्या नसण्यानेही येथे, घडले असेच असते
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।
माझ्या मनातलं तुला सांगायचा खूप प्रयत्न केला, पण तू कधी ते समजून घेतलं नाही... खूप दु:ख आहे माझ्या हसण्यामागे, पण खरंच ते तुला कधी दिसलं नाही... दिसला तो फक्त माझा राग, स्वभाव, पण माझं प्रेम तू कधी जाणलंच नाही...
ad
२१ ऑक्टोबर, २०२१
माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post
असह्य होणाऱ्या स्पर्शांचे काय करू?
खिळून असणाऱ्या डोळ्यांचे काय करू?
बालपणाला प्रौढ बनवले आहे मी,
मनात असलेल्या होड्यांचे काय करू ?
दु:ख शहाण्या दुनियेचे समजू शकतो
सुखात असणाऱ्या वेड्यांचे काय करू ?
माझ्या ओठांनाच बिलगले ओठ तुझे
इतक्या हृदयाच्या ठोक्यांचे काय करू ?
प्रसन्न हा चेहरा पुन्हा दाखवला मी,
तुला न दिसलेल्या आठ्यांचे काय करू ?
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।
खिळून असणाऱ्या डोळ्यांचे काय करू?
बालपणाला प्रौढ बनवले आहे मी,
मनात असलेल्या होड्यांचे काय करू ?
दु:ख शहाण्या दुनियेचे समजू शकतो
सुखात असणाऱ्या वेड्यांचे काय करू ?
माझ्या ओठांनाच बिलगले ओठ तुझे
इतक्या हृदयाच्या ठोक्यांचे काय करू ?
प्रसन्न हा चेहरा पुन्हा दाखवला मी,
तुला न दिसलेल्या आठ्यांचे काय करू ?
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।
११ ऑक्टोबर, २०२१
माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post
*बायको वाल्याकोळयाची*
बायको कशी असावी ?
बायको असावी तर, वाल्या कोळयाच्या बायकोसारखी.....
रामायण न वाचलेला किंवा टीव्हीवर रामायण न पाहिलेला, निदान रामायण या ग्रंथाचे नाव माहिती नसलेला माणूस, या भारतात तरी अपवादानेच असावा. रामायण, म्हटले की, आम्हां भारतीयांचा ऊर केवढा भरुन येतो.
रामायण आपल्या संस्कृतीचा ठेवा असून रोजच्या जगण्यात, पावलोपावली त्याचे दाखले दिले जातात...!
'पुत्र असावा तर, प्रभुरामासारखा'!
'पती असावा तर, मर्यादापुरूषोत्तम श्रीरामासारखा !',
भाऊ असावा तर, लक्ष्मणासारखा !',
'पत्नी असावी तर, सीतेसारखी !'
'भक्ति व शक्ति असावी तर, ती हनुमंतासारखी'
*सहजच माझ्या मनात एका प्रश्नाने घर केले, बायको कशी असावी?*
मी तो प्रश्न आजपर्यंत बऱ्याच जणांना विचारला, खूप साऱ्या जणांनी त्याचे उत्तर त्यांना आवडणाऱ्या वेगवेगळ्या स्त्रियांचे दिले. अगदी रामायण महाभारतात असलेल्या आदर्श स्त्रिया ते अगदी आताच्या आघाडीवर असलेल्या अभिनेत्रीचे! खरं तर या सर्व दाखल्यापूर्वी आणखी एक दाखला आवर्जून द्यायला हवा.
तो म्हणजे,
*'बायको असावी तर वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी !'*
*कारण तीच खरी रामायणकर्त्याची 'कर्ती ' आहे !* हे दुर्लक्षीत सत्य कायमच दुर्लक्षीतच राहिले आहे.
रामायणकर्त्या वाल्मिकी ऋषीच्या जडणघडणीसंबधी, अगदी जुजबी इतिहास सांगितला जातो.
वाल्याकोळी वाटसरूंना जंगलात
अडवून, प्रसंगी त्यांचे मुडदे पाडून, त्यांची लूट करुन चरितार्थ चालवायचा.
*एकदा नारदमुनींनाच वाल्याने अडवले. तेव्हा नारदमुनींनी त्याचे तिथल्या तिथे बौधिक घेतले!*
*'अरे मूर्खा हे पापकर्म कशासाठी करतोस ?' असे विचारल्यावर, 'माझ्या बायको-पोरांसाठी'!*
असं सांगितल्यावर, नारदमुनी त्याला म्हणतात!
*'जा तुझ्या बायकोला विचारुन ये, ते तुझ्या पापात सहभागी आहेत काय ?*
'तुम्ही इथेच थांबा, मी विचारुन येतो' असे म्हणत, वाल्या पळतच घरी येतो. दारावर धाडकन् लाथ मारुन घरात घुसतो. बायकोमुलं घाबरतात.
*वाल्या बायकोला धमकाऊन विचारतो. 'बोल तू माझ्या पापात सहभागी आहेस की, नाही?'*
आता असा विचार करा! *शेकडो माणसांचे मुडदे पाडलेला, खाद्यांवर लखलखती कुऱ्हाड घेतलेला, क्रुरकर्मा, दरोडेखोर नवरा असा संतापल्यावर, एक अशिक्षीत, अडाणी, परावलंबी स्री दुसरं काय उत्तर देणार?*
*पण नाही. त्या तडफदार आदिमाया शक्तीने, क्षणाचाही विचार न करता, *'नाही, मी तुमच्या पापात सहभागी नाही!'* असे सडेतोडपणे सांगितले.
नंतर
*तीच घटना वाल्या कोळ्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणारी ठरली.*
गरीबबापड्या बायकोच्या अनपेक्षीत तडफदार उत्तराने वाल्या कोळ्याचे डोळे खाडकन् उघडतात.
तो नारदमुनीची क्षमायाचना करतो. नारदमुनी त्याला दिक्षा देतात. तो तप करतो आणि दरोडेखोर वाल्या कोळ्याचा *वाल्मिकीऋषी* होऊन *रामायण* हे महाकाव्य रचतो.
ही सरळसाधी गोष्ट आपण वाचून सहज सोडून देतो. पण, एक साधी शंका कुणाच्याही मनात का येत नाही! की,
*समजा, वाल्या कोळ्याच्या बायकोने, 'व्हयं..आम्ही आहोतच की, तुमच्यासंग !' असं सर्वसाधारण, सोईचं उत्तर दिलं असतं तर?*
*नारदाचं काही खरं नव्हतंच पण, वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊन, त्याने रामायण तरी कसे काय रचले असते?*
अशी रास्त शंका घेता येऊ शकते !
*पापाचा पैसा कमावणाऱ्या पती -परमेश्वराला, उंबऱ्यातच अडवून ते पाप घरात घ्यायला, त्या पापात सहभागी व्हायला, आजच्या " "सुसंस्कृत भारतीय गृहिणी" नकार देतील तर, बोकाळलेला भ्रष्टाचार नक्कीच कमी होईल..!*
फक्त त्यांनी *वाल्याच्या बायकोचा आदर्श मात्र अंगिकारला पाहिजे.*
असे घडल्यास भारत भ्रष्टाचारमुक्त होऊन जागतिक महासत्तेच्या दिशेने निश्चित वाटचाल करेल !
*पुन्हा एकदा आपल्या भारत 'भूमी' वर निश्चितच रामराज्य अवतरेल व अनेक वाल्या कोळ्याचे वाल्मिकी मुनींमध्ये रुपांतरीत झालेले पाहण्याचे भाग्य आपणांस लाभेल...यात शंकाच नाही...!!!*

१० ऑक्टोबर, २०२१
माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post
तुला पाहताना तुझा होत गेलो
अता काय माझे असे राहिले
तुझा मोह माझ्यामधे चेतला अन्
दिवे पंचप्राणातुनी तेवले
अशी मुग्ध लाही कधी सोसली ना
कधी पाहिला दाहही कोवळा
तिन्ही काळ देहात माझ्या अताशा
उमलतात सर्वांगस्पर्शी झळा
परी चंद्रमा येइतो स्वागताला
नभी पेटले चांदणे पाहिजे
तुझे दिव्य लावण्य ओवाळण्याला
मला कर्पुराचे जिणे पाहिजे ….
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।
अता काय माझे असे राहिले
तुझा मोह माझ्यामधे चेतला अन्
दिवे पंचप्राणातुनी तेवले
अशी मुग्ध लाही कधी सोसली ना
कधी पाहिला दाहही कोवळा
तिन्ही काळ देहात माझ्या अताशा
उमलतात सर्वांगस्पर्शी झळा
परी चंद्रमा येइतो स्वागताला
नभी पेटले चांदणे पाहिजे
तुझे दिव्य लावण्य ओवाळण्याला
मला कर्पुराचे जिणे पाहिजे ….
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।
६ ऑक्टोबर, २०२१
माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post
तु हसतेस जेव्हा जेव्हा
डोळ्यांत खेळवीत पारा
प्रश्नांची विरुनी शाई
मी होतो कागद कोरा..
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।
डोळ्यांत खेळवीत पारा
प्रश्नांची विरुनी शाई
मी होतो कागद कोरा..
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।
५ ऑक्टोबर, २०२१
माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post
विरहात तुझ्या तुला भेटण्या आतुर मी झाले.
तुझे स्वप्न देखता डोळे माझे पाणावले.
तुझे जवळ असणे सुखावते मला.
तुझ्या निस्वार्थी प्रेमाची ओढ वाटे मला
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।
तुझे स्वप्न देखता डोळे माझे पाणावले.
तुझे जवळ असणे सुखावते मला.
तुझ्या निस्वार्थी प्रेमाची ओढ वाटे मला
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।
माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post
रिक्तता लागूनही हातास माझ्या
मी पुन्हा गोंजारतो जगण्यास माझ्या
खोल असण्याच्या नको मारूस थापा
सांगुनी थकलो उथळ पाण्यास माझ्या
थांबला मृत्यू कधीचा वाट पाहत
चाललो घेउन तिथे जन्मास माझ्या
फूल त्याचे होउनी जाईल सुंदर
एकदा कर स्पर्श तू काट्यास माझ्या
मी इथे नसल्यावरी समजेल नक्की
अर्थ होता का कधी असण्यास माझ्या

ओल्या सांजवेळी.....
ओल्या सांजवेळी
रंगली ही गप्पा न्यारी...
ब-याच दिवसांनी
मित्रांची ही दुनियादारी...
सजला होता पुर्णपणे
चहाचा हा कट्टा...
मैत्रीच्या अाठवणींचा
करीत एकमेकांची थट्टा...
भरधाव वेगाने गाड्या
दुकाने बंद होत होती...
माणसेही अापल्या घरी
अन पाखरेही परतत होती...
जणु त्याच कट्टावर
चंद्रही येत होता...
अंधारही सगळीकडे
जरासा काळोख पसरत होता....
चांदण्याची इच्छा
ते ही मध्येच पटकले...
भोवताली त्या अाकाशात
लखलखत ते मिटमिटले...

१ ऑक्टोबर, २०२१
माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post
तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी
माझी कविता मात्र एक निमित्तं असते
तुला मनभरून बघण्याची रोजचीच
डोळ्याची झटपट असते
हसणं जरी साधं तुझं
मला मोहक करून जात
कवितेच्या वहीत कविता म्हणून
तुझेच चित्र रंगवत जातो
माझ्या कवितेचं सुरुवातीचं अक्षर तू
माझ्या कवितेचं शेवटचं अक्षर पण तू
माझ्या कवितेचा पूर्ण सार तू
माझ्या कवितेमधला भाव पण तू
तु सोबत असताना आयुष्य कीती सुंदर वाटत.....
तुझ्या अबोल डोळ्यांमध्ये हरवून जावस वाटत.....
तू जवळ नसलीस कि कविता चुकते
तुझी आठवण आली कि मनाची तळमळ सुरु होते...

३० सप्टेंबर, २०२१
माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post
भुक
भरगच्च जमलेल्या जमावामध्ये एक हलगीचा आवाज आला...
अक्षरश अंगातली सर्व ताकदीने डफड वाजवत जमावाला जमवल जात होत.हलगी वाजवणारी डांगोरी पिटाळत आपल्या कणखर आवाजाने आरोळी ठोकली...
माय बाप,भाऊ दादा...चला चला लवकर या,काई येळामध्ये खेळाला सुरु हुणार हाय...
अशी ती आरोळी कानावर पडली.अन मी ही निघालो..त्याकडे काही तरी दिसतय...
एका मोठ्या चौकात भली मोठी गर्दी जमली.त्याने आपल्या शैलीने बरीच गर्दी जमवली.आणि खेळाला सुरुवात झाली...
एक चिमुकल बाळ.वय जेमतेम 5-6 वर्ष.त्या बाळाच्या आईने गळ्यात हलगी टांगली.आणि बापाने वेगवेगळ्या कसरती चालु केल्या..बघता बघता भरपुर गर्दी जमली.तेवढ्यात त्या बाळाच्या बापाने जवळपास 10-15 फुट लांब काठी घेतली.एका टोकावर त्या चिमुकल्याल्या लटकवल आणि हळुवार पणे ती काठी हवेत उललली.बाळ असलेल्या टोक आकाशात..दुसरे टोक बापाच्या हातात...हगगीच्या जोरदार ठोक्याने वरचेवर काठी उचलत होती.हवेतल्या त्या टोकावर चिमुकल पोटावर टोक घेऊन निजल होत.त्या चिमुकल्याच्या जीव त्या बापाच्या मनगटात होता.त्या माईची जीव त्या बाळांच्या पोटात होता.अक्षरश डोळे अश्रुने दाटले होते.टाळ्यांनी जमावाकडुन प्रतिसाद मिळत होता.काहींनी पैसे देत होते.ती माय माऊली मोठ्या धिराने पैसेजमवत होती.बापाची एकटक नजर त्या बाळांकडे...मनगटात त्या बाळाच अख्ख आयुष्य...
उडे आकाशी,चित्त तीचे पिल्लापंशी...अशीच काहीशी गत होत.पैसे,भाकरी लोकांकडुन मिळत होती.तेवढ्याच बापाने हळुवार काठी खाली घेत होता.जरा खाली आल्यावर काठीला झटका देऊन काठी बाजु केली.मोठ्या शिताफीने बाळाला अलगद झेलुन घेतल.तोपर्यत उपस्थीतांचे डोळे पाणावले.केवढा मोठी संघर्ष ..मला प्रश्न पडला...किती वेदनादायी कहाणी...नेमका हा खेळ कोणता....
तेव्हा मला वाटल...
हा टिचभर पोटाची खळगी भरण्याचा खेळ....
एवढी मोठी वेदनादायी आणि संघर्षाचा म्हणजेच भुक....
भुक ह्या शब्दासाठी किती वेदना सहन कराव्या लागल्या.त्या चिमुकल्या आणि मायमाउली अन बापाला...मन हेलावणार दृश्य...
अशीच काहीशी बाब काही दिवसांपुर्वी घडली.दवाखाण्यामध्ये एक महिला दाखल झाली.डाॅक्टरांनी उपचार केले आणि विचारले...
अशक्तपणामुळे तब्येत खालावली.आणि तुम्ही जेवण कधी केल?
त्या बाईने उत्तर दिल..15 दिवसांपुर्वी..
डाॅक्टर म्हणाले...एवढ दिवस का खाल नाही...कशावर आहात?
बाई म्हणाली...खायला काहीच नाही...15 दिवसांपासुन मी फक्त पाण्यावर जीवन जगत आहे....
टिचभर पोटीची खळगी भरण्यासाठी खुप वेदनादायी जीवन जगावे लागत आहे.खळगी भरण्यासाठी तारेवरची कसरत कराव्या लागणा-या जमाती पहायला मिळतात.कसरती करताना टाळ्याची दाद अन कौतुक मिळत.पण तेवढच त्याच भवितव्याच काय...असा प्रश्न निर्माण होतो.
कधी तारावर चालत जायच तर कधी डोक्यावर थर रचुन तोल सांभाळत जायच...असे चितथरारक कसरत करायच....
एवढ करुन सुद्धा कधी उपाशीपोटी निजायचं....
साहेब..पोट कमी करण्यासाठी योगा नाही...पोट भरण्यासाठी योगा आहे...
"""""""""""

२९ सप्टेंबर, २०२१
माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post
एकट्या क्षंणी..
एकट्या क्षंणी रडावस वाटतं.
एकट्या क्षंणी पावसात भिजावस वाटतं.
एकट्या क्षंणी तुला पाहावस वाटतं.
एकट्या क्षंणी तुला भेटावस वाटतं.
एकट्या क्षंणी क्षितिजाच्या पलीकडे जावस वाटतं.
आपली भेट व्हावी न व्हावी तुझ्या प्रेमात पडावस वाटतं.
काय सांगु दुरवरची काहानी, एकट्या क्षंणी लिहावस वाटतं.
काय सांगु आपल्या प्रेमाची भेट
दुर जातांना सुध्दा तुला पाहवस वाटत.
तुझ्या सोबती समुद्र किनारी हातात हात घेऊन फिरावस वाटतं.
तु नसतांना तुझ्या आठवणीत रमावस वाटतं.
एकट्या क्षंणी तुझ्या सोबत सुर्यास्त पाहावसा वाटतं.
एकट्या क्षंणी तुझ्या आनंदात स्वतः ला विसरून
जावस वाटतं.
आनंतात विलीन होतानां,तुझ्या आनंतात विलीन वाहावस वाटत.
विश्वाच्या या तारकां समुहात रमुण जावस वाटतं.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
Featured Post
माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post
तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...
-
Aapli maitri ek phool ahe, Jyala mi todu shakat nahi, Aani soduhi shakat nahi, Karan,todle tar sukun jaail aani sodle...