ad

२१ जानेवारी, २०२२

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

मंतरलेल्या ओल्या रात्री
तुझे चांदणे झरझर झरते
माझे 'मी' पण वितळत जाते
तुझे न काही बाकी उरते

तलम रेशमी स्पर्श तुझा तो
गात्रांमध्ये साठवताना
अजूनही का फुलतो काटा
मनात सारे आठवताना

हलके हलके दरवळते मग
मंतरल्या रात्रीचे अत्तर
चंद्र जरासा घुटमळतो अन
श्वास सुगंधी म्हणतो सावर

कुणी अनामिक ओढीने त्या
मोहरल्या रानातुन फिरते ?
मखमालीवर चालत जाता
वाट अनावर धुक्यात विरते

डाळींबासम ओठांनी त्या
दव ओलेते टिपून घेते
विस्कटलेल्या धुंद क्षणावर
खूण तेवढी मागे उरते ...
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

१५ जानेवारी, २०२२

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

हरवलेल काही

नकोश्या आठवणींची वेडी गाठ आयुष्यभर सोबतीला असते,
पण हव्या असणार्या स्व्प्नांसाठी जगायला कुठेतरी स्व:तचीच हरकत असते...

वेड्या मनाची वेडी समजुत काढताना कितीतरी दमछाक होते ,
हातात असणारे हसुचे पेढे मात्र जड झाल्याची जाणीव होते..

अश्रूंशी जडलेल घट्ट नात आनंदाला कोंडून टाकत,
नकळत संपत जाणार्या आयुष्याला रोजच जगणही कंटाळून जात...
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

एक स्वप्न उराशी घेऊन
त्या स्वप्नाचा पाठलाग करत आहे
वेळ नक्कीच लागेल
कारण ते स्वप्न आजही दूरवर माझी वाट पाहत आहे...
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

३० डिसेंबर, २०२१

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

गर्दीत उभा राहणे हे
माझे ध्येय नाही,
मला ती व्यक्ती व्हायचंय
ज्याची,
गर्दी वाट बघेल.
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

मैत्री
तुझ्यात आणि माझ्यात असं काय आहे
जे दोघांनाही बाधून ठेवत,
निस्वार्थ भावनेच्या पलीकडे जाऊन
जगण्याला राखून ठेवत,
तू दिवा आहे मी वात,
तू संगीत आहे मी साथ,
माझ्या जगण्याला आकार देणारी,
माझ्या अस्तित्वाला साकार करणारी,
माझी जिवलग मैत्रीण.

जिवलग हा शब्द जरी खूप जवळचा वाटत असला ना तरी त्याला पूर्ण केलं तू,
त्या शब्दाच्या पलीकडे ही जाऊन माझ्या साठी जगलीस तू,
तू सागर आहे मी मोती,
तू समई आहे मी ज्योती,
तुझ्या सोबत आयुष्य भरासाठी मला
बांधून ठेवणारी,
माझ्या पंखांना बळ देणारी,
माझी जिवलग मैत्रीण....
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

२८ डिसेंबर, २०२१

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तू गेल्यावर कळते आहे या देहाच्या पाचोळ्याला
तुझ्याअभावी जगणे म्हणजे शिक्षा आहे आयुष्याला

तुझ्यापासुनी दूर राहतो याचे एकच कारण साधे
मी घाबरतो आहे केवळ माझ्यामधल्या अंधाराला

पूर्ण जायचा जन्म आपला अंगावरती घेउन काटे
कुठे माहिती असते वास्तव रुजण्याआधी निवडुंगाला

मनात माझ्या त्याची वस्ती कायम असते म्हणून बहुधा
एक पोक्तपण आले आहे माझ्यामधल्या नैराश्याला

काटा रुतला पायामध्ये... तिला वेगळे ज्ञान मिळाले
दुनिया संधी शोधत असते अपुला काटा काढायाला

तुला मलाही जाणवते की पूर्ण हरवला आहे आता
काय नेमके झाले आहे अपुल्यामधल्या संवादाला
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

१४ डिसेंबर, २०२१

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

एकमेकांच्या मनाला जाणुनी घेऊ अगोदर
एकमेकांच्या मनावर गाजवू अधिकार नंतर....!

भावना बेभान माझ्या श्वासही माझे अनावर
यौवनाच्या वादळा तू आज माझा तोल सावर...!

चेहरा माझाच आहे की वसंताचा कळेना
सारखे आरोप येती वेगळ्या माझ्या वयावर...!

काल एका जंगलाचा माणसांनी खून केला
सावली गेली सती अन् सूर्य आला उंबऱ्यावर...!

मोजली जेंव्हा कधी मी अंतरीची मालमत्ता
सौख्य हे जंगम निघाले वेदना साऱ्याच स्थावर...!

जन्मलो मी अन् उन्हाळा केवढा तेजीत आला
भोवती आजन्म झाला फक्त आगीचाच वावर...!

स्वप्न ओलेते बघूनी जाग आली लोचनांना
पावसाचे थेंब काही साचले होते मनावर...!

घेतले आजन्म होते मी तुझ्यासाठी जगूनी
रोज आयुष्यास माझ्या टाकले होते उद्यावर...!

एकदा या पावलांनी चालण्याची चूक केली
धावले सारेच रस्ते...थांबले जाउन चितेवर...!
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

२१ नोव्हेंबर, २०२१

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

असेल यशाच्या शिखरावर तेव्हा सर्वांचीच साथ असेल..
आज अपयशाच्या पायऱ्यांवर ठोकर खातोय तेव्हा पाठीवर कोणाचा हात असेल..
त्याचाच मी चाहता असेल,

तशी मला अपयशाची तमा नाही,
आणि नाही संकटांचे भय..
यशाच्या वाटेवर पडताना कोणी
दोन शब्द धैर्याचे देत असेल..
त्याचाच मी चाहता असेल,

रोज जगून मरणाऱ्यांची संख्या कमी नाही
संकटांशी झुंजत जगणाऱ्यांच्या पाठीशी
ज्याचा नि:स्वार्थ पाठिंबा असेल..
त्याचाच मी चाहता असेल,

दु:ख आहे प्रत्येकाच्या आयुष्यात
आणि ते असणारच जीवनात..
त्या दु:खातही कोणी आपले
मनोबल वाढवत असेल..
त्याचाच मी चाहता असेल,
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

१६ नोव्हेंबर, २०२१

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुतारी

एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगनें
दीर्ध जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी 

अवकाशाच्या ओसाडीतले
पडसाद मुके जे आजवरी
होतील ते वाचाल सत्वरी
फुंक मारीता जिला जबरी
कोण तुतारी ती मज देईल?

रुढी, जुलूम यांची भेसूर
संताने राक्षसी तुम्हाला
फाडूनी खाती ही हतवेला
जल्शाची का? पुसा मनाला!
तुतारीने ह्या सावध व्हा तर!

चमत्कार! ते पुराण तेथुनी
सुंदर, सोज्वळ गोड मोठे
अलिकडले ते सगळे खोटे
म्हणती धरुनी ढेरी पोटे
धिक्कार अशा मूर्खांलागुनी

जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध!ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी

प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्यावरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा?
विक्रम काही करा, चला तर!

धार धरलिया प्यार जीवावर
रडतील रडोत रांडापोरे
गतशतकांची पापे घोरे
क्षालायाला तुमची रुधिरे
पाहिजेत रे! स्त्रैण न व्हा तर!

धर्माचे माजवुनी अवडंबर
नीतीला आणिती अडथळे
विसरुनीया जे जातात खुळे
नीतीचे पद जेथे न ढळे
धर्म होतसे तेथेच स्थ्रिर

हल्ला करण्या तर दंभावर तर बंडावर
शूरांनो! या त्वरा करा रे!
समतेचा ध्वज उंच धरा रे! 
नीतीची द्वाही पसरा रे!
तुतारीच्या ह्या सुराबरोबर

नियमन मनुजासाठी, मानव
नसे नियमनासाठी, जाणा;
प्रगतीस जर ते हाणी टोणा
झुगारुनी दे देऊनी बाणा
मिरवा नीज ओजाचा अभिनव!

घातक भलत्या प्रतिबंधांवर 
हल्ला नेण्या करा त्वरा रे! 
उन्न्तीचा ध्वज उंच धरा रे!
वीरांनो! तर पुढे सरा रे
आवेशाने गर्जत हर-हर!

पूर्वीपासूनी अजुनी सुरासुर
तुंबळ संग्रामाला करिती
संप्रति दानव फार माजती
देवावर झेंडा मिरवीती! 
देवांच्या मदतीस चला तर!

- केशवसुत
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

१० नोव्हेंबर, २०२१

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

गुलाबी थंडी

सुर्याची स्वारी दूर-दूर निघाली
किरणांची मिठी सैल झाली
सैलशा त्या हातात चराचर गोठले
तरू-वेलीच्या मस्तीला शिशिराने ताडले

पाने एक-एक करून गळू लागली
फडफड पखांची घरट्यांत थांबली
पिल्लं पक्षिणीच्या उराशी बिलगली
जीवनवृक्षावर रूक्षतेची छाया पसरली

वारा मंद-मंद वाहू लागला
सर्वांगाला झोंबू लागला
शेकोटीभोवती गप्पांची रंगत रंगली
सुखदुःखाच्या आठवणींची गर्दि झाली

थंडीचा हा गारवा
देण्यास आनंद नवा
कसाही का असेना
हा नवचैतन्याचा गुलाबी थंडीचा महिना
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

४ नोव्हेंबर, २०२१

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

रावण जळत असताना रावणाने
हसून गर्दीकडे बघितलं
तपासा स्वतःच्या चारित्र्याला
मोठ्यानं त्यानं विचारलं.

केलाय मी गुन्हा
सीतेचं अपहरण करण्याचा
प्रयत्न नाही केला
मर्यादेची सीमा ओलांडण्याचा.

दिवसाढवळ्या रस्त्यावर
अब्रूचे लचके तोडतात
सभ्यपणाचा आव दाखवून
दरवर्षी मला जाळतात.

तुम्हा मानवां पेक्षा
राक्षस ठरलो भारी
केला नाही अपमान
सीतेचा माझ्या दारी.

हुंड्याच्या लालसेपोटी
तुम्ही हजारो सीता जाळल्या
वंशाच्या दिवट्या साठी
गर्भात कळ्या मारल्या

हक्क नाही तुम्हांला
मला बदनाम ठरवण्याचा
प्रयत्न करा तुम्हीं
स्वतःचे चारित्र्य सुधारण्याचा!

तुमच्या समाधानासाठी दरवर्षी मला पेटवा
पण पेटवण्याआधी तुमच्यातील राम मला दाखवा !
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...