ad

८ मे, २०२२

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

चेहऱ्यावर हळुवार उमलणार स्मित
स्मितामुळे गालावर खुलाणारी खळी
केसांच्या बटांच गालावर झोका खेळणं
तुझ त्यांना हळुवार मागें सारण
हें मन मोहणार दृष्य मी पाहत बसायचो
तासनतास
आणि अनुभवायचो त्या सुरेख क्षणांना
मी तो हर एक क्षण रेखाटलां आहे
माझ्या काळजाच्या canvas वर
तुझे ते अदृश्य मन
तुझ न उमजणार अल्लड स्वभावचित्र मी चांगलं जाणून आहे
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

१९ एप्रिल, २०२२

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।


New photo posted in माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।: 'मंदिराला कळस होता सोन्याचा... गाभाऱ्याला घमघमाट होता चंदणाचा... समईच्या वातीला तुप त्यात केशराचे धुप... चोहीकेडे पुण्य पुण्याचाच ऊत... कुणी सांगावे या सोंगाड्यानां ...? गर्भगृहाचा तो दगड सोखला होता दुधाशी... अन पायरीवर मात्र देव निजला होता उपाशी...' https://ift.tt/AXtqSxB

८ मार्च, २०२२

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तु कमजोर नाहीस

तू आहेस रणरागिणी
थोड रणांगणात उतरून बघ
किती पोसणार रूढी परंपरेच ओझ
बंध युगायुगाचे तोडून तर बघ

माखली तू अंधश्रद्धेने जमाण्याच्या
ज्ञानाचा कंदील तर लावून बघ
उधळतील चोही दिशा कर्तुत्वाने
अस्तित्व तुझ तूच शोधून तर बघ

घे भरारी उंच तू गगनी
अस्तित्वाची बीज तर रुजवून बघ
कोणाची ओकात तुला रोखण्याची
मनगटात बळ तर साठवून बघ

जरी हसरी तू कोमल लाजरी
मनाने निर्भिड तर होवून बघ
नतमस्तक होईल सारा जमाना
ऐसी मशाल हाती धरून तर बघ
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

मराठी कविता:
तु कमजोर नाहीस

तू आहेस रणरागिणी
थोड रणांगणात उतरून बघ
किती पोसणार रूढी परंपरेच ओझ
बंध युगायुगाचे तोडून तर बघ

माखली तू अंधश्रद्धेने जमाण्याच्या
ज्ञानाचा कंदील तर लावून बघ
उधळतील चोही दिशा कर्तुत्वाने
अस्तित्व तुझ तूच शोधून तर बघ

घे भरारी उंच तू गगनी
अस्तित्वाची बीज तर रुजवून बघ
कोणाची ओकात तुला रोखण्याची
मनगटात बळ तर साठवून बघ

जरी हसरी तू कोमल लाजरी
मनाने निर्भिड तर होवून बघ
नतमस्तक होईल सारा जमाना
ऐसी मशाल हाती धरून तर बघ

प्रियंका धर्माजी जोंधळे
आजरसोंडा ता औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली.

कशी नाळ तुटते नवी नाळ जुळते
मनातले कधीतरी इशाऱ्याने कळते
मनीची वेदना बदलेले वागणे लगेच टिपते
जवळ घेऊन धीर देत स्वतःच रडते
ङकधी रुसून हलके लटकेच रागवते
कधी मऊ मेणाचे वज्र होत येते
पाण्यासारखी कधी कडा घसरून जाते
कशी शांत गाय वाघीण होते
सहस्र सूर्य झुकवून सौदामिनी चमकते
कधी जीव देते कधी जीव घेते
कित्येक जीव उजळून जीवनी प्रकाश आणते
एकटीने कधी लाखोंशी झुंज देते
मनाने कोमल शब्दांनी हरते
नेमके हिचे वागणे कळतच नाही
सहस्रावधी रुपे रोज बदलत राही
शब्द अपुरे अन् रिता होतो खजिना
जननीचा उपकार हा जीवनी फिटेना
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

२१ जानेवारी, २०२२

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

मंतरलेल्या ओल्या रात्री
तुझे चांदणे झरझर झरते
माझे 'मी' पण वितळत जाते
तुझे न काही बाकी उरते

तलम रेशमी स्पर्श तुझा तो
गात्रांमध्ये साठवताना
अजूनही का फुलतो काटा
मनात सारे आठवताना

हलके हलके दरवळते मग
मंतरल्या रात्रीचे अत्तर
चंद्र जरासा घुटमळतो अन
श्वास सुगंधी म्हणतो सावर

कुणी अनामिक ओढीने त्या
मोहरल्या रानातुन फिरते ?
मखमालीवर चालत जाता
वाट अनावर धुक्यात विरते

डाळींबासम ओठांनी त्या
दव ओलेते टिपून घेते
विस्कटलेल्या धुंद क्षणावर
खूण तेवढी मागे उरते ...
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

१५ जानेवारी, २०२२

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

हरवलेल काही

नकोश्या आठवणींची वेडी गाठ आयुष्यभर सोबतीला असते,
पण हव्या असणार्या स्व्प्नांसाठी जगायला कुठेतरी स्व:तचीच हरकत असते...

वेड्या मनाची वेडी समजुत काढताना कितीतरी दमछाक होते ,
हातात असणारे हसुचे पेढे मात्र जड झाल्याची जाणीव होते..

अश्रूंशी जडलेल घट्ट नात आनंदाला कोंडून टाकत,
नकळत संपत जाणार्या आयुष्याला रोजच जगणही कंटाळून जात...
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

एक स्वप्न उराशी घेऊन
त्या स्वप्नाचा पाठलाग करत आहे
वेळ नक्कीच लागेल
कारण ते स्वप्न आजही दूरवर माझी वाट पाहत आहे...
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

३० डिसेंबर, २०२१

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

गर्दीत उभा राहणे हे
माझे ध्येय नाही,
मला ती व्यक्ती व्हायचंय
ज्याची,
गर्दी वाट बघेल.
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

मैत्री
तुझ्यात आणि माझ्यात असं काय आहे
जे दोघांनाही बाधून ठेवत,
निस्वार्थ भावनेच्या पलीकडे जाऊन
जगण्याला राखून ठेवत,
तू दिवा आहे मी वात,
तू संगीत आहे मी साथ,
माझ्या जगण्याला आकार देणारी,
माझ्या अस्तित्वाला साकार करणारी,
माझी जिवलग मैत्रीण.

जिवलग हा शब्द जरी खूप जवळचा वाटत असला ना तरी त्याला पूर्ण केलं तू,
त्या शब्दाच्या पलीकडे ही जाऊन माझ्या साठी जगलीस तू,
तू सागर आहे मी मोती,
तू समई आहे मी ज्योती,
तुझ्या सोबत आयुष्य भरासाठी मला
बांधून ठेवणारी,
माझ्या पंखांना बळ देणारी,
माझी जिवलग मैत्रीण....
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

२८ डिसेंबर, २०२१

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तू गेल्यावर कळते आहे या देहाच्या पाचोळ्याला
तुझ्याअभावी जगणे म्हणजे शिक्षा आहे आयुष्याला

तुझ्यापासुनी दूर राहतो याचे एकच कारण साधे
मी घाबरतो आहे केवळ माझ्यामधल्या अंधाराला

पूर्ण जायचा जन्म आपला अंगावरती घेउन काटे
कुठे माहिती असते वास्तव रुजण्याआधी निवडुंगाला

मनात माझ्या त्याची वस्ती कायम असते म्हणून बहुधा
एक पोक्तपण आले आहे माझ्यामधल्या नैराश्याला

काटा रुतला पायामध्ये... तिला वेगळे ज्ञान मिळाले
दुनिया संधी शोधत असते अपुला काटा काढायाला

तुला मलाही जाणवते की पूर्ण हरवला आहे आता
काय नेमके झाले आहे अपुल्यामधल्या संवादाला
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...