ad

८ जानेवारी, २०१४

कधी माझ्या डोळ्यात,

कधी माझ्या डोळ्यात, 
खोलवर बघुन पहा; 
सोसण्यासारखे खुप आहे, 
दुखण्यासारखे काहीच नाही. 
उभी रहा आरशासमोर, 
न्याहाळ स्वतःचे प्रतिबिंब; 
मी दिसलो नाही तुला तर, 
बघण्यासारखे काहीच नाही….. 
तुला नेहमीच वाटत असेल, 
मी तुझ्यावर प्रेम का करावं ते; 
समजण्यासारखे खुप आहे, 
कळण्यास अवघड काहीच नाही….. 
माझ्या नेत्रांतील आसवांची, 
तुला काय किंमत; 
मानले तर अमृताचे थेंब आहेत,
 नुसते पाहिलेस तर काहीच नाहीत.

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...