ad

३० डिसेंबर, २०१४

नवीन वर्षाच्या शुभेच्छा....

नवीन वर्षाच्या शुभेच्छा....
हव्याच का आहेत तुला...?
येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत तर असतो....
नवीन सूर्य ...
नवीन स्वप्नं...
नव्या आशा...
नव्या वाटा...
नवीन दिशा....
आणि कायम राहावी...
ती बेभान होऊन जगण्याची नशा...
हे तर शुभेच्छांचे तेच तेच शब्द....
आणि तीच तीच भाषा...
पण या वर्षी, येणाऱ्या प्रत्येक दिवसाला...
तुझी सोबत मिळावी हीच अपेक्षा.....
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ....!!!


सुरवात आपली

सुरवात आपली मैत्री पासून झाली, 
कधी कुठे मैत्रीशिवाय मनात नाही आले, 
गेले २ च वर्षाची आपली मैत्री,
पण का जाने कुणास ठाऊक, 
आता तुझ्याशिवाय मैत्री पूर्ण होत नाही, 
कळत नाही हि मैत्रीच कि दुसरा काही... 
तुझा दुरावा नाही सहन होत, 
सतत तू समोर असावी असाच वाटतं, 
तू असलीस की सुख काय नि दुख काय सगळं सारखच वाटतं, 
तू असलीस की मनातला सगळं सांगता यायचं.. 
मन मोकळं झाल्यासारखा वाटायचं, 
पण आता मनाला काय झालं आहे कुणास ठाऊक, 
मनातला जे सांगायचा आहे ते ओठावर येताच नाही.. 
का जाने कुणास ठाऊक... 
प्रेमात पडलोय तुझ्या... 
एकाच विचारणं आहे तुझ्याकडे.. 
माझ्याकडून प्रेम करवून घेशील का? 
 माझ्याकडून प्रेम करवून घेशील का?..........

heart touching love story

तुझ्या रुपात मन कैद माझे झाले. तो कविता वाचत होता. 
"गप रे" ति वैतगली होति. 
जरा सिरीयस बन. 
२ वर्षे झालीत.. बाबा मागे लागलेत लग्नासाठी.. 
 माझा हो कळव.. तो हसत म्हणाला.. 
अन काय कळवणार? 
तुला ना नोकरी, ना काहि व्यवसाय. 
अरे लग्न म्हणजे गंमत नाहि. 
अग गंमतच आहे. लग्न म्हणजे सहजिवन, 
प्रेम, एक मेकात आडकण.
लग्न म्हणजे संलग्न. वेडा आहेस. 
अरे लग्न म्हणजे संसार, म्हणजे घर, दुध, किराणा, मुल, म्हणजे पैसा..
ति म्हणाली हातात हात तुझा, 
अन तुझी साथ. 
पैसा येइल. येतो. तो म्हणाला पैसा म्हणजे परसातल प्राजक्ताच झाड नाहि. 
हालवल कि फुलांनी आंगण भरुन जात..
तिन फटकारल.. 
 अग पण, तो बोलायच्या आतच ति म्हणाली.. 
पैसा कि प्रेम हा वाद विवाद कालबाह्य आहे.. 
प्रेमाच्या जागी प्रेम आहे, 
अन पैसा त्याच्या जागि. तु मल खुप आवडतोस.. 
पण तु मला विचार करुन निर्णय दे. 
तिन अल्टिमेटम दिला.. 
 १५ ऑगस्ट चा दिवस होता आज खिशात पैसे होते. 
दिवस तिच्या बरोबर मजेत घालवायचा होता. 
त्यान तिला फोन केला.बर झाल, फोन केलास, 
मला पण तुझ्याशी बोलायच आहे.
ति म्हणाली. नो प्रोब्लेम.. ताज मधे भेटु. काय?.. 
ति उडालीच. ताज च्या थंडगार वातावरणात, 
ति सुखावलि होति. मग काय ठरल?.
तिन विषयाला हात घातला.
तो बोलतच नव्हता. मी थांबु शकत नाहि. 
हि आपली शेवटची भेट.. तिच्या बोलण्याला धार होति.. 
 तो आतुन तुटत चालला होता..प्लिज.. 
अरे प्लिज काय? सारच कठीण आहे.ति म्हणाली. मी निघते? ..
प्लीज थांब, मला एक संधी दे..तो म्हणाला. 
तु फक्त एक वर्ष दे मला, तुल पाहिजे तेवढा पैसा देतो...
तो म्हणाला. ति खळखळुन हसली."
 वेडा रे"अरे पैसा म्हणजे?... 
आय नो. त्यान वाक्य तोडल."किति पैसे लागतात संसाराला? 
लाखो रुपये ति म्हणाली..ठीक आहे. एक डिल.तो म्हणाला. 
आपण पुढच्या १५ ऑगस्ट ला आपण इथच, 
ताज मधे,संध्याकाळी. ७ ला भेटु. 
अन काय करु..तिन विचारल.. 
मी त्या दिवशी तुझ्या पायावर ७५ लाख रुपये ओतिल...
तुला संसारा साठी. त्या
 चित्रपटांत हिरो हिरॉइन ला नोटांनी अंघोळ घालतो तशी.अंघोळ घालीन... 
तो हसत म्हणाला."मॅड आहेस." 
पण म्हणुनच तु मला आवडतो.ति.. पण वचन दे, 
वाट पहाशील म्हणुन.. तो म्हणाला. ठिक आहे, 
पण ७५ रुपये तरी आणशील अस वाटत नाहि. ति हासली.
 ..... continue..... ठिक आहे, पण ७५ रुपये तरी आणशील अस वाटत नाहि. 
ति हासली. १५ ऑगस्ट.. 
तो तिचि ६ वाज ल्या पासुनच वाट पहात होता. 
तेच टेबल होत, मागच्या वर्षीच, ति ये‌इल? 
तो अस्वस्थ होता ७ वाजायला आले होते, 
अन तेवढ्यात ति आत येताना दिसली. 
तिच्याशी नजरानजर होतच त्यान हात हलवला. 
हाश हूश करत ति समोरच्या खुर्चीवर बसली. 
 कशी आहेस? फार गरम होत आहे. 
पहिल पाणी पिते. 
म्हणत उठुन ति त्याच्या समोरच्या ग्लास घ्यायल वाकली. 
ति वाकली असताना, 
त्याला ब्ला‌उज मधे लपवलेल्या मंगळसुत्रचा पदर दिसला. 
अग मी मागवतो म्हणेपर्यंत तिन ग्लास तोंन्डाला लावला होता. 
 अरे फार पाणी पाणी झाल होत.. 
हं आता बोल. काय बोलु? तुच सांग. 
तिच्याकड बघत तो म्हणाला. 
मग काय? कुठे आहे ७५ लाख? ति हसत म्हणाली.. 
त्याचा चेहेरा पड्ला होता., नाहि जमल, 
तु म्हणालीच तेच खर. ७५ लाख काय ७५ रु जमले नाहि. 
पैसा मिळवण कठिण आहे.. 
 जा‌उ देत, मला माहित होत, 
ति समजावणीच्या स्वरांत म्हणाली. 
मल पण तसच वाटत होते. 
पण म्ह्टल तुला शब्द दिला होता... 
तो बघत होता..अजुन काय? 
पडलेल्या चेहे~यानि तो म्हणाला. 
सांगु ति म्हणालि.. अरे माझ लग्न झाल, 
घरचे मागे लगलेच होते. 
तो बॅन्केत आहे, १ बेडरुम च घर आहे... 
तुझ अस.. ति म्हणाली. सॉरी.. 
 तुझ खर आहे., तु ठीकच केल, माझ्याबरोबर.... 
वायाच गेल असत. तो म्हणाला.. ठीक आहे. 
मी निघते, तुला आता अस भेटण बर नाहि...ति. बरोबर आहे. 
निघते.. ति म्हणाली.. तो तिच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता.. 
 तो बराच वेळ तो बसुन होता. सार संपल होत. 
रुम च्या नोकरानि टॅक्सीत सामान भरल.. 
सर कुठे? टॅक्सी ड्रायव्हर ने विचारले. 
सहारा एयर पोर्ट. ईंटर नॅशनल टर्मीनल. 
 टॅक्सी वेगात चालली होति, गार हवेच्या सपक्यान डोक शांत होत होत. 
विमान तळावर टॅक्सी थांबली, त्यान ट्रॉलीत लगेज भरल.
व भाड देवुन तो निघाला, सर,टॅक्सी ड्रायव्हर ने हाक मारली, सर, 
तुमची बॅग राहिली आहे, त्यान टॅक्सी ड्रायव्हर कड बघितल, 
अन म्हणाला बॅग तुला राहु देत, त्यात ७५ लाख रुपये आहेत. 
नाहितरी, मला आता त्याचा काहिच उपयोग नाहि, 
 ड्रायव्हर बराच वेळ त्याच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता






२९ डिसेंबर, २०१४

तुझ्या केसात

तुझ्या केसात सजली
रेष माझी कुंकवाची
तुझ्या डोळ्यात जगली
स्वप्ने माझी आयुष्याची

तुझे हसणे साजणी
तुझे खट्याळ बघणे
तुझे दुरून ईषारे
माझे दुरून जळणे
ऐक अशी बरी नाही
थट्टा माझी पामराची
तुझ्या डोळ्यात जगली
स्वप्ने माझी आयुष्याची

तुझ्या सावळ्या रंगाचा
दंश झाला पानोपानी
त्यात कहर मांडला
तुझ्या कुरळ्या केसांनी
मेघ तुझे रूपघन
हौस माझी पावसाची
तुझ्या डोळ्यात जगली
स्वप्ने माझी आयुष्याची

२८ डिसेंबर, २०१४

चहा


चहाच्या पेल्यात 
हसणे तुझे विरघळले 
वा-यावर शुन्यात
बघणे तुझे विरघळले

चहा पितांना देखील 
मादक किती दिसावे
अंगांगात माझे
असणे तुझे विरघळले

चहा सारखी साधी
आठवण राहीली नाही
चहाच्या आठवणीत
दिसणे तुझे विरघळले


२६ डिसेंबर, २०१४

मी म्हणायचो

मी म्हणायचो
तुझ्या डोळ्यात मला एक टप्पोरं स्वप्न दिसतं.
तू म्हणायचीस छे
तुला तर कशातही काव्यच सुचतं.

मी म्हणायचो
बघ मनापासून केलेली इच्छा ही प्रार्थना असते
तू म्हणायचीस कशी रे
चिमुरडीतही तुला झाशीची राणीच दिसते

मी म्हणायचो
ती हसायची आणि गुणगुणायची आपल्याच नादात गाणी
आज यशाचे 
मेडल घेऊन आली आणि डोळ्यात माझ्या आनंदाचे पाणी


तुला पाहिले



कधी कधी अशी भीती वाटते की आपण सौंदर्याला 
शब्दात बांधून आपल्याच शब्दांच्या मर्यादेत त्याला 
बांधू तर पहात नाही? सौंदर्य सागरासमान आणि 
आपले शब्द फक्त थेंब रूप आहेत. 
यावेळेस सौंदर्याला बांधून घालायची ईच्छाच होत नाहीये, 
तर एका खुळ्या वेंधळ्याची कल्पना शक्ती प्रक्षेपित करूनच हौस भागवतोय.


तुला पाहिले साडीत 
आणि जागी ठार झालो
तुझ्यासाठी खुळा होतो 
आता वेडा पार झालो



थोडे मराठी दागिने
तुला आवडतील का?
साध्या मराठी मुलाची
सोबतीण होशील का?



तुझ्या नाकावर नथ
कानी मोत्यांच्या कुड्या
गळ्यामध्ये ठुशी येता
होणे अप्सराही वेड्या



तुझ्या नाजुक गळ्यात
चपलाकंठी शोभेल
तुझी होऊनिया धन्य
मोहनमाळ ठरेल



वाकी पाटल्या मेखला
पायी पैंजणे जोडवी
किती मोहक हवीशी
माझी कल्पना असावी



साजेसा केसात खोपा
भाळी कुंकवाचा टिळा
ईतकेच मागतो हा
तुझा साजण वेंधळा



मराठी त्या दागिण्यांची
शोभा वाढवशिल का
एका मराठी मुलाची
सोबतीण होशील का?

२५ डिसेंबर, २०१४

तुझे डोळे



अबोल तुझे डोळे नकळत
बरेच काही बोलुन जातात
काळ्या कुट्ट अंधारातही
तुझ्या अस्तित्वाची जाणीव देतात

तुझा एक कटाक्षही
माझे मन शहारुन टाकतो
अन तुझ्या एका स्पर्शाने
मोरपिस जणु भासतो

तु दिसतेस मला
अगदी एखाद्या परीसारखीच
कल्पनेच्या मोहक
विश्वात जगणारी

कळी उमलते तशीच
रोज पहाटे उमलणारी
आहेस जशी पण
तशीच मला आवडतेस

कदाचीत म्हणुनच काय
तु माझ्या मनात राहातेस
स्वतः काहीच बोलत नाहीस
हळुच इशारा मात्र करतेस
बोलत नाहीस काहीही तरीही
मनातले गुपीत सांगतेस

दूर निघून जाण्यापूर्वी



दूर निघून जाण्यापूर्वी
एवढं तरी कर
अंगणात माझ्या घेऊन ये
एखादी तरी सर...
तुझ्या सरीनं पुन्हा एकदा
भरून जाऊदे अंगण
तुझ्या पुरानं पुन्हा एकदा
वाहुन जाऊदे कुंपण
पसरून माझे हात पुन्हा
झेलीन तुझ्या गारा
श्वासामध्ये भरून घेईन
सळाळणारा वारा
ओसरून जाता सर तुझी
दूर निघून जाशील
ओल्याचिंब तुझ्या आठवणी
मागे ठेऊन जाशील
जेंव्हा जेंव्हा आठवेल तुझी
दुरावलेली सर
आठवणींचा पाऊस येईल
भिजवून जाईल घर

२४ डिसेंबर, २०१४

आठवतं तुला त्या भेटीत


आठवतं तुला त्या भेटीत
रिमझिम सरींनी छेडलं होतं .
भर दुपारी मला जणू
चांदण्याने वेढलं होतं .

आठवतं तुला त्या भेटीत
श्रावण धुंद बहरला होता .
ओल्या ऋतूत ओल्या स्पर्शाने
ओला देह शहारला होता .

आठवतं तुला त्या भेटीत
दोघे व्याकुळ झालो होतो .
तुझा गंध वेचता वेचता
मीही बकुळ झालो होतो .

आठवतं तुला त्या भेटीत
भावनांनी कविता रचली होती .
माझ्या डोळ्यात तू अन
तुझ्या डोळ्यात मी वाचली होती.

आठवतं तुला त्या भेटीत
आणखी काय घडलं होतं ?
मला स्मरत नाही पुढचं
बहुतेक तेव्हाच स्वप्न मोडलं होतं

मला काय वाटलं;



मला काय वाटलं;
तर तुला काय वाटलं.
चुकीचं मी तुला ठरवलं तर ;
तू मलाच चुकीचं ठरवल.

खोटे आळ येडू आतातरी;
माझ्यावर लावू नकोस;
वेदना होतात या मला;
तू असं दुखवू नकोस.

माझ्या डोळ्यांच्या आरशात;
जर शोभत नाहीत अश्रू;
तर छेडु नकोस मला;
असं रडवूही नकोस.

असशील तू कोणा दुसर्याची;
कदाचीत माझी नसशीलही;
जरी हे खरं असेल तरी;
तू मला ते सांगू नकोस.

आता तरी किंमत लाव;
माझ्या तुज्यासाठीच्या स्वप्नांची;
नाहीतर कोणत स्वप्न;
मला दाखवूतरी नकोस.

आता तर आलीस अन् भेटलिस 
अन् ऐवढ्यातच निघालिस 
फक्त एक करार पाळण्यासाठी;
नाईलाजाने मला भेटू नकोस.

देवा


देवा,
तुझ्यासारखं मलाही तू
दगडाचं बनवलं असतंस तर,
किती बरं झालं असतं!
कुणी पुजलं नसतं तरी चाललं असतं,
निदान असं मला कुणी
लाथाडून तरी गेलं नसतं...

२३ डिसेंबर, २०१४

डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले..

डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले..
आजही पुन्हा तेच झाले
मनाला माझ्या फक्त तुझे
वेड लागले...
येताच आठवण तुझी
मनाला माझ्या खुप सावरले...
तरिही पुन्हा तेच झाले
सर्व जुने पुन्हा नवे झाले..
कुणी नाही तु माझा मनाला
माझ्य खुप समजावले तरिही
पुन्हा तेच झाले मन तुझ्याविना
उदास झाले..
जगायचे आयुश्य सुखात
अनेकांनी सांगुन पाहिले
तरिहि पुन्हा तेच झाले
तुझ्याविना हे आयुष्य
नकोसे झाले...

२२ डिसेंबर, २०१४

पाहतोय मी


किना-यावर उभ राहून
पाहिल तिला ......
आपल पाउल मागे घेताना
अस कितीदा पाहतो मी
आवडत मला ........
पाउल मागे घेतांना
खट्याळपणे तिने
पायाला केलेल्या गुदगुल्या
आठवतात मला ........
जीव जडलाय माझा
तिच्याच त्या
जीव लावण्यावर ........
माझ्या येण्याच्या चाहुलीने
तिने घेतलेली माघार
मला व्यापण्यासाठी
नाही, कदाचित ........
मला खुणावतेय ती
त्यावर आरूढ़ व्हायला
पण आता ........
पण आता
ओहोटी लागलीय
तिला आणि मलाही
अजुनही तसाच उभा आहे मी
किना-याला .......
वाळूत पाय घट्ट रोवून
तिला दूर जाताना
पाहतोय मी ........
हातून काहीतरी निसटताना
पाहतोय मी ........
पाहतोय मी ........

आठवतात मला ते सारे दिवस


आठवतात मला ते सारे दिवस
पाहत बसायचो मी तुला रात्रंदिवस
आजही आहेस तू माझीच
पण ते फक्त आठवणीतच
राहिलो नाही आता तुझा मी
हरवून बसलो भान माझा मी ....

दुसर्या सोबत पाहून थांबले माझे हृदयाचे ठोकेच
पण तुला कदर न त्याची
कारण ह्यावर बोललो न मी कधीच
आज पर्यंत कळले नाही तुला
प्रेम माझे काय होते
कारण तुझ्याच मनात पाप होते
वाटले होते प्रेम मी तुला करत राहील सदा
पण पाहिलेच नव्हते ह्या प्रेमात पडेल
माझ्यावरच गदा
माहित नव्हते तू एवढे मला छलशील
असशील माझ्या मिठीत अन हाथ दुसऱ्याला देशील
स्वप्न पहिले मी तुझ्या संगे राहण्याचे
पण घात तू केलास
बंद माझे डोळ्यांवर वार तू केलास

आठवतात मला ते सारे दिवस
तू बोलायची मी आहे तुझीच
आणि उद्याही राहील
मी हि तुला दिले वचन
तुला कळी सारखे ठेवेल

पण सांग मला काय माझा गुन्हा
खरेच आता सांगेल मी प्रेम न करणार पुन्हा

तुला काय वाटल,


तुला काय वाटल,

मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही,
तू जशी रागावून गेलीस,
तसा काय मी रागावू शकत नाही!!



तुझ्या आठवणीत डोळे माझे
नेहमीच रडतात,
पण मी कधीच रडत नाही,
तुझ्या आठवणीत मन
नुसत घुसमटत असत,
पण मी कधीच नाही,
तू सुखी आहेस,
तसा मीही जिवन्त आहे,कारण..
मी तुझ्याशिवाय जगू शकतो,
हे विष मी आता सहज पिऊ शकतो!!



तू नेहमीच बरोबर होतीस,
माझच नेहमी चुकल,
इतक्या वर्षान्च प्रेम आपल,
एका भाण्ड्णात आटल,
दु:खी असलो तरी आशेवर जीवन आहे,कारण..
देव माझ्याशी नेहमीच चान्गला वागतो,
आणि आपण परत एकत्र येऊ शकतो!!



लिहिण्यासारखे एवढेच होते,
बाकीचे तू समजून घ्यायचे,
इतके जुने नाते आपले,
तोडून नाही तुटायचे,
माझ्या भावना तुझ्यापर्यन्त पोहोचल्याच असतील एव्हाना,कारण..
मीही तुझ्यावर अगदी जिवापाड प्रेम करतो,
जशी तू मला,तसा मीही तुला खूप मिस करतो!!...

तू जेव्हा म्हणतेस



तू जेव्हा म्हणतेस , 
“तू नेहमीच असा वागतोस
 मुद्दाममला छळतोस ”,
तेव्हा तू मला आवडतेस..


तू जेव्हा म्हणतेस, 
“मला तुझ्याशी बोलायचे नाही आता ..”
आणि लगेच विचारतेस ,
“बोलतोस का आता ?”,
तेव्हा तू मला आवडतेस..



तू जेव्हा म्हणतेस, 
“ परत जर असावागलास तर..
मी तुला कायमची सोडून जाईन... 
लक्षात ठेव ” ,
तेव्हा तू मला आवडतेस..



तू जेव्हा म्हणतेस ,
”मी जगू शकत नाही तुझ्याशिवाय ..
आणि मला माहितीये की तुही माझ्याशिवाय..
”आणि पटकन मला मिठी मारतेस,
तेव्हा तू मला आवडतेस.

२१ डिसेंबर, २०१४

साधारण शी सजणारी..

♥… साधारण शी सजणारी..
आणि हळुवार लाजणारी..
गोजिरी दिसणारी..
आणि खूप गोड हसणारी...
अशीच एक मुलगी..
काल स्वप्ना मधी दिसली..
आणि मला बघून हसली..
कोण जाने कशी
माझ्या स्वप्नात घुसली..
आणि माझ्या हृदयात
घर करून बसली..
गुलाब सारखे लाल ओठ..
सागरा सारखे डोळे..
तिचे केस वेली सारखे लांब..
आणि नभा सारखे काळे
तिला मी बघितलं
श्वेत फुलांच्या वनात..
अन पूर्ण साठवल
माझ्या मनात..
तिच्या पैन्जानीचा
आवाज तसाच
कानात गुंजतो..
आणि सांगतो.आहे .
मी तुझीच आहे.!!
मी तुझीच आहे..
पण.....?
कुणीतरी माझी चादर ओढली..
आणि माझी साखर झोप मोडली..
परत कधी येशील ग प्रिये.स्वप्नात..
आता फक्त तूच आहेस या वेड्या मनात..
आता फक्त तूच आहेस या वेड्या मनात...

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...