ad

२४ सप्टेंबर, २०२१

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

#गझल

कशी समजूत काढू मी, तुझी आशा असे भोळी
लुटारू सारखे सगळेच, केवळ बदलते टोळी

पुढे जाण्याअगोदर थांब माझ्या झोपडीपाशी
मला ऐकायची आहे तुझी श्रीमंत आरोळी

नका इतक्यात उठवू सावल्यांना सुस्त पडलेल्या
उन्हाला घातली आहेत त्यांनी छान वेटोळी

करू घेऊन हाती काय माझी लेखणी आता
तुझी चिन्हे, तुझ्या रेषा, तुझी भाषा, तुझ्या ओळी

तपस्या पूर्ण झाली वाटते झटक्यात बगळ्याची
जशी डोळ्यात भरली एक गोरीपान मासोळी

कुठे सदरा सुखाचा लाभतो हे माहिती नाही
सुखाची गोधडी असल्यास ती असणार आजोळी

किती रेंगाळतो मी उंबऱ्यापाशीच निघताना,
अशी अलवार हातांनी नको काढूस रांगोळी
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...