ad

२४ सप्टेंबर, २०२१

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

कधीतरी मग एक असाही दिवस उगवतो
तुझ्या मनाचा नकळत त्याला पत्ता कळतो
दारावर तो टकटक करतो भल्या पहाटे
दाट धुक्याचा पदर ओढुनी गाली हसतो...

बंद मनाचे कवाड अलगद उघडुन बघते
एक अनामिक जादू त्याच्या नयनी दिसते
स्पर्श पुसटसा भाव मनीचे बोलुन जातो
लाज बावरी नकळत माझ्या गाली फुलते...

राजरोस मग मनात तोही येतो जातो
कायमचे घर मनात माझ्या करून बसतो
त्याच्याविण ना दुसरे काही काही सुचते
एक कवडसा तिमिर मनाचा उजळुन जातो...
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...