ad

१६ एप्रिल, २०१४

आठवणी

आठवणीच्या सागरात मासे कधिच पोहत नाही, 
अमावस्येच्या रात्रि चंद्र कधी दीसत नाही, 
कितीही जगले कुणी कुणासाठी, 
कुणीच कुणासाठी मरत नाही. 
अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला,
पण नशिबाचे चक्र थांबत नाही. 
आयुष्यात कितीही कराल प्रेम कुणावर, 
त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही........

१४ एप्रिल, २०१४

तुला नको असला तरी मला शेवटचं भेटायचं आहे,

तुला नको असला तरी मला शेवटचं भेटायचं आहे, 
तु कधीच न दिसण्याच्या आधी डोळे भरुन पहायचं आहे... 
ठरवलं आहे दोघांनीही की भेटल्यावर डोळ्यात आणायचं नाही पाणी पण, 
माहिती आहे भेटल्यावर अश्रुशिंवाय बोलणार नाही कुणी... 
खुप काही बोलायचं आहे खुप काही सांगायचं आहे, 
मनात साठवलेल्या शब्दाना ओठावर आणायचं आहे... 
तुझा शेवटचा चित्र मनात रंगवायचा आहे, 
हा चेहरा परत दिसणार नाही म्हणुन मनाला समजवायचं आहे... 
जाता जाता फक्त माझी एवढीचं अपेक्षा आहे, 
एकदा मिठीत घेऊन तुला अश्रुमध्ये चिंब भिजवायचं आहे.....!

२३ मार्च, २०१४

प्रेमात कोरडा राहिलेला माणूस





प्रेमात कोरडा राहिलेला माणूस, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम शोधत राहतो…ते जर मिळालं तर समोरच्या व्यक्तीसारखी नशीबवान व्यक्ती कोणी असूच शकत नाही…प्रेमाच्या सागरात महापूर येतील आणि समोरचा माणूस एकतर गुदमरुण मरेल किंवा त्याच्या हाताला पकडून किनारा गाठेल… अशे हे प्रेमात कोरडे राहिलेले महाभाग कधी कधी चुकीच्या मार्गांना भरकटून खूप दूर चालले जातात तर काही प्रेमाच्या मृगजळात अडकून गतप्राण होतात किंवा अश्वथामा सारखे अंत येऊ पर्यंत भटकत राहतात…फरक तो इतकाच अश्वथामा भटकतोय मोक्षासाठी तर तो भटकतोय प्रेमात पडण्यासाठी… 

५ मार्च, २०१४

म्हणजे तुला सुख मिळेल-


राग आल्यावर गिळायला शिक

म्हणजे तुला सुख मिळेल
दुसर्‍याचा चुका पोटात घालायला शिक
म्हणजे तुला सुख मिळेल
दुसर्‍याचा बाबतीत मन मोठं करायला शिक
म्हणजे तुला सुख मिळेल
दुसर्‍याला आपल म्हणायला शिक
म्हणजे तुला सुख मिळेल
दुसर्‍याचा बाबतीत तडजोड करायला शिक
म्हणजे तुला सुख मिळेल-

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...