माझ्या मनातलं तुला सांगायचा खूप प्रयत्न केला, पण तू कधी ते समजून घेतलं नाही... खूप दु:ख आहे माझ्या हसण्यामागे, पण खरंच ते तुला कधी दिसलं नाही... दिसला तो फक्त माझा राग, स्वभाव, पण माझं प्रेम तू कधी जाणलंच नाही...
ad
२४ सप्टेंबर, २०२१
माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post
तुझ्या मनाचा नकळत त्याला पत्ता कळतो
दारावर तो टकटक करतो भल्या पहाटे
दाट धुक्याचा पदर ओढुनी गाली हसतो...
बंद मनाचे कवाड अलगद उघडुन बघते
एक अनामिक जादू त्याच्या नयनी दिसते
स्पर्श पुसटसा भाव मनीचे बोलुन जातो
लाज बावरी नकळत माझ्या गाली फुलते...
राजरोस मग मनात तोही येतो जातो
कायमचे घर मनात माझ्या करून बसतो
त्याच्याविण ना दुसरे काही काही सुचते
एक कवडसा तिमिर मनाचा उजळुन जातो...
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।
माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post
कशी समजूत काढू मी, तुझी आशा असे भोळी
लुटारू सारखे सगळेच, केवळ बदलते टोळी
पुढे जाण्याअगोदर थांब माझ्या झोपडीपाशी
मला ऐकायची आहे तुझी श्रीमंत आरोळी
नका इतक्यात उठवू सावल्यांना सुस्त पडलेल्या
उन्हाला घातली आहेत त्यांनी छान वेटोळी
करू घेऊन हाती काय माझी लेखणी आता
तुझी चिन्हे, तुझ्या रेषा, तुझी भाषा, तुझ्या ओळी
तपस्या पूर्ण झाली वाटते झटक्यात बगळ्याची
जशी डोळ्यात भरली एक गोरीपान मासोळी
कुठे सदरा सुखाचा लाभतो हे माहिती नाही
सुखाची गोधडी असल्यास ती असणार आजोळी
किती रेंगाळतो मी उंबऱ्यापाशीच निघताना,
अशी अलवार हातांनी नको काढूस रांगोळी
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।
माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post
चुरगळ्या नंतरही फुलांनी
दिलेला सुगंध म्हणजे क्षमा..
आणि क्षमा हा - बलाढ्य
माणसाचा शौर्यशील गुण आहे..!
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।
माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post
स्वत:चे स्वप्न साकारत
मनसोक्त उडायचं,
की मनातल्या भावना लपवून
लोकांच्या अपेक्षात लोळायचं,
काळनुरूप वाढत्या
अपेक्षांच्या रांगा,
काय करावं ,जरा तुम्हीचं सांगा?
बाळा, तुझी इच्छा काय,
कोणी उच्चारलं का?
मला काय करायचं,
कोणी विचारलं का ?
माझं काय, ते असूद्या ,
आपलं मांगा,
काय करावं, जरा तुम्हीचं सांगा?
विचारांना नाही पटली
त्या गोष्टीची
माझ्यावर सावलीचं नाही,
गुलामी मनाला
कधी भावलीचं नाही,
म्हणून.....
आयुष्यात झाला पंगा,
काय करावं, जरा तुम्हीचं सांगा?
विचार,मन जिकडे वळवतं
तिकडे वळावं,
की भावना , अपेक्षांच्या
जाळ्यात फळ-फळावं,
ओढाव्या का ?
अळथळा करणा-या टांगा,
काय करावं,जरा तुम्हीचं सांगा?
लोकांच्या नकारात्मक
विचारांनी मांगे पडावं,
की आयुष्याचा संघर्ष आता,
स्वत:च्या जोरावर,लढताचं लढावं,
चित्र भविष्याचे आता,
तुम्हीचं रंगा,
काय करावं, जरा तुम्हीचं सांगा?
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।
माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

२२ सप्टेंबर, २०२१
खूप बिखरलेली आहेस
खूप बिखरलेली आहेस, समेटाव अस वाटत,
तुझ्या विखुरलेल्या मनात, शांत समाविष्ट व्हाव.....
निशब्द असतेस , तु खूप बोलाव अस वाटत.....!
खूप विचारात मग्न मनात गुंतलेली असतेस....कधी तुला फक्त तुलाच समजाव अस्स वाटत...!
कधी तुला ऐकाव..तुला पहाव.. मोकळ्या वारयात खुल्या आभाळी फक्त तुलाच न्याहाळाव अस वाटत......!
वाट तुझी फुलांनी भरुन, सगळे आनंद सुख तुला अर्पन करून, तुझ्या अडचनी दूर करावे, घेरा देऊन भोवती तुझ्या सुरक्षित करावेस वाटत.
माझ्याकडे काहीही नसताना, ऐक गोष्ट मात्र नित्याचीच आहे, तुझ्यावर बोलनं... तुझ्यासाठी लिहीनं.....!!!
१९ मार्च, २०१७
१ मार्च, २०१७
चारोळी
चारोळी
Featured Post
माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post
तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...
-
Aapli maitri ek phool ahe, Jyala mi todu shakat nahi, Aani soduhi shakat nahi, Karan,todle tar sukun jaail aani sodle...
-
तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...