ad

२४ सप्टेंबर, २०२१

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

ह्रदयातील माझी जागा तुझ्या
येण्याने भरुन गेली…
तू गेल्यावर ती जागा तुझ्या
आठवणींत बूडून राहीली…
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

संघर्ष

वाचायला खूप छोटा मात्र व्याप्ती तितकीच मोठी, यशाच्या शिखरावर पोहचण्याचा खडतर मार्ग, जो या मार्गावर प्रवास करतो तोच खरा भाग्यवान, कारण ही संधी त्यालाच प्राप्त होते ज्या मध्ये सामर्थ्य असते
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

अशी सकाळ

सुंदर सकाळची सुरुवात
तुझ्या स्पर्शाने व्हावी,
मऊ तुझ्या तळहातांने
झोप माझी उडावी,

तमा न करता कशाची
मी मागून मिठी मारावी,
मारलेल्या मिठीत मी
तुझी बट मागे सारावी,

तुझ्या बांधीव कमरेभोवती
हात माझा फिरावा,
नाजूक उडणाऱ्या हृदयाने
दीर्घ श्वास घ्यावा,

श्रवणपाकळ्यांवरती तुझ्या
अधरांचा माझ्या स्पर्श व्हावा,
नकळत माझ्या अधराना
तुझ्या आधरांचा आसरा मिळावा,

मिटूनी ते रेखीव नयन
तू साद मला द्यावी,
अशी सकाळ माझ्या जीवनात
नित्यपने यावी...!
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

Hi
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

कधीतरी मग एक असाही दिवस उगवतो
तुझ्या मनाचा नकळत त्याला पत्ता कळतो
दारावर तो टकटक करतो भल्या पहाटे
दाट धुक्याचा पदर ओढुनी गाली हसतो...

बंद मनाचे कवाड अलगद उघडुन बघते
एक अनामिक जादू त्याच्या नयनी दिसते
स्पर्श पुसटसा भाव मनीचे बोलुन जातो
लाज बावरी नकळत माझ्या गाली फुलते...

राजरोस मग मनात तोही येतो जातो
कायमचे घर मनात माझ्या करून बसतो
त्याच्याविण ना दुसरे काही काही सुचते
एक कवडसा तिमिर मनाचा उजळुन जातो...
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

#गझल

कशी समजूत काढू मी, तुझी आशा असे भोळी
लुटारू सारखे सगळेच, केवळ बदलते टोळी

पुढे जाण्याअगोदर थांब माझ्या झोपडीपाशी
मला ऐकायची आहे तुझी श्रीमंत आरोळी

नका इतक्यात उठवू सावल्यांना सुस्त पडलेल्या
उन्हाला घातली आहेत त्यांनी छान वेटोळी

करू घेऊन हाती काय माझी लेखणी आता
तुझी चिन्हे, तुझ्या रेषा, तुझी भाषा, तुझ्या ओळी

तपस्या पूर्ण झाली वाटते झटक्यात बगळ्याची
जशी डोळ्यात भरली एक गोरीपान मासोळी

कुठे सदरा सुखाचा लाभतो हे माहिती नाही
सुखाची गोधडी असल्यास ती असणार आजोळी

किती रेंगाळतो मी उंबऱ्यापाशीच निघताना,
अशी अलवार हातांनी नको काढूस रांगोळी
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post



चुरगळ्या नंतरही फुलांनी
दिलेला सुगंध म्हणजे क्षमा..
आणि क्षमा हा - बलाढ्य
माणसाचा शौर्यशील गुण आहे..!
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुम्हीचं सांगा......


स्वत:चे स्वप्न साकारत
मनसोक्त उडायचं,
की मनातल्या भावना लपवून
लोकांच्या अपेक्षात लोळायचं,
काळनुरूप वाढत्या
अपेक्षांच्या रांगा,
काय करावं ,जरा तुम्हीचं सांगा?

बाळा, तुझी इच्छा काय,
कोणी उच्चारलं का?
मला काय करायचं,
कोणी विचारलं का ?
माझं काय, ते असूद्या ,
आपलं मांगा,
काय करावं, जरा तुम्हीचं सांगा?

विचारांना नाही पटली
त्या गोष्टीची
माझ्यावर सावलीचं नाही,
गुलामी मनाला
कधी भावलीचं नाही,
म्हणून.....
आयुष्यात झाला पंगा,
काय करावं, जरा तुम्हीचं सांगा?

विचार,मन जिकडे वळवतं
तिकडे वळावं,
की भावना , अपेक्षांच्या
जाळ्यात फळ-फळावं,
ओढाव्या का ?
अळथळा करणा-या टांगा,
काय करावं,जरा तुम्हीचं सांगा?

लोकांच्या नकारात्मक
विचारांनी मांगे पडावं,
की आयुष्याचा संघर्ष आता,
स्वत:च्या जोरावर,लढताचं लढावं,
चित्र भविष्याचे आता,
तुम्हीचं रंगा,
काय करावं, जरा तुम्हीचं सांगा?
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।


New photo posted in माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।: 'बालपण हे फार सुंदर असत ना. बालपणी माणसाला अभ्यासाच टेन्शन नसतं कारण बालपणी माणूस हा निसर्गाच्या शाळेत शिकत असतो. कुटूंबातील इतर सदस्यांकडून चांगल्या वाईट गोष्टी चे निरीक्षण करून मुलं लहाना च मोठं होत. जे मुलं आजी आजोबांच्या सहवासात जास्त राहत ते मुलं एक संस्कार क्षम पिढी घडवतात.' https://ift.tt/3kDssIt

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

.
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

२२ सप्टेंबर, २०२१

खूप बिखरलेली आहेस

 खूप बिखरलेली आहेस, समेटाव अस वाटत,

तुझ्या विखुरलेल्या मनात, शांत समाविष्ट व्हाव.....

निशब्द असतेस , तु खूप बोलाव अस वाटत.....!

खूप विचारात मग्न मनात गुंतलेली असतेस....कधी तुला फक्त तुलाच समजाव अस्स वाटत...! 

कधी तुला ऐकाव..तुला पहाव..  मोकळ्या वारयात खुल्या आभाळी फक्त तुलाच न्याहाळाव अस वाटत......! 


वाट तुझी फुलांनी भरुन, सगळे आनंद सुख तुला अर्पन करून, तुझ्या अडचनी दूर करावे, घेरा देऊन भोवती तुझ्या सुरक्षित  करावेस वाटत. 


माझ्याकडे काहीही नसताना, ऐक गोष्ट मात्र नित्याचीच आहे, तुझ्यावर बोलनं... तुझ्यासाठी लिहीनं.....!!!


Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...